Author: editor desk

एरंडोल : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा निर्घृण खून असल्याचे स्पष्ट होत असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार,  बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना जंगल परिसरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत महिलेचा देह कंबरेपासून वरच्या भागात पूर्णपणे जळालेला असून, त्यामुळे तिची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल…

Read More

रावेर : प्रतिनिधी  रावेर-विवरा रोडवर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना आज दि. ४ रोजी दुपारी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त असे की विवरे खुर्द येथील शुभम गजानन लोखंडे हा त्याच्या आजीसह मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी ए ८८४५ या मोटरसायकलने विवरे खुर्द येथून रावेर येथे येत असताना रावेरकडून विनय विजय भालेराव (रा. कोळोदा) हा मोटरसायकल क्रमांक एमएच १९ डीएस ५३२३ ने जाताना येथील मात्राण नदी पुलाजवळ विनय भालेराव यांच्या मोटरसायकलीने समोरील येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे या अपघातात शुभम गजानन लोखंडे (वय २०) व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सोबत फिरायला चल असे सांगून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरत येथे नेऊन तिच्यावर राहुल रमेश राठोड (२५, रा. पिंप्राळा) याने अत्याचार केला. हा प्रकार ३० जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातीलच राहुल राठोड याने फिरायला जायच्या बहाण्याने २९ जानेवारी रोजी सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. तेथे ३० जानेवारी रोजी रात्री त्याने मुलीवर अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडित मुलीने जळगावात आल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका २७ वर्षीय तरुणीला शेअर मार्केटमध्ये आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख रुपयांत फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लग्नासाठीही संशयिताने दबाव टाकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याबाबत संशयित सिद्धांत मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याला अटक केली आहे. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धांत हेडा याने तरुणीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून तिच्या डिमॅट अकाउंटची माहिती घेतली. त्यानंतर त्या अकाउंटमधून तसेच क्रेडिट कार्डचा वापर करून आरोपीने सुमारे १० लाख रुपये लंपास केले. आर्थिक फसवणुकीनंतर आरोपीने…

Read More

आजचे राशिभविष्य दि.५ फेब्रुवारी २०२६ मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. कामाचं ओझं वाढू शकतं, परंतु तुमच्या कष्टांमुळे आणि समर्पणामुळे तुम्ही ते वेळेत पूर्ण करू शकाल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला अधिक नियोजन करणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम बाळगा. आपल्या आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण स्नायू दुखण्याची समस्या होऊ शकते. मित्रांसोबत संध्याकाळी बाहेर जाणे ताजेतवाने करणारे ठरेल. आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकात आज आपल्याला कुटुंब आणि पालकांसाठी वेळ काढावा लागेल. वृषभ राशी या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतीपूर्ण दिवस असेल. व्यावसायिकांना मोठा व्यावसायिक करार मिळू…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एक कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये थेट जीवे मारण्याची भाषा वापरण्यात आल्याचे ऐकू येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलन पेटवले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचाही मुद्दा सातत्याने उपस्थित केला होता. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनाक्रमामुळे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यातील राजकीय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत पलटवार केला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करताना पवार म्हणाले की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. मात्र त्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी नव्हते. “मग त्या चर्चेबाबत बोलण्याचा त्यांना काय अधिकार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भारत–अमेरिका नव्या व्यापार करारावरही चिंता व्यक्त केली. या कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय शेतकरी आणि…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था  लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्यात येणार आहेत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ज्या उमेदवाराच्या मागे महिला उभ्या राहतात, त्याचाच नंबर पहिला लागतो, असे सांगत त्यांनी महिलांना मतदानाचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज तुमच्याकडे विनंती करायला आला आहे.” भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. “अशा दुःखाच्या काळातही आम्हाला प्रचाराला यावे लागते. निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात,” असे शिंदे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  कल्याण येथील मलंगगडावर जाणारी फ्युनिक्युलर ट्रॉली क्षमतेपेक्षा जास्त भाविकांना घेऊन जात असताना मध्येच अडकल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रॉलीतून प्रवास करणारे भाविक वाटेतच अडकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगडावर सध्या यात्रा सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत आहे. आजही दुपारच्या सुमारास मोठ्या संख्येने भाविक फ्युनिक्युलर ट्रॉलीत बसले. मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी ट्रॉलीत बसवण्यात आल्याने ती वाटेतच बंद पडली. यामुळे ट्रॉलीत असलेले भाविक मध्येच अडकले आणि सर्वत्र गोंधळ उडाला. विशेष म्हणजे मागील महिन्यात मोठ्या गाजावाजात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच, अपघातापूर्वी अजित पवार यांनी केलेल्या शेवटच्या फोन संभाषणाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी विमानातून शेवटचा फोन त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांना केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांनी साधलेला हा शेवटचा फोन संवादाची ऑडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवण्यात आली. श्रीजीत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळी समाजातील उमेदवार देण्यात न आल्याबाबत त्यांनी अजित…

Read More