Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी दिल्ली येथील भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील पोलिस एस्कॉर्ट वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील आठ जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता मेहरुण तलावाजवळील नेहरू नगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार मनोज तिवारी हे पा-रोळा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा असल्याने जिल्हा पोलिस दलातर्फे एस्कॉर्ट वाहन देण्यात आले होते. खासदार तिवारी यांना संभाजीनगर हद्दीत सोडून देऊन हे पोलिस वाहन जळगावकडे परत येत असताना हा अपघात झाला. मेहरुण तलावाजवळील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वर्षभरापासून धरणाव येथे बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या फरनाज हमीद रेझा (वय ३८) या इराणी महिलेसह तिच्या मुलाची भारतातून इराण येथे हकालपट्टी केली जाणार आहे. दि. ५ रोजी तीला जळगावाहून दिल्ली येथे रेल्वेने नेले जाणार असून त्यानंतर दि. ६ रोजी विमानाने तीला इराण येथे रवाना केले जाणार आहे. महिलेसह तिच्या मुलाला पाठविण्यासाठी त्यांचे विमानाचे तिकीटही काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात गेल्या वर्षभरापासून इराणी महिला आपल्या मुलासह वास्तव्यास होती. याबाबतची माहिती धरणगाव पोलीसांना मिळताच त्यांनी कुरेशी मोहल्ल्याती एका घरातून तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी इराणी महिलेला बेकायदेशीररित्या आश्रय देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.३ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी, एक सखोल योजना बनवा आणि तुमच्या पालकांचा सल्ला घ्या. सरकारी धोरणे आणि नियमांकडे बारकाईने लक्ष दिल्यास तुमचे काम सोपे होईल. घाई टाळा, हळू, शातंपणे निर्णय घ्या, काम करा. वृषभ राशी आज तुम्ही मित्रांसोबत जुन्या समस्यांवर चर्चा कराल, ज्यामुळे चांगला उपाय मिळेल. तुमचे पैसे कौटुंबिक बाबींवर खर्च होतील. तुमचे बोलणे गोड ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. लोकांशी गोड बोला, कठोर वाणी टाळा. मिथुन राशी आज तुमच्या भावा किंवा बहिणीशी फोनवर आनंददायी संभाषण होईल. वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. महिला आज ऑनलाइन नवीन पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचा पाठिंबा…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी भाजप आणि ठाकरेसेना एकत्र येऊ शकतात, असे संकेत ठाकरेसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत. संदीप गिऱ्हे म्हणाले की, ठाकरेसेनेची स्वाभाविक आघाडी काँग्रेससोबत असली तरी काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. “काँग्रेसला खरंच आम्हाला सोबत घ्यायचे आहे का, असा प्रश्न त्यांच्या वागणुकीतून निर्माण झाला आहे,” असे त्यांनी सांगितले. गिऱ्हे यांनी स्पष्ट केले की, ठाकरेसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या आठ नगरसेवकांनी संयुक्त गट नोंदवला असून, आणखी दोन नगरसेवक आमच्या पाठिंब्याने आहेत. त्यामुळे ठाकरेसेनेचा महापौर करण्यास जो पक्ष तयार असेल, त्यांना…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, सादर करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात याआधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांची नावे 1886 पानी विस्तृत चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या टप्प्यावर या दोघांना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू असून, तपासाच्या दिशेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंढवा येथील संबंधित जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर व उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महायुतीकडून आज या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. विरोधी गटाकडून कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने भाजपाच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी, तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. भाजपाचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. भाजपने ४६ पैकी ४६ जागांवर, तर शिवसेनेने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घट होताना दिसत असून, अर्थसंकल्पानंतर या घसरणीला आणखी वेग आला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दागिन्यांची किंवा गुंतवणुकीची योजना करणाऱ्यांसाठी ही खरेदीची चांगली संधी मानली जात आहे. आज, सोमवारी सकाळी 10:35 वाजता एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत ₹2,289 म्हणजेच 1.55 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹1,45,464 इतकी झाली आहे. चांदीच्या दरात तर अधिक तीव्र घसरण पाहायला मिळाली. सोमवारी चांदीच्या किमतीत ₹18,355 म्हणजेच 6.91 टक्क्यांची घसरण झाली. यानंतर चांदीची किंमत प्रति किलो ₹2,47,297 वर आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वी चांदीचा दर ₹4 लाख प्रति किलो या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता त्यांच्या पक्षातील नेते आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. “धूर नव्हता, पण धोका होता,” असे म्हणत या दुर्घटनेतील शत-प्रतिशत सत्य समोर यावे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. अजितदादांचा 100 टक्के घात झाला असून, आपण शेवटपर्यंत या प्रकरणासाठी लढा देणार, असे ठाम वक्तव्य मिटकरी यांनी केले आहे. 28 जानेवारीच्या सकाळी बारामतीत घडलेल्या या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी “आज आम्ही एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. भाजपच्या विचारांशी सुसंगत असलेल्यांनी एनडीएमध्ये यायचे असल्यास आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची भूमिका ठरवून निवडणूक लढवली आणि यश मिळवले असून, विलीनीकरणाबाबत शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतरच आम्ही आमची भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपने कधीही आम्हाला कोणता निर्णय घ्यावा, असे सांगितले नाही. आमचे निर्णय आम्हीच घेतो आणि भाजप मित्रपक्ष म्हणून त्या निर्णयांसोबत उभा आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझी…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पोलिस चौकीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बस समोर उभ्या असलेल्या ट्रक आणि कंटेनरच्या मधोमध अक्षरशः चिरडली गेली. या भीषण अपघातात बसचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला. अपघात इतका जबरदस्त होता की कंटेनरच्या धडकेत बसची केबिन चेंदामेंदा झाली. ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचे लोखंडी भाग वाकडे-तिडके झाले असून घटनास्थळावरील दृश्य अंगावर काटा आणणारे होते. मिळालेल्या माहितीनुसार,  या अपघातात नवापूर आगाराची बस क्रमांक एमएच १४ एमएच १९५७ चे चालक महेंद्र लाजा गावित (रा. जामनपाडा, ता. नवापूर) यांच्या केबिनमध्ये पाय अडकले होते. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत…

Read More