मुंबई : वृत्तसंस्था अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री करीना कपूर तिसऱ्यांदा आई बाबा होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तैमूर आणि जेह यांना खेळण्यासाठी आणखी एक भावंडं येणार आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये करीना आणि सैफच्या होणाऱ्या बाळाची खूप चर्चा होत असल्याचं दिसत आहे. हे सगळं ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना, पण एक मिनिट थांबा ! हे आम्ही नाही तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले करीनाचे बेबी बम्पचे फोटो सांगत आहेत. सध्या सोशल मीडियावर बेबो म्हणजेच करीनाचे बेबी बम्प दिसतील असे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटो आणि व्हायरल व्हिडिओवर…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहर महानगरपालिकेच्या नाथ प्लाझा समोरील गोलाणी मार्केट परिसरातील दुकानाला आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. नाथ प्लाझा समोर गोपाल पलोड यांच्या मालकीचे भारत एजन्सी नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानात पतंजलीच्या मालाची विक्री केली जाते सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या दुकानातू धूर निघत होता. हा प्रकार शेजारील दुकानदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच पलोड यांना फोन करुन तुमच्या दुकानात आग लागल्याची माहिती दिली. पलोड यांनी कुटुंबियांसह दुकान गाठले. काही मिनिटांनी अग्निशमन विभागाचे बंद सुध्दा घटनास्थळ दाखल झाले. तीन बंबांच्या मदती दुकानातील आग विझविण्यात आली मात्र, आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. ही आग शॉट सर्किटमुळे…
जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून ३२ वर्षीय तरुणाला तीन जणांनी मारहाण करून त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास समतानगर येथे घडली. विकास मुकुंदा साळुंखे (३२, रा. धामणवाडा, समतानगर) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या फिर्यादीवरून सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विकास साळुंखे हा रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घराकडे पायी निघाला होता. त्या वेळी ही घटना घडली. तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : प्रतिनिधी पाण्याची मोटार लावून पाणी वाया घालू नकोस. पाण्याची मोटार जळून जाईल, असे बोलल्याचा राग येऊन मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यासह पाय, पोटावर लोखंडी हातोडीने मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता खंडेराव नगरात घडली. या प्रकरणी लहान भावाच्या फिर्यादीवरून मोठ्या भावाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मंगलसिंग सुंदरलाल खरारे व मोठे भाऊ विजय खरारे हे हे खंडेरावनगर येथे वास्तव्यास आहे. त्यांच्यात वाद होऊन विजय खरारे यांनी मंगलसिंग यांना हातोडी मारली.
जळगाव : प्रतिनिधी आव्हाणे शिवारातील साहिल गाढे या तरुणाची पूजा सुनील चौहान (वय ३५, रा. मीरा रोड, मुंबई) व अन्य एकाने कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली २३ लाखांत फसवणूक केली होती. याबाबत १४ फेब्रुवारीला गाढे याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी केवळ चार दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल गाढे या तरुणाची २३ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याजवळून १८ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्यातील…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील कुन्हा – मुक्ताईनगर रस्त्यावर इच्छापूरनजीक मोटरसायकल व चारचाकी वाहनात अपघात झाला. यात निमखेडी बुदूक येथील तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेली माहिती अशी कि, निखिल गजानन सोनवणे (१९) असे या ठार झालेल्या तरुणाचे तर गौरव श्रीकृष्ण सपकाळे (१८) हा गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव यास उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुक्ताईनगर पोलिसात वाहन चालक ज्ञानेश्वर कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास कॉ. विनोद सोनवणे करीत आहेत.
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील वराड गावाच्या शेत शिवारात टरबूज भरून चोपडाकडे येत असताना शेतातील मातीवरून ट्रकचे चाक स्लीप झाल्याने अचानक एका बाजूला उलटला. या अपघातात ट्रकजवळ उभा असलेला साजीद मोहम्मद बागवान (३५, साने गुरुजीनगर, चोपडा) हा ट्रकखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सहा मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. घटनेचे वृत्त कळताच उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका, कर्मचारी, चोपड़ा नागलवाडी, वराड येथील अनेकजण घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य करून तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला सारून केबिनच्या खाली दबलेल्या साजीद बागवान यास बाहेर काढले. ट्रकमध्ये बसलेले इतर ६ मजूरदेखील जखमी झाले आहेत. यामध्ये किरण मोरे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पतीने अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या केल्याच्या अनेक घटना रोजच समोर येत असता. पण झांसीमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने पतीची हत्या केली आणि रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत झोपली.सकाळी जेव्हा हे लोकांना समजलं तर सगळेच हैराण झाले. महिलेने सांगितलं की, पतीला आपल्याच मुलीवर रेप करायचा होता. विरोध केल्यावर त्याने मारहाण केली. यादरम्यान बचाव करण्यासाठी तिने त्याच्यावर हल्ला केला आणि यात त्याचा मृत्यू झाला. मउराणीपूर गावातील ही घटना आहे. इथे राहणारा मनोहर मजुरी करून कुटुंबाचं पोलन-पोषण करत होता. त्याच्या पत्नीने सांगितलं की, त्याला दारूचं व्यसन होतं. नशेत तो नेहमीच तिला आणि मुलांना मारहाण करत…
धरणगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिव महोत्सवात लहान बाल गोपालांनी शिवराज्याभिषेकाचा देखावा सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकले यावेळी रंगीबेरंगी पोशाखाने तसेच शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. धरणगाव येथील आर-टेक क्लासेसच्या वतीने इयत्ता ५ ते १० वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन केल्याबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिव महोत्सवा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प रा सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अरुण कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, डॉक्टर संजीव कुमार सोनवणे, जेष्ठ पत्रकार बी आर महाजन,व्याख्याते सतीश शिंदे, अँड स्वाती निकम, वैशाली पवार, समाधान पाटील, भारती…
धरणगाव : प्रतिनिधी येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर तथा दूरदर्शन व टीव्ही स्टार सुरेश होनाजी जाधव यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम शाहीर सुरेशराव जाधव यांच्या हस्ते कुळवाडी भूषण – मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शाहीर व त्यांच्या सर्व टीम चे शाल, ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाहीर सुरेशराव जाधव यांनी सुरवातीला जिजाऊ, अहिल्यामाई, सवित्रीमाई, रमाई यांना पोवाड्याच्या माध्यमातून वंदन केले. शिवजन्मापूर्वीचा इतिहास, शिवजन्म एक ऐतिहासिक घटना, शिवराय व त्यांचे साथीदार, स्वराज्याची संकल्पना जिजाऊ व तुकोबाराय हेच खरे शिवरायांचे गुरू हा…

