Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: ग्रामीण रुग्णालयात आज दि. ०१ डिसेंबर २०२१ रोजी २० व्यक्तींच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी च्या माध्यमातून यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ५ वर्षात पहिल्यांदाच धरणगाव येथे आज ओटी सुरू झाली. यामध्ये २/३ सिझेरियन झालेल्या अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी द्वारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाल्या. त्यांना जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व स्त्रीरोग तज्ञ डॉ. लिलाधर बोरसे यांचे अनमोल सहकार्य लाभले. ओटी मध्ये मोरावकर, भदाणे, सोनार व लांडगे सिस्टर यांनी मोलाचे सहकार्य केले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे व विनामूल्य झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. संतती नियंत्रण शस्त्रक्रिया…

Read More

लक्ष्मण पाटील: तालुक्यातील बांभोरी बु. येथील मोलमजुरी करणारे देविदास वसंत सोनवणे यांचा चिरंजीव पहेलवान अक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. ऑल इंडिया रेसलिंग अँड पॅनक्रेषन चैम्पियनशिप २०२१ ही स्पर्धा २९ ते ३१ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडली. यानिमित्ताने विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव यांच्या वतीने अक्षयचा सत्कार करण्यात आला. अक्षयला शालेय स्तरावर जिल्हा – विभाग पातळीवर जाण्यासाठी बालकवी ठोंबरे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सचिन सूर्यवंशी सरांचे मार्गदर्शन लाभले. फिनलँड येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी अक्षयची निवड झाली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशाचा नावलौकिक वाढवावा, यासाठी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या. अक्षय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दिवाळीच्या काळात खरेदी करून घरी परतणाऱ्या महिलेचा गंभीर अपघात झाला. डोक्याला मार, थेट मेंदूत रक्तस्राव झालेला…अशा अवस्थेत सायंकाळी महिलेला श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णांवर उपचार सुरू केले. रुग्णाचे सिटीस्कॅन झाल्यानंतर मेंदूत रक्तस्राव झाल्याचे लक्षात आले. आणि डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तोपर्यंत पहाटेचे तीन वाजले होते. पण तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे असल्याने पहाटे तीन वाजताच जखमी महिलेच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि महिलेचे प्राण वाचविण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. बिलवाडी (ता जळगाव) येथील चित्राबाई पाटील या दिवाळीच्या खरेदीसाठी जळगाव येथे आल्या होत्या. खरेदी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रावेर तालुक्यातील पाल राखीव वनक्षेत्रात शेळ्या चारणाऱ्या ९ वर्षीय बालकांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मध्ये प्रदेशाच्या हद्दीतील मांजल येथील दिपल्या बारेला मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जातो. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये (पाल वनक्षेत्र चार -१ नियतक्षेत्र कक्ष क्रं. ६१- ६२ हद्दीत ) गेला याठिकाणी झुडुपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व नंतर गुराखी दिपल्या बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर वार करीत गंभीर जखमी केले. या हल्ल्याच्यावेळी दीपल्यासोबत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील बांभोरी बु.येथीलअक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे त्याचा तालुका प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तालुक्यातील बांभोरी बु.येथील मोलमजुरी करणारे देविदास वसंत सोनवणे यांचा चिरंजीव पहेलवान अक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. ऑल इंडिया रेस्टलिंग अंड पैक्रेषन चैम्पियनशिप २०२१ हि स्पर्धा २९ ते ३१ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडली.त्यानिमित्ताने तालुका प्रशासन धरणगाव वतीने अक्षयचा सत्कार करण्यात आला.यांनंतर फिनलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड च्यांमियनशीप साठी त्याची निवड झाली असून त्यासाठी शुभेच्छा देऊन त्याचे…

Read More

जळगाव प्रतिनिधी: नशिराबाद टोलनाक्याच्या बाजूला टेबल लावून फास्ट टॅगचे स्टिकर विक्री करण्यास मनाई करून टोल नाक्याच्या व्यवस्थापकसह तिघांनी उमरखान अन्वर खान राहणार भुसावल या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या प्रकरणी मंगळवारी व्यवस्थापक मोहम्मद शेहवाल खान, शिवदत्त व दिग्विजय या तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. पेटीएम कंपनीत फास्ट टॅग विभागात कामाला असल्याने कंपनीमार्फत फास्ट टॅग स्टिकर विकण्याची परवानगी असल्याने त्याची विक्री करत होतो त्यास टोलनाक्यावरील लोकांनी विरोध करून मारहाण केल्याची तरुणाने तक्रारीत म्हटले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव शहरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याची घटना घडली या घटनेची माहिती समजताच संबंधित पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ कंट्रोल रूम बदली करण्यात आले. शहरातील एका तरुणीची गवारे नामक पीएसआयने आज छेड काढली. यानंतर भेदरलेल्या तरुणीने याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झालेत. घाबरलेल्या पीएसआयने स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतले. नागरिकांनी पोलिसांना घटना कळविल्यानंतर काही कर्मचारी संबंधित पीएसआयच्या घरी आल्यानंतर ते त्याला सोबत पोलीस स्थानकात घेऊन गेलेत. यानंतर पोलीस स्थानकात शहरातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार स्मिताताई वाघ, पीसीआब पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, दीपक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील शिरसोली ते जळगाव दरम्यान दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ खांबा क्रमांक ४०६/२५ ते ४०६/२७ दरम्यान अंदाजे एका ३० ते ३५ वय गटातील इसमाचा मृतदेह आढळला आहे. शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव ते शिरसोली दरम्यान दापोरा शिवारातील रेल्वे रुळावर अंदाजे ३० ते ३५ वय गटातील पुरुष धावत्या रेल्वेतुन पडून खाली आल्याने मयत स्थितीत आढळला असल्याबाबत आज बुधवारी १ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजता रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक सौरभ कुमार यांनी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकार्‍यांचे ग्रामसेविकेला एक महिने न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ग्रामसेविका भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात देत नव्हते. याबाबत सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणार्‍या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांच्यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कठोर कारवाई केली आहे. तत्कालीन ग्रामसेविका बाविस्कर यांनी चुंचाळेला(ता. यावल) बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. याबाबत जिल्हा परिषद…

Read More

चेअरमन पदी मुकेश गवंदे तर व्हा चेअरमन पदी रवींद्र वरपे यांची निवड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दापोरा येथील दापोरे दुध उत्पादक सहकारी संस्थेची सन २०२१/२०२६ साठी पंचवार्षिक निवडणूक सहकार विभागाकडून घेण्यात आली. सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध निवड झाली. या संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदी एक एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.    सहकार विभागाकडून चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी सहकार अधिकारी वासुदेव पाटील यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया पार पडली चेअरमन पदासाठी  मुकेश नाना गवंदे व व्हा चेअरमन पदासाठी रवींद्र कृष्णा वरपे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी संचालक रवींद्र वसंत काळे, दशरथ भिमराव…

Read More