Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नुतन मराठा महाविद्यालयात सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्राध्यापक प्रबोधिनीच्या ‘कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा’ या उपक्रमाचा सुरूवात करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पणासह विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी व्यासपीठावर नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, कवयित्री, लेखिका पुष्पा साळवे, संगीत विशारद विशाखा देशमुख, कमलिनी बचत गटाच्या किरण वनकर, अ‍ॅड. बोरसे उपस्थित होते. हा उपक्रम ३ ते १२ जानेवारी दरम्यान सुरू राहणार असून, यात क्रांतिज्योती सावित्रीबाई ते राजमाता जिजाऊ यांच्यासह महाराणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगरातील एका दुकानातून ७ हजार रूपये किंमतीचे कलरच्या बादल्यांची चोरी प्रकरणी तीन जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकाउटंट विजेंद्र श्रावण सोनवणे, हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, आणि रफिक पिंजारी असे अटक केलेल्या संशयित तिन्ही आरोपींची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, कल्पेश प्रवीणचंद्र वेद (वय-५०) रा. विसनजी नगर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. विसनजी नगरातील राजेश टेन्ट हाऊसच्या गल्लीत असलेले श्रीनाथजी एजन्सी नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी हा दुकानावर नोकरी करतो. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानावर…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी दि. ३ जानेवारी जनसंपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच, रुग्णालय व महाविद्यालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले असून लवकरच दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यानंतर सुधारणांना सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी बंद झालेला जनसंपर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी सुरु करण्यात आला. सोमवारी ओपीडीमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी गर्दी केली होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी दररोज येत आहेत. रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्र. १ समोर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । वाकोद शिवारातील वाघुर नदीच्या पुलाजवळ ३० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ट्रक आडवून चालक व क्लिनरला लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती अशी की, ३० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाकोद शिवारातील वाघुर नदीच्या पुलाजवळून जळगावच्या दिशेने रिकामी ट्रक (एमएच १९ सीवाय ६३८६) येत होती. त्यावेळी दोन मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात लुटारूंनी ट्रक अडविलाट्रकचालक व क्लिनर या दोघांना त्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळ असलेले २ मोबाईल जबरीने हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील दहीगाव येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावलपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दहीगाव येथील सुरेश आबा नगर यावल रस्त्यावर राहणाऱ्या उच्च शिक्षीत तरूणी सुजाता संतोष पाटील २० वर्ष हिने रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी आपल्या राहत्या घरात तिने काही तरी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (वय-४८) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : । तालुक्यातील रायपूर फाट्यावर हातात तलवार घेवून दहशत माजविणार्‍या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याच्या ताब्यातील तलवार जप्त करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शहा शरीफ शहा वय २० रा. रायपूर, कुसूंबा ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना रायपूर फाट्यावर २० वर्षीय तरूण हा तलवार घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, हेमंत कळस्कर, योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सिध्देश्‍वर डापकर, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने कारवाई करत तलवारीसह संशयित समीर शहा याला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुका पोलीस संघटनेची नुकतीच वार्षीक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यात संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अशोक पाटील यांची पुनश्च फेरनिवड आली तर संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रफुल्ला चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती रविवारी २ जानेवारी दुपारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली.यावल येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शनिवार १ जानेवारी २०२२ शनिवार रोजी दुपारी पोलिस पाटील संघटनेची बैठक घेण्यात आली याप्रसंगी खान्देश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अजीज शेख…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीने आपली कुटुंब प्रमुखाची जबाबदारी समजून गावात कोणताही बालक कुपोषित बालक राहू नये या भावनेतून रविवारी २ जानेवारी रोजी गावातील १० कुपोषित बालके दत्तक घेवून त्यांना सदृढ बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने आदीवासी भागातील बालकांसह कुपोषित बालकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. परंतू सर्वच योजना गरजूंपर्यंत पोहचन नसल्याने आपण गावाचे कुटुंब प्रमुख असल्याची भावना ठेवून गावातील काही कुपोषित बालकांना दत्तक घेवून त्यांनी सुदृढ बनविण्याचा उपक्रम हाती घेण्याच्या कामासाठी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यावेळी गावातील १० कुपोषित बालके दत्तक घेतले आहे. या बालकांचा शारिरीक विकास…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव तालुक्यातील भादली येथील ३५ वर्षीय तरूणाने रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीला आली आहे. नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील भागवत फेगडे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. फेगडे हे पेट्रोल पंपावर काम करुन उदरनिर्वाह करीत होते. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून भादली रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे खंबा क्रमांक ४२८/२ जवळ धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. काही वेळातच परिसरातील नागरीकांनी मृतदेहाची ओळख…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल फैजपूर रोडवरील एका हॉटेलच्या परिसरात गावठी पिस्तुल व काडतूस बाळगणाऱ्या संशयित आरोपीला रविवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी यावल पोलीसांनी अटक केली आहे. गावठी पिस्तूल व काडतूससह दीड लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित युवराज घारू (वय-२१) रा. श्रीरामनगर यावल असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल-फैजपूर रोडवरील हॉटेल अंजली समोरील एका पानटपरी जवळ संशयित आरोपी सुमित घारू हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. यावल पोलीस ठाण्याचे पथक रविवारी…

Read More