Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला डॉक्टरने रागवले ; नर्सच्या मित्राने केला जीवघेणा हल्ला !
    क्राईम

    महिला डॉक्टरने रागवले ; नर्सच्या मित्राने केला जीवघेणा हल्ला !

    editor deskBy editor deskDecember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत चालली असून नाशिक येथे छोट्या मोठ्या कारणावरून गुन्हे घडत आहे. नुकतीच एका धक्कादायक घटना घडली आहे. नर्स मैत्रिणीला महिला डॉक्टरने रागावल्याच्या कारणावरुन त्याच रुग्णालयातील वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणाचा व्हिडिओ आज समोर आला आहे. याप्रकरणी वॉर्डबॉयवर गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

    नाशिकच्या निम्स् हॉस्पिटल येथे काम करणाऱ्या संशयित अनिकेत डोंगरे नावाच्या वाॅर्ड बाॅयने कात्रीने वार केले. निमसे हॉस्पिटलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दवाखान्यातील कात्रीने डॉ. आव्हाड यांच्या मानेवर उजव्या बाजुस व पोटावर वार केले. यामुळे डॉ. आव्हाड जखमी झाल्या आहेत.त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    या संशयित आरोपीची मैत्रीण त्याच दवाखान्यात नर्स म्हणून कामाला आहे. तिला डॉ आव्हाड यांनी काही कारणामुळे रागावले होते. त्याच गोष्टींचा राग त्यांच्या मनात होता. वॉडबॉय रुग्णालयात काम करत असताना रुग्णांच्या युरिन बॅग व्यवस्थित ठेवल्या नसल्याच्या कारणातून डाॅ.आव्हाड यांनी अनिकेतला जाब विचारला. घटना घडल्यानंतर संशयिताला इतर कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवले होते. गंगापूर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
    अनिकेत स्वच्छता करत असतांना डाॅ. आव्हाड त्याला बोलत होत्या. अचानक संशयिताने रुग्णाच्या बेड जवळ असलेली कात्री उचलून डाॅ. आव्हाड यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात डाॅ. आव्हाड यांच्या पोटात, मानेवर कात्रीने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या, दवखान्यात घडलेल्या या प्रकाराने उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वरिष्ठ निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.