नवी दिल्ली ; वृत्तसंस्था यूटरसला इन्फेक्शन झाल्यावर एक महिला नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी गेली. तिथे डॉक्टरने तिच्या दोन्ही किडनी काढल्या आणि फरार झाला, त्या महिलेला तीन मुल आहेत. मोठ्या विश्वासाने ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, तिथेच तिच्या दोन्ही किडनी चोरी करण्यात आल्या. इतकंच नाही तर ज्या पतीने आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन दिलं होतं तोही सोडून गेला. तीन मुलं आहेत. मजुरी करून मुलांचं पालन पोषण करत होती. आता हॉस्पिटलमध्ये भरती आहे. शेवटचे दिवस मोजत आहे. माहीत नाही किती दिवस जगू शकेल. पण माझी चूक काय होती. माझ्यानंतर या मुलांचं काय होणा? ते कसे जगतील? बिहारच्या मुजफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती सुनीतासोबत झालेली घटना…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७ रोजी घडली. दरम्यान, विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोनवरून ‘आई आई माझ्या निलला न्याय दे जो’ अशी आर्त हाक घातली. पिढीजात संपत्तीत हिस्सा न देण्यासाठी तिचा छळ केल्याचे समोर आले असून पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरे या तरुणीचा २१ मार्च २०१६ रोजी नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर यांच्यासोबत विवाह झाला होता. जुनी महानगरपालिका, मेन रोड येथे सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय…
मुंबई : वृत्तसंस्था अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या २०२२ ते २०२५ या सालाकरीता नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली. त्याप्रमाणे अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे, वि. उपाध्यक्ष पदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ) सरचिटणीस पदी प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष पदि – प्रमोद बळवंत जाधव, वि. चिटणीस पदी अतिश गायकवाड यांची निवड निर्णय अधिकारी अँड प्रविण गोगावले यांनी वाचून दाखविली व त्यास मराठा महासंघाच्या सर्व साधारण सभेने राज्यांच्या मंजुरी दिली. सदर निवडणूक प्रक्रियेस काही व्यक्तीनी मुंबई सत्र न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई येथे अर्ज केले होते. त्यास स्थागिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आज दि. २९/०१/२०२३ रोजी पंढरपूर येथे सर्वसाधारण…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील बहुचर्चित असलेला अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आज देशातील दिग्गज नेत्यासह संत महात्मे उपस्थित राहणार आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाला आहे. जळगावमधील महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. परंतु आता ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी…
केद्र सरकारने देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर या योजनेचा त्यांना लाभ मिळेल का? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नियमानुसार, हप्ते घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याचा कोणताही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदाराला या योजनेतील रक्कम मिळत राहील. ही रक्कम मिळवण्यासाठी वारसदाराला काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतील. या अटी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था परिवारातील सातत्याने होणारे वाद मोठ्या टोकाला जात आहेत. अशीच एका पती आणि पत्नीमध्ये झालेले भांडण मोठ्या टोकाला जात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात हि घटना समोर आली आहे. पती-पत्नी वादातून भांडणं होणं ही काही नवीन बाब नाही. कधी कधी वाद वाढला तर एकमेकांना मारहाणही केली जाते. पण इथे रात्री घरी यायला इतका उशीर का झाला? असं विचारणाऱ्या पतीवर पत्नीने अॅसिडने हल्ला केला. ज्यामुळे पतीचा चेहरा गंभीरपणे भाजला गेला. पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोपरगंजची ही घटना आहे. पत्नी रात्री उशीरा घरी आली तेव्हा पतीने तिला उशीरा येण्याचं कारण विचारलं.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून भरदिवसा चारचाकीच्या बोनेटवर ठेवलेली महिलेची पर्स चोरी झाली आहे. यात महिलेचे तब्बल ४ लाख ३७ हजाराचा मुदेमाल लंपास झाला असून या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील तळेले कॉलनीतील रहिवासी असलेल्या मनीषा पाटील (वय ४२) या दि २८ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या चारचाकीच्या बोनेटवर ठेवलेली पर्स अनोळखी चोरट्यांनी घेवून पसार झाले आहे. या पर्समध्ये तब्बल ३ लाख ८७ हजाराचे सोने व चांदीचे दागिने तर १० हजार रुपये किमतीचा मोबाईल यासह ४० हजार रुपये रोकड त्यासोबत चारचाकी गाडीचे आर.सीबुक यासह महत्वाची कागदपत्र चोरून नेले…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अतिशय महत्वाची मानली जाणारी निवडणूकित नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तर येत्या 2 तारखेला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे या पाचही निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अधिकच हायटेक ठरली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने अजूनही जाहीर पाठिंबा दिला नाही. तांबे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तांबे गुलाल उधळणार की पाटील? याकडे सर्वांचं…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मुख्य चौकात एका २५ वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील सुभाष चौक परिसरात दि २९ रोजी दुपारच्या सुमारास शहरातील एका परिसरातील २५ वर्षीय महिला रस्त्याने चालत असतांना एका रिक्षात महिलेची साडी अडकून गेली त्यामुळे साडी फाटल्याने महिलेने संबधित रिक्षाचालकाला जाब विचारला असता संशयित आरोपी गयासोद्दीन रफीओद्दीन शेख याने महिलेची माफी न मागता उलट महिलेला अश्लील शिवीगाळ करीत महिलेच्या अंगावर धावून गेला व महिलेचा हात धरीत तिच्या कानाखाली मारून तिला लोटून दिले. या प्रकरणी फिर्यादी महिलेने तत्काळ शनिपेठ पोलीस स्थानक…
जळगाव : प्रतिनिधी गोद्री ता.जामनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबना व नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान सूरू आहे. परंतु समाजाचा कार्यक्रम हा सरकारी खर्चाने कसा काय होत आहे. या कुंभाच्या नावाने मोठा भ्रष्टाचार होत आहे असे खुद्द बंजारा समाजाच्या राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या सदस्यांनी केला आहे. यात मंत्री गिरीश महाजन यांच्या ठेकेदाराचे खिसे याद्वारे भरले जात आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. गोद्री ता.जामनेर येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबना व नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान सुरू आहे. सोमवारी या कुंभाचं शेवटचा दिवस असून या कुंभात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…

