धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खर्दे येथे पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठाबाई नामदेव जाधव रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड हल्ली मुक्काम खर्दे तालुका धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, विठाबाई जाधव ह्या पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विठाबाई जाधव या घरी असताना पती नामदेव जाधव याने विट भट्टीसाठी कोळसा व गवत आण असे सांगत होता. त्यावेळी पत्नी ही दारू…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात गेल्या आठवड्यापासून उपचारार्थ दाखल असलेल्या एका ४५ वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलीस नाईक भरत चव्हाण पंचनामा केलेा. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथे लग्नासाठी आलेल्या दाम्पत्याचे सुमोर ६ लाख ४९ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, पंढरीनाथ गंगाराम पाटील (वय-५१) रा. गोंडगाव ता. भडगाव जि.जळगाव ह.मु. उल्हासनगर जि. ठाणे हे चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथील धनराज उत्तम पाटील यांच्या घरी लग्नाच्या निमित्ताने १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आले होते. लग्न आटोपून ते धरणगाव तालुक्यातील एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचे साडेसहा लाखाचे २७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका बँगमध्ये ठेवले होते. ते दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी ३५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. गावातील गणेश भागवत मोहिते याने ३१ डिसेंबर रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान महिलेच्या घराच्या खिडकीतून आत आला. संशयित आरोपी गणेश भागवत मोहिते (वय-३२) हा महिलेला चाकूचा धाक दाखवून महिलेला तिच्या घराच्या खिडकीतून बाहेर ओढत नेले. घराच्या बाजूच्या बांधकाम चालू असलेल्या घराच्या रूममध्ये घेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील टागोरनगरातील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचा छळ करणार्या पतीसह पाच जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील टागोरनगरातील माहेर असलेली ज्योती राहूल खरे (वय ३०) यांचे महाबळ परिसरातील समता नगरातील राहूल खरे यांच्यासोबत २५ मे २०११ रोजी विवाह झाला आहे. लग्नानंतर १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पती राहूल भिका खरे यांच्या सासरकडच्या मंडळींनी वेळोवेळी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. त्रास असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या होत्या. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पती राहूल भिका खरे, सासरे भिका भावडू खरे, सासू चंद्रकला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा स्पार्किंगमुळे शेतातील ऊसाला आग लागली. या आगीत दोन जणांच्या शेतातील सुमारे १० लाख रुपयांचा ऊस जळून खाक झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात नोंद करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील वाहिद रज्जाक पिंजारी वय-४३ रा. म्हसावद हे शेतीकरुन उदनिर्वाह करतात. त्यांचे नशिराबाद शिवारात शेत असून गुरुवारी ३० रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काम करीत होते. याचवेळी त्यांच्या शेतालगत असलेल्या भुषण भागवत राणे यांच्या शेतातून विजेचे तार गेले आहे. वादळामुळे वीजतारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि त्यामुळे राणे यांच्या शेतातील ऊसाला आग लागली. बघताच आगीने रौद्ररुप धारण करीत शेजातील वहीद पिंजारी यांच्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथील आ. संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्र्यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याबाबत आ. सावकारे यांची आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे तक्रार करु चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या फिर्यादीवरुन जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची (एम.एच.१९-सी-झेड-५१३०) या क्रमांकाची टोयोटा कंपनीची अलिशान गाडी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी परिवहन विभागाच्या पोर्टलवर अनधिकृतपणे प्रवेश करीत बनावट स्वाक्षरी, बनावट कागदपत्रांच्या आधारावर चक्क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्स्फर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार…
लाचखोरी मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर पोलीस विभाग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लाज देणे व घेणे हे कायद्याने गुन्हा असला तरी मोठ्या प्रमाणावर लाज घेतली जाते जळगाव जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईमध्ये लाच प्रकरणांमध्ये पोलीस विभागातील कर्मचारी सर्वाधिक पकडले गेले आहे त्यानंतर महसूल विभागाचा नंबर लागत आहे ज्यांच्यावर सुरक्षेची मदार आहे तेच लाचखोरी मध्ये तेच लाच खोरी मध्ये पुढे गेलेले दिसत आहे. शासकिय कार्यालयात अनेक योजना असोत वा कर्मचारी अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीसह, कायदे कज्जे, खटले, शेती, उद्योग, सेवा लाभांची प्रकरणे मार्गी लागण्यासाठी अनेकांकडून आर्थीक लाभाची अपेक्षा ठेवून काम करणार्या ३३ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी…
प्रतिनिधी प्रविण पाटील । एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बळीराम सपकाळे हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बळीराम सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे साहेब, कटारे, पोलिस उपनिरीक्षक जगदाळे तसेच गिरासे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रतिलाल पवार, महेंद्र गायकवाड, सतिष गरजे, सचीन मुंढे आणि पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील प्रदीप पाटील हे उपस्थित होते.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र प्रभाकर जावळे (वय-३१) रा. भालोद ता. यावल असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र जावळे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोधाशोध केली पंरतू आढळून आला नाही. दरम्यान भालोद-बामणोद रोडवर एकविरा देवीच्या मंदीराजवळ असलेल्या अशोक चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी रविंद्र जावळे याने…

