Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  बारदान खरेदीसाठी ५०० रुपये चलनाच्या नोटा लागतील असे सांगत त्या उपलब्ध करून देण्यासाठी अस्सल नोटा घेऊन व्यापाऱ्याला मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन सहा लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २३ जानेवारी रोजी काव्यरत्नावली चौक परिसरात घडला. याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी तीन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारदान विक्रेते प्रकाश श्रीराम प्रजापत (५०, रा. प्रजापत नगर) यांना काही दिवसांपूर्वी रवींद्र तायडे नामक व्यक्तीने कॉल करून २ लाख बारदान विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्यानंतर दि. २३ जानेवारी रोजी तायडे एका साथीदारासह प्रजापत यांच्या घरी आला व व्यवहारासाठी प्रजापत यांना काव्यरत्नावली चौकात नेले. काव्यरत्नावली चौकात…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  येथील आदर्श शाळेनजीक घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत दोन निरागस बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांची औरंगाबाद खंडपीठाने मानवी दृष्टिकोनातून विचार करत जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श कन्या शाळेतील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे अंश सागर तहसीलदार (वय ३) व मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४) हे दोन चिमुकले शाळेजवळील संरक्षक भिंतीलगत असलेल्या नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना १६ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणी शाळा संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांतर्गत संस्थेचे मानद सचिव दीपक संभाजी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरात २९ जानेवारी रोजी पहाटे पत्नी व तिच्या प्रियकराने अपशब्द वापरल्याने दुखावलेल्या पतीने थेट रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर अजय भोई याला अटक करण्यात आली आहे. सुनील श्रावण भोई (३४) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. सुनीलची पत्नी दीपाली भोई (३०) व तिचा प्रियकर अजय छोटू भोई (३२) आणि त्याची आई सुरेखा छोटू भोई, अशी गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही जणांची नावे आहेत. आत्महत्येच्या घटनेची सुरुवातीला पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद होती. सुनील याचा भाऊ सागर श्रावण भोई यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या…

Read More

आजचे राशिभविष्य दि.४ फेब्रुवारी २०२६ मेष राशी जर तुम्ही आज सरकारी कामात धोरणे आणि नियमांकडे पूर्ण लक्ष दिले तर तुम्हाला काम करणे सोपे जाईल. आज तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत घाई करणे टाळावे लागेल. वृषभ राशी आज तुम्ही महत्वाचं काम हाताळण्यात खूप यशस्वी व्हाल. तुम्हाला प्रत्येक बाबतीत सकारात्मक राहावे लागेल. आज काही जुन्या समस्यांवर मित्रांसोबत चर्चा होईल, त्यातून तुम्हाला चांगला उपाय मिळेल. आज कौटुंबिक कामात तुमच्या पैशाची आवश्यकता भासेल. मिथुन राशी महिला आज ऑनलाइन नवीन पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करतील. वडिलांचा पाठिंबा तुमच्यासोबत असेल. लेखकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे, त्यांच्या लेखनाचे कौतुक केले जाईल. ऑफीसमध्ये काम करणाऱ्यांना महत्वाची जबाबदारी मिळेल. कर्क राशी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अशातच त्यांच्या अंत्यसंस्कारांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नसल्याचे त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व आवश्यक धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे यानंतर कोणताही स्वतंत्र दशक्रिया, दहावा किंवा तेरावा विधी पार पाडला जाणार नाही. विशेष म्हणजे, अजित पवार यांचा दशक्रिया विधी ६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अस्थि विसर्जनावेळीच परंपरेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आल्याने पुढील कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळेत लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या पंकजा मुंडे मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असून आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या विविध प्रचारसभा नियोजित होत्या. यासाठी त्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर हवेत झेप घेण्यापूर्वीच तांत्रिक अडचण आढळून आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेमुळे लातूरमधील त्यांच्या नियोजित सभांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. “अजित पवारांच्या निधनानंतर कोण, काय, कसे आणि कुठे—या सर्व प्रक्रिया नीट पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, हे स्पष्ट आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात आज स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल यांनी पक्षात कोणत्याही प्रकारचे विलीनीकरण होणार नसल्याचेही ठळकपणे अधोरेखित केले. त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत सुरू असल्याची चर्चा असलेले कथित विलीनीकरण आता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीवर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. ६ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कृषी उपअधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तक्रारदार हे जोगेवडगाव, ता. पाचोरा येथील शेतकरी असून त्यांनी शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नांगर व रोटर खरेदीसाठी पाचोरा कृषी कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जास मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी साहित्य खरेदी केले. त्यानंतर खरेदी केलेल्या साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करून अनुदान मिळवून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर येथे झालेल्या सभेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल आणि सरकारने दिलेला शब्द पाळला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे शेतात राबून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ खऱ्या अर्थाने गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. कर्जावर वाढत जाणारे व्याज आणि त्यावर पुन्हा आकारले जाणारे व्याज यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली जात असून आत्महत्येचा विचार करतात, असे नमूद करत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीचे राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेनेचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. ठाणे, कल्याण–डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महापौरपदाची धुरा महिलांच्या हाती देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही ठिकाणी महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिंदे यांनी आपल्या ‘लाडक्या बहिणीं’वर विश्वास टाकत महिलांना संधी दिली आहे. या निर्णयानुसार ठाणे महापालिकेसाठी शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण–डोंबिवलीसाठी हर्षाली थविल चौधरी, तर उल्हासनगर महापालिकेसाठी अश्विनी निकम यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी महिलांना संधी देत त्यांचे नेतृत्व बळकट करण्याचा हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा…

Read More