लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील बांभोरी बु.येथीलअक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे त्याचा तालुका प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील बांभोरी बु.येथील मोलमजुरी करणारे देविदास वसंत सोनवणे यांचा चिरंजीव पहेलवान अक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. ऑल इंडिया रेस्टलिंग अंड पैक्रेषन चैम्पियनशिप २०२१ हि स्पर्धा २९ ते ३१ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडली.त्यानिमित्ताने तालुका प्रशासन धरणगाव वतीने अक्षयचा सत्कार करण्यात आला.यांनंतर फिनलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड च्यांमियनशीप साठी त्याची निवड झाली असून त्यासाठी शुभेच्छा देऊन त्याचे मनोबल उंचावले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य प्रेमराज पाटील,माजी खेळाडू व प्रशिक्षक रवींद्र कणखरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय सोनवणे,पोलीस पाटील,तलाठी व कोतवाल हजर होते. या सत्कारामुळे अक्षय भारावला असून त्याने भविष्यात गोल्ड मेडल जिंकेल असा आशावाद व्यक्त केला.