Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील किनगाव येथील २७ वर्षीय तरूणाने प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील राजू महाजन हे पत्नी व दोन मुले आणि सुन असे वास्तव्याला आहे. शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २२ डिसेंबर रोजी सकाळी राजू पाटील हे पत्नी व लहान मुलगा योगेश आणि सुन असे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी त्यांचा मोठा अविवाहित मुलगा समाधान राजू महाजन (वय-२७) हा घरी एकटाच होता. घरी कुणीही नसतांना समाधान याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.…

Read More

अनुदानीत शिक्षणसेवक पदासाठी मागीतली २ लाख ३० हजारांची ‘लाच’ लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :जळगाव येथील आर.आर.विद्यालयात विनाअनुदानीत तत्वावरून अनुदानीत शिक्षण सेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी तब्बल २लाख,३०हजार रूपयांची लाच मागीतल्याप्रकरणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे  याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील आर.आर.माध्यमिक विद्यालयात तक्रारदार यांचे भाउ शिक्षणसेवक म्हणून सन २०१४ पासून कार्यरत आहेत. त्यास अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपीक योगेश अशोक खोडपे, (रा.ममता राणे नगर,वाघनगर जळगाव,) याने १२ फेब्रुवारी २०२१ रोजी २ लाख ३० हजार रूपयांची मागणी वेळोवेळी करण्यात आली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान सांगली येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद ज्युनियर गटातील ३३व्या मुले व १७ व्या मुलींच्या स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशन मधुन ४४-४६ किलो वजनगटात साक्षी मोरे, ४८ ते ५० किलो वजनगटात सेजल पाटील , ५० ते ५२ किलो वजनगटात गार्गी पाटील, ६० ते ६३ किलो वजनगटात अलिशा शेख व ७० ते ७५ किलो वजनगटात देवशीष चांगरे यांची निवड करण्यात आली . प्रशिक्षक म्हणून निलेश बाविस्कर, विशाल सोनवणे व व्यवस्थापक म्हणून टहेमटन जलगाववाला काम पाहत आहेत. खेळाडू व प्रशिक्षकांचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मा. मिलिंद दिक्षीत, एकलव्य…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका मुलाला मुलीसोबत काही इसम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे याबाबत पोलिसांनी मरण झालेल्या युवकाचा शोध घेऊन त्याच्याकडून जबाब लिहून घेतला असून मारहाण करणाऱ्या मुलांचा शोध पोलीस घेत आहे. गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर  तरुण-तरुणींना काही तरुण जबर मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही दोघं सोबत का फिरतात? या बद्दल विचारणा करून तरुण तरुणीला गावगुंडांनी जबर मारहाण केल्याचा या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हे तरुण तरुणी सोबत फिरत असताना अचानक येऊन त्यांना जंगलात घेऊन जात लाकडी दांडक्याने मारहाण केली. सदर तरुणांच्या डोक्यात फरशी टाकत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील चमगाव गावाजवळील शिवारात असलेल्या नदीच्या काठावर बिबट्याने एका वासरूचा फडश्याप पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. सविस्तर माहिती की, गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत पाचवी घटना घडली असून याकडे वनविभागाकडून कारवाईची उदासिनता दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करून घेवून पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जाते. बिबट्याला पकडून जेरबंद करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुलक्ष केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्यामुळे एखाद्या पुरूषाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण राहील असा सवाल केला जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी धरणगाव तहसीलदार नितींकुमार देवरे यांच्याकडे तक्रार…

Read More

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याच्या वतीने लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : विशेषांक प्रकाशन समारंभ अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय जळगाव येथे पार पडला, त्या प्रसंगी डॉ.मिलींद बागुल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.अनिल लोहार हे होते.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिरीष चौधरी व कल्पना चौधरी यांनी केले. डॉ.मिलींद बागुल यांनी श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य आपल्या संविधानात आहे पण सध्या स्वैराचार पहायला मिळते आणि सोबतच कायद्याचा आदर करण्याचा आग्रह केला.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका ही समाजाची किड दुरुस्त करण्याचे काम करीत आहे असेही सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अनिल लोहार यांनी श्रद्धा, अंधश्रद्धा व विश्वास समजून घेण्यासाठी कार्यकारणभाव व वैज्ञानिक दृष्टिकोन…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : स्थानीय महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील गणित शिक्षक सी.एम.भोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर.सोनवणे ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे पर्यवेक्षक जे.एस.पवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील गणित विषय शिक्षिका एम.जे.महाजन यांनी रामानुजन यांचा जीवन संघर्ष सांगितला. त्यांच्या भौमितिक रचना, प्रमेय आणि गणितावर असणारे नित्तांत प्रेम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणित दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये रांगोळी, रंगभरण, हस्तकला स्पर्धेचे आयोजन केले होते. परीक्षक म्हणून शाळेतील कलाशिक्षक हेमंत माळी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : घरात काम करणार्‍या मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात वृत्त असे की, राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) या वकिलाच्या घरी पीडित महिला मोलकरणी म्हणून काम करीत होती. या दरम्यान त्याने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. यातच त्या महिलेचे आधी चित्रीत केलेले व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी देखील केली. या अनुषंगाने पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान झाले. 17 जागांपैकी 13 जागांसाठी मतदान होणार असून 4 जागांची निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे रद्द करण्यात आली आहे. तर 13 जागांसाठी साठी 53 उमेदवार रिंगणात असून 26 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. या निवडणुकीच्या माध्यमातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे.  प्रभाग क्रमांक 11 व 12च्या मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत त्याठिकाणी तळ ठोकून होते.सकाळी मतदानाला संथ गतीने सुरू होते मात्र दुपार नंतर रांगा लागल्या होत्या तर प्रभाग क्रमांक 11 व 12 मध्ये 6.30 वाजेपर्यंत मतदान झाले  72 टक्के मतदान झालं…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील : जळगाव तालुक्यातील विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी यांचे नातू वैद्यकीय शिक्षणासाठी नाॅरदन स्टेट युनिव्हर्सिटी  मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी 24 रोजी रवाना होणार आहेत परिसरातून त्यांना भावी शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी हरिसिंग झिपरूसिंग राजपुत यांचे नातु व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांचे पुतणे तसेच डॉ.विनोद राजपुत यांचे चिरंजीव आहेत यांनी जळगाव येथे १२ सायन्स चे शिक्षण घेतले आहे   पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी रसिया येथील नाॅरदन स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये घेणार आहे त्यासाठी  २४ रोजी  मुंबई येथुन विमानाने रवाना होणार आहे.

Read More