Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी वडिलांच्या उपचारासाठी त्यांना दुचाकीवरून जळगावकडे घेऊन जाणाऱ्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. घार्डी फाटा परिसरात अज्ञात ट्रॅक्टरने दिलेल्या भीषण धडकेत मोहम्मद लुकमान ठोके (वय ३९) आणि त्यांचे वडील लुकमान खा मुसे खा ठोके (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे चोपडा तालुक्यातील लासूर परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  चोपडा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी असलेले लुकमान खा ठोके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा मुलगा मोहम्मद लुकमान त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जळगावकडे घेऊन जात होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दोघे दुचाकीवरून लासूर-जळगाव मार्गावरून जात असताना, घार्डी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात एकाच वेळी मतदान सुरू असले, तरी अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांचा प्रतिसाद, मतदानाची टक्केवारी आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती याकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष दिले जात आहे. मतदानाला सुरुवात होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सकाळी लवकर काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार यांची कामाची शिस्त आणि पहाटे मतदान करण्याची परंपरा सर्वश्रुत होती. त्याच परंपरेचा आदर्श ठेवत सुनेत्रा पवार यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव ते चांदवड महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कार (एमएच-१७, बीएल-८८०८) ने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास पाचोरा–जळगाव महामार्गावरील हॉटेल पांडुरंग गार्डनजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात…

Read More

भुसावळ :  प्रतिनिधी शहरात सट्टा व इतर अवैध धंदे बंद असतानाही बिनधास्तपणे सुरू असलेल्या सट्टा जुगारावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात व्यायामशाळेच्या आडोशाला सार्वजनिक जागी सट्टा स्वीकारणाऱ्या एका इसमाला बाजारपेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत श्यामलाल दैलतसिंग बजाज (वय ५६, रा. नानक नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हा सट्टा बंद असतानाही लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्या कब्जातून २,१३० रुपये रोख रक्कम तसेच सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील अवैध धंदे २६ जानेवारीपर्यंत पूर्णतः बंद करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा नसल्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. परंतू मयताच्या पायाच्या नखावरील नेलपॉलीश आणि नाकातील सोन्याच्या ‘मुर्ती’ वरुन एलसीबीच्या पथकाला तपासाचा धागा गवसला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत मयताची ओळख पटवली असून तो मृतदेह महिलेचा नसून आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार खैरागड, छत्तीसगड) या तृतीयपंथीयाचा असल्याचे समोर आले आहे. प्रेमसंबंधासाठी तगादा लावल्यामुळे संशयित गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याने खून केल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रात दि. ४ रोजी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून…

Read More

आजचे राशिभविष्य दि. ७ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज काही अडचणी येतील, परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही उपाय शोधू शकाल. घरात सुव्यवस्था आणि देखभाल राखल्याने तुम्ही व्यस्त राहाल. एखाद्या जवळच्या प्रिय व्यक्तीला समस्येत मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या जोडीदारासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. कामावर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुमची प्रशंसा करतील. तुम्हाला एक चांगली भेट देखील मिळू शकते. वृषभ राशी तुमच्या क्षमता चांगल्या लोकांशी तुमचे नाते मजबूत करतील. कोणत्याही कामात मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहू नका; स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा; तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आर्थिक बाबीत विचार करून योग्य निर्णय घ्या. आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे नमाज पठण सुरू असताना एका मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या भीषण स्फोटात किमान 50 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार सुरुवातीला मृतांचा आकडा 10 असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले. जखमींना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) आणि CDA हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट पाकिस्तानात अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेहांचे अवयव विखुरलेले दिसून आले. प्राथमिक तपासात हा आत्मघातकी बॉम्बहल्ला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील अनेक पात्र महिलांना हप्ता न मिळाल्याने निर्माण झालेल्या असंतोषानंतर अखेर शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी दुरुस्तीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून लाभार्थी महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्ती करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने हजारो महिलांचे अनुदान थकले होते. यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये लाडक्या बहिणींनी मोर्चे काढून आक्रोश व्यक्त केला होता. या आंदोलनांची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने आदेश काढून ई-केवायसी पोर्टल पुन्हा कार्यान्वित केले आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसीद्वारे आधार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील 8 प्रमुख महापालिकांमध्ये आज महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह 6 महापालिकांत सत्ताधारी भाजपने महापौरपदावर आपला दावा मजबूत केला आहे. एका महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरला असून, उर्वरित एका ठिकाणी महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या महापालिकांमध्ये आज निवडणूक प्रक्रिया झाली. यापैकी सोलापूर, जळगाव व अहिल्यानगर येथे चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका ऐनवेळी बिनविरोध पार पडल्या. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेना व एमआयएमच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या सतराव्या महापौरपदी भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला मनोज काळे तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट) चे मनोज सुरेश चौधरी आज विशेष सभेनंतर विराजमान झाले. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. महापौर व उपमहापौर पदाची निवड जाहीर होताच महानगरपालिका परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. ढोल-ताश्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महापौर पदासाठी दीपमाला काळे यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. दोन्ही पदांसाठी कोणत्याही अन्य पक्षाकडून अर्ज दाखल न झाल्याने ही…

Read More