धरणगाव (प्रतिनिधी)। धरणगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरूणावर धरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर संशयित आरोपी फरार आहे. धरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता त्याच गल्लीतील संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने मागून येवून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबले त्यानंतर तिला ओढत नेत त्याच्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील 18 वर्ष आतील मुलींच्या गटातून जिल्हा स्तरावर झालेल्या क्रॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेत शाळेतील रूपाली विजय कुंभार ही जिल्ह्यातून प्रथम प्रीती तापीराम इंगळे ही द्वितीय आली यांनी 3 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा स्तरावर घवघवीत यश संपादन केले. त्यांची आता राज्यस्तरावर निवड झालेली असून त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन यांनी विद्यार्थिनी खेळाडूंचं गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केलं व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया व उपाध्यक्ष अंकुश पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना ओ.बी.सी.शिक्षक असोशिएशन तर्फे दिला जाणारा “गुरुगौरव पुरस्कार – २०२१” जाहीर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओ.बी.सी. विद्यार्थी – शिक्षक – पालक विकास असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षी २८ नोव्हेंबर तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करित असते. या दिनाचे औचित्य साधून अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना “गुरुगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी २८ उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देऊन दि. २५ डिसेंबर, २०२१ रोजी धुळे येथे गौरविण्यात येणार असल्याची माहिती ओ.बी.सी.शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूण कौटुंबिक वादातून बेपत्ता झाला होता. आज या बेपत्ता झालेल्या तरूणाचा गावालगत असलेल्या शेतविहीरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनगाव येथील मयत तुषार गोपाळ राणे (वय-३२) असे तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, किनगाव तालुका यावल येथील रहिवाशी तुषार राणे, आई आशा गोपाळ राणे आणि पत्नी रत्ना तुषार राणे हे वास्तव्याला असून तुषार व त्याची पत्नी अशा यांच्यात कौंटुबिक वाद सुरू होता. त्यामुळे तुषार हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. रविवारी ५ डिसेंबर रोजी तुषार व त्याची आई आशा यांनी…
धरणगाव लक्ष्मण पाटील : शहरालगत असलेल्या १ एकर जागा ही गायरानसाठी राखीव असतांना त्यावर अतिक्रमण केले जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिरीष बयस यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ ८ डिसेंबर २०२१ रोजी शांततेत मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत माहिती अशी की, धरणगाव शहराच्या लगत असलेल्या अमळनेर रोडवर ३ हेक्टर ५१ आर जागा ही पुर्वापार गायरान म्हणून वापर केला जात आहे. सातबारा उताऱ्यावर देखील गायरान असल्याचा उल्लेख आहे. परंतु शहरातील काही समाजकंटकांनी मुंबई येथील मानवसेवा संकल्प प्रतिष्ठानला हाताशी घेवून सदरील गायरानची जागा हडप करण्याच्या हेतूने या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. यासंदर्भात सामाजिक…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील शतकोत्तर परंपरा असलेल्या पी. आर. हायस्कूल मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ, उमाकांत बोरसे, एनसीसी आफिसर डी.एस. पाटील , सी.ए. शिरसाठ , डॉ. वैशाली गालापुरे मॅम, सुरेखा तावडे मॅम, वंदना डहाळे मॅम, ग्रंथपाल विराग बाजपेयी, यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने पूजन करून अभिवादन केले. शाळेचे कला शिक्षक राजेश खैरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…
महात्मा फुले यांचे जीवन कार्य म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत – पी.डी.पाटील सर धरणगांव लक्ष्मण पाटील: महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आनोरे गावात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरी तुकाराम महाजन यांनी केले. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. वैचारिक प्रबोधनाचे प्रमुख वक्त्यांचा परिचय पिंप्री चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सतीश शिंदे सर यांनी करून दिला. प्रथमतः वक्ते पी.डी. पाटील यांनी तात्यासाहेबांचा जीवनपट…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे संचालक नवल पाटील यांचे सुपुत्र प्रमोद पाटील यांची आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर्मी जवान प्रमोद पाटील यांनी त्यांची ९ महिन्यांची ट्रेनिंग बंगळुरू (कर्नाटक) येथे पूर्ण केली. प्रमोदची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे झालेली असून देशसेवेसाठी ते आज रवाना होत आहेत. त्यांचे वडील नवल पाटील यांनी अतिशय कष्टमय जीवनाच्या संघर्षमय प्रवासातून प्रमोदची जडणघडण केली. रसवंती, सेंटिग काम, शेतीची कामे अशी अनेक कष्टाची कामे करून हलाखीच्या परिस्थितीत वडिलांनी मुलाला शिक्षण दिले. मुलाने देखील आई – वडिलांच्या कष्टाचे चीज केले आणि सैन्यात भरती…
धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील N S S व रोव्हर रेंजर तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पाजली वाहन्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.बी.एल. खोंडे यांचा हस्ते माल्यर्पण करण्यात आले. वरिष्ठ शिक्षक प्रा.डी.डी. पाटील, प्रा.ए.आर. पाटील, प्रा.एस.आर. पाटील, प्रा. एम. एस. कांडेलकर, माजी N S S कार्यक्रम प्रमुख प्रा.आर.जे. पाटील मॅडम, प्रा. अमित बागुल, प्रा.एन.डी. सोनवणे, प्रा.व्ही टी. बिराजदार, सौरभ डहाडे आदी नी गुलाब पुष्प वाहिली. N S S विभाग तर्फे कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.सी. साळवे, सहाय्यक कार्यक्रम अधीकारी प्रा.एस.झेड. पाटील, प्रा.यू.व्ही. पाटील, सहाय्यक महिला कार्यक्रम…
मुंबई वृत्तसंस्था : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी समुदायाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. याद्वारे राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती मिळाली असून हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर २३ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता व्यक्ती केली जात होती. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यानंतर या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. याच्या सुनावणीचा निकाल आज लागला आहे. यात न्यायमूर्ती…

