लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान झाले. 17 जागांपैकी 13 जागांसाठी मतदान होणार असून 4 जागांची निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे रद्द करण्यात आली आहे. तर 13 जागांसाठी साठी 53 उमेदवार रिंगणात असून 26 मतदान केंद्रावर मतदान पार पडले.
या निवडणुकीच्या माध्यमातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग क्रमांक 11 व 12च्या मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत त्याठिकाणी तळ ठोकून होते.सकाळी मतदानाला संथ गतीने सुरू होते मात्र दुपार नंतर रांगा लागल्या होत्या तर प्रभाग क्रमांक 11 व 12 मध्ये 6.30 वाजेपर्यंत मतदान झाले 72 टक्के मतदान झालं आहे संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे चार जागा वर निवडणूक नंतर होणार असल्याने 13 जागांसाठी आज मतदान संपन्न झाले . मतदानाला सकाळी 7.30 वाजेला प्रारंभ झाला सकाळी थंडी असल्याने मतदान हळुवार पणे सुरू होते.दुपारी 12 वाजे नंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला बोदवड विकासो मतदाराच्या रांगा दिसत होत्या. सायंकाळी 4 वाजेला पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुद्धा प्रभाग क्रमांक 11 च्या केंद्रांना भेट दिली याठिकाणी असलेल्या प्रभाग क्रमांक 11 व 12 च्या बूथ वर सायंकाळी 5.30 वाजेनंतर रांगा लागल्या होत्या त्यामुळे मतदारांना प्रशासनाने टोकन दिले होते टोकन असल्यास वरच मतदानाचा हक्क बजावण्यात येत होता या बूथ वर मतदान सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू होते.
बोदवड नगरपंचायत मध्ये सकाळी 7.30 वाजेला मतदान सुरू झाले 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 704 पुरुषांनी तर 527 महिलांनी असे एकूण 1231 मतदारांनी आपला हक्क बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत बजावला . 7.96 टक्के मतदान झाले दुपारी 11.30 वाजेपर्यंत पुरुष 1664 महिला 1616 एकूण 3280 झाले असून 21 टक्के मतदान झाले .दुपारी 1.30 वाजेपर्यंत महिला 2855 पुरुष 2953 एकूण 5808 हक्क बजावला असून 37.55 टक्के मतदान झाले होते. दुपारी 3.30 वाजे पर्यत 55.17 टक्के मतदान झाले होते यात महिला 4228 पुरुष 4305 तर 8533 असे एकूण मतदारांनी हक्क बजावला.
शेवटच्या टप्प्यात 5238 महिला 5975 पुरुष 11213 मतदारांनी आपला हक्क बजावला असून 72.50 टक्के मतदान झाले