नेहमीच आपल्या हटके स्टाईलने प्रख्यात झालेली अभिनेत्री उर्फी जावेदची असते त्यावेळी मात्र कुणाची काही बोलण्याची ताकद नसते. याला कारण उर्फीचा बोल्डनेस हा सगळ्या मर्यादा ओलांडणारा असतो. आता तर तिनं एका व्हिडिओमध्ये कहर केल्याचे दिसून आले आहे. टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये उर्फी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आतापर्यत तिनं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं फोटोशुट तिच्या चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या त्या फोटोंवर दिलेल्या कमेंट्स देखील इतक्या भन्नाट आहेत की त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे. मात्र याचा कोणताही फरक उर्फीवर पडलेला नाही. काही दिवसांपूर्वी उर्फीला एकानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती चर्चेत आली…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय विवाहितेला संशयित आरोपी गणेश गोकुळ अहिरे यांनी दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास विवाहितेच्या घराच्या मागील बाजूस जाऊन व विवाहितेस म्हणाला की तू मला खूप आवडते माझ्यासोबत चल असे बोलू लागला त्यावर विवाहितेने त्याला येथे येऊ नको नाहीतर मी माझ्या पतीला हे सर्व सांगेल याचा मनात राग आल्याने त्यांने विवाहितेशी अश्लील हा भाव करीत तुला व तुझ्या मुलीला घरी कुणी नसताना मारून टाकेल अशी…
औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यात सुरु असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत विभाग नेहमी प्रयत्नशील असतांना दिसून येत असते पण त्यांच्याही डोळ्यावर धूळफेक करीत शासकीय कर्मचारी लाचेची मागणी करीत असतात, असेच एक प्रकरण उजेडात आले आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितली होती. तर लाचेच्या मागणीसोबतच जेवणासाठी दोन हजारांची लाच मागितली असता तडजोड अंती ‘फोन पे’वरून १५०० रुपये घेतांना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विजय पवार (पोलीस नाईक ब.न. 450, नेमणूक बिडकीन पोलीस स्टेशन, औरंगाबाद ग्रामीण) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर यासाठी मध्यस्थी…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फूस देत पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात एरंडोल पोलिसात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय गणेश अहिरे हे करीत आहे.
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीच्या साखरपुड्यात एका विवाहित तरुणाने राडा घालत तरुणीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, पारोळ्या तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेली बावीस वर्षीय तरुणीला संशयित आरोपी मिलिंद सुभाष देवरे यांनी दिनांक ९ डिसेंबर २०२२ पासून तर आजपर्यंत वारंवार लग्नाचे आम्हीच देत युवतीला मंगळसूत्र घालून सेल्फी फोटो घेतला होता. त्यानंतर तरुणीला सांगितले की मी माझ्या बायकोला फारकती देऊन तुझ्याशी लग्न करेल व तरुणीला प्रेम करण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीचा साखरपुडा असल्याने त्या ठिकाणी जात तरुणीच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत व तरुणीस सेल्फी…
औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यात हिवाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधाऱ्यामध्ये चढाओढ पाहायला मिळत असतांना दुसरीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे. भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील,…
नागपूर : वृत्तसंस्था नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात याबाबत लक्षवेधी मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे त्यांच्या विरोधात आता एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब विखे यांनी दिले आहे. मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर येथील गौण खनिजामध्ये राज्य सरकारचा ४०० कोटीचा महसूल बुडवला आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या जळगाव दूध संघ निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नीचा मोठा पराभव झाल्याने दूध संघावरील पकड आता कमी झाल्याचे बोलले जात आहे. भाजपेचे नेते गिरीश महाजन आणि…
नागपूर : वृत्तसंस्था कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करत सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेत अनिल परब यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले. याप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश खुंटीला टांगून अब्दुल सत्तार यांनी मौजे गोडबाभूळ (ता. जि. वाशीम) येथील गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचे एका व्यक्तीला वाटप केले. या जमिनीची किमंत साधरणतः दीडशे कोटी रुपये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा निर्णय अवैध पत्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे संरक्षण करीत असताना शहीद झालेल्या जवानाच्या परिवारातील बहीण आणि मुलींनाही आता अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी मिळू शकणार आहे. लष्करात सुरू असलेल्या सुधारणांच्या कामात हा पुढाकार घेतला जात आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या शिफारशीनंतर सरकार यावर गांभीर्यानं विचार करत आहे. समितीनं अशी नियुक्ती लिंगभेद न करता करण्याची शिफारस केली होती. त्यात म्हटलंय, शहीद जवानाचा मुलगा, भाऊ अथवा मुलगी आणि बहिणीला अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी दिली जावी, असं नमूद केलंय. सध्याच्या नियमांनुसार, ‘जेसीओ (JCO) किंवा कोणत्याही दर्जाचा जवान युद्धात मारला गेला तर लष्कर त्याच्या एका मुलाला ताबडतोब सैन्यात नियुक्त करतं. पण, कन्येची नियुक्ती करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७० हजाराचे पशुधन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अचलवाडी या गावातील रहिवासी नरेंद्र विश्वास पाटील यांच्या अंगणातून दिनांक २४ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची जर्सी गाय व तीस हजार रुपये किमतीची असलेली जर्सी गाय असे दोन पशुधन ७० हजार रुपये किमतीचे अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेका जनार्दन पाटील हे करीत आहे

