भंडारा : वृत्तसंस्था नशिबाने लादलेल्या अंधत्वाचा स्वीकार करून खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि ध्येयाचा ध्यास घेतला तर अशक्यही शक्य होते, हे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील कन्या ममता पंढरी नाकतोडे हिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘यूजीसी नेट’ परीक्षेच्या निकालात ममताने ‘योगिक सायन्स’ या विषयातून घवघवीत यश मिळवत JRF (ज्युनिअर रिसर्च फेलोशिप) आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे, या विषयातून संपूर्ण भारतात अंध प्रवर्गातून निवड झालेली ती एकमेव मुलगी ठरली आहे. ममता ही जन्मत: अंध नव्हती. वयाच्या १५ व्या वर्षी एका गंभीर आजारामुळे डोळ्यांच्या मागील पडद्याला (रेटिना) इजा झाली आणि तिची…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी पोलीस दल किंवा वन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघा तरुणांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये उकळून एकूण सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगोणे खुर्द (ता. चाळीसगाव) येथील घनशाम कैलास पाटील (वय ३०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घनशाम पाटील हे मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात. संशयित कुणाल भगवान डांगर (रा. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) याने पोलीस दल किंवा वन विभागात नोकरी लावून देऊ शकतो, असा दावा करत घनशाम पाटील, दीपक गोपीचंद…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात १ फेब्रुवारी रोजी झालेल्या किरकोळ वादातून घडलेल्या मारहाण प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुभम गजानन सपकाळे असे मृत तरुणाचे नाव असून, मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम सपकाळे हा प्रशांत पाटील चौक परिसरातून सार्वजनिक रस्त्याने जात असताना काही युवकांनी त्याला अडवले. कोणतेही ठोस कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील उर्फ बॉण्ड आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून शुभमवर लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली.…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील पोलिस पाटील मुकेश आनंदा तायडे (वय ३८) यांचा मृतदेह नांदवेल फाट्याजवळील जंगल शिवारात रस्त्याच्या कडेला बुधवारी (दि. ५) सकाळी सात वाजता आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती नांदवेल गावचे पोलिस पाटील अनिल वाघ यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुकेश तायडे हे पशुवैद्यकीय व्यवसाय करत असून मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी सेवा देत होते. नांदवेल गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतराच्या आत रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,…
आजचे राशिभविष्य दि.६ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. या राशीखाली जन्मलेल्या बिझनेसमनना अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आज तुमच्या पद्धती बदलल्याने तुमच्या कामामध्ये सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल होतील. तुम्ही उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील. जर तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. कामात घाई नको. वृषभ राशी आज नशीब तुमच्या बाजूने असेल, जे फायदेशीर ठरेल. तुमचे काम तुमच्या प्रयत्नांमध्ये गुंतलेले दिसेल. तुमची कार्यक्षमता तुम्हाला उत्कृष्ट कामे पूर्ण करण्यास सक्षम करेल. समस्येवर तोडगा काढण्यातही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अन्नदात्यासाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून, यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन टप्प्यांत, प्रत्येकी दोन हजार रुपये अशा स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता शेतकरी २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून हा हप्ता ४…
जळगाव : प्रतिनिधी दिनांक १ फेब्रुवारी रोजी पद्धमालय विश्राम गृह जळगाव येथे गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची बैठक केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर केंद्रीय उपाध्यक्ष रवींद्र पवार केंद्रीय महासचिव भगवान सोनार केंद्रीय खजिनदार ललित खरे सदस्य गणेश पाटील जोशीला पगारीया तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव डॉ दिलीप तिवारी व राजेश यावलकर यांच्यासह नवनियुक्त केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेशांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी प्रस्तावना सादर करताना आयोजित बैठकीचे उद्दिष्ट व आपल्या संघटनेचे देय्य धोरण स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणात पत्रकारांच्या अडीअडचणी…
सोलापूर : वृत्तसंस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात काल एक अजब आणि संभ्रम निर्माण करणारा राजकीय प्रसंग पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी आणि मोहोळ तालुक्यात घेतलेल्या सभांमध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांची उपस्थिती आणि त्याचबरोबर स्वतःच्याच पक्षाच्या चिन्हावरील उमेदवाराला मतदान न करण्याचे थेट आवाहन केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती गणाच्या निवडणुकीवरून सध्या शिवसेनेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे, तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रगती दगडे निवडणूक रिंगणात आहेत. महायुती असूनही एकाच गणातून दोन उमेदवार उभे राहिल्याने प्रचाराच्या…
मुंबई : वृत्तसंस्था संजय राऊत यांना ‘विश्वास’ हा शब्द उच्चारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी उभ्या हयातीत कुणावरही विश्वास ठेवलेला नाही. विश्वासघात करणे हा उबाठा आणि संजय राऊत यांचा डीएनए आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांसह उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार यांना सोबत घ्यायचे की नाही, हा निर्णय देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भाजप ठरवणार नाही. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि त्यांच्या नेतृत्वाकडून घेतला जाईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पद सध्या त्यांच्याकडे असून, त्या योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊतांना दोन भावांचे…
मुंबई : प्रतिनिधी अजित पवार यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक तपासासाठी सक्रिय करण्यात आला असून, त्यातील माहिती रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता वाढली आहे. विमान अपघातानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत आढळून आला होता. मात्र, त्यातील डेटा उघडणे ही अत्यंत संवेदनशील व तांत्रिक प्रक्रिया असल्याने ती विशेष तज्ञांच्या देखरेखीखाली राबवली जात आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यानची तांत्रिक माहिती, इंजिनची स्थिती, पायलट आणि कंट्रोल रूममधील संवाद, तसेच शेवटच्या क्षणांतील…

