Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने थेट जळगाव कोर्ट परिसरात महिलेचा ड्रेस परिधान करीत संशयित आरोपींना आज न्यायालयात आणणार असल्याची माहिती मिळाल्याने कोर्टात येत संशयित आरोपींना ठार मारण्यासाठी बाप आला होता. पण त्याची एक चूक पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर सर्व सत्य बाहेर आले आहे. मिळालेली माहित अशी कि, भुसावळ तालुक्यातील नशिराबाद येथे सप्टेंबर मध्ये धम्मप्रिया सुरळकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीना आज कोर्टात आणण्यात येणार होते. याची भनक मयत मुलाच्या वडिलांना लागली होती. तोच बदला घेण्यासाठी बापाने एका मुलाच्या मित्रासोबत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेचा ड्रेस परिधान करीत पर्समध्ये गावठी…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था  राज्यात महिलांवर सातत्याने अत्याचारच्या घटना दिवसेदिवस वाढत चालले आहे. औरंगाबादच्या नारेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाडेकरूने घरमालकिणीसोबत सूत जुळवत लग्नाचे आमिष देऊन अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने भाडेकरू तरुणाविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद मोसीन मो. मोमीन शेख (वय 32 वर्षे, रा. नारेगाव) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारेगाव गोल्डन हॉल समिहा मस्जिद परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय महिलेकडे मोहम्मद मोसीन हा भाडेकरू म्हणून राहायला आला होता. तो वॉशिंग सेंटरवर काम करत होता. दरम्यान घरमालक महिला…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शिरपूरहून जामनेरला गुरे वाहून नेणाऱ्या मिनी ट्रकचा पाठलाग केला. करून पकडण्यात आले. चालकाला मारहाण करून वाहन जाळून टाकण्यात आले. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार १३ रोजी पहाटे धरणगाव रस्त्यावर सतीमाता मंदिराजवळ घडली. संदीप रमेश शिरसाठ (रा. सुंदरगढी, चोपडा) हा १२ रोजी मालवाहू चारचाकी घेऊन शिरपूर येथील गुरांच्या बाजारात गेला होता. तेथील व्यापारी विजय शिवाजी पाटील यांच्याकडील १० गोहे घेऊन त्याला जामनेर तालुक्यातील नेरी येथे जायचे होते. यासाठी हातेड जळोद मार्गे तो येत होता. हातेड गावाजवळ वाहनात गुरे असल्याचे पाहून काही जणांनी दोन चारचाकी वाहनातून पाठलाग सुरु केला. शेवटी धरणगावनजीक सतीमाता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सिंधी कॉलनीजवळील एका हॉस्पिटल समोर बेकायदेशीररित्या हातात लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री १० वाजता संबधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि,  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तलवारी, सुरे लाठ्याकाठ्या सोबत बाळगण्याची परवानगी दिलेली नसताना शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका हॉस्पिटल समोर संशयित आरोपी आकाश उर्फ मट्या अनिल बागडे (वय २८, रा. संजय गांधी नगर ) हा हातात लोखंडी सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील लोखंडी सुरा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील वेडीमाता मंदिराजवळील खळवाडी परिसरामध्ये एका तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून महेंद्र कोळी (वय ३०, रा. खळवाडी वेडी माता मंदिराजवळ) असे मयताचे नाव आहे. महेंद्र कोळी याने घरात कोणी नसताना छताला दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. शहर पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मयताच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका २४ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग करीत असताना अचानक पिडीतेच भाऊ आल्याने अल्पवयीन मुलीने घाबरून विषप्राशन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षाची मुलगी शेतात बक-या चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याजवळ राज राठोड नावाचा एक तरुण आला. त्याने तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे वक्तव्य केले. त्याचवेळी मुलीचा भाऊ आणि नातेवाईक त्याठिकाणी दाखल झाले. सर्वजण त्याला मारहाण करत असतांना आपल्याला देखील मारहाण होईल या भितीने घाबरुन मुलीने तेथून निघून गेली. घरी आल्यानंतर तिच्या…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणा येथील राहणारा हा मजुर विहीरीवर कामासाठी गेला असता विहीरीत काम करीत असतांना अंगावर माती पडल्याने मातीखाली दबुन गुदमरून त्याचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली असुन , फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे . मिळालेली माहीती अशी. की हिंगोणा तालुका यावल येथील राहणारा मुबारक रमजान तडवी वय ३२ वर्ष हा दिनांक १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी हिंगोणा येथील शेतकरी हुना जयराम चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील गट क्रमांक९१७ मध्ये असलेल्या शेतातील विहीरीवर गळ काढण्याच्या कामासाठी गेला असता,रात्री सुमारे १ वाजेच्या वेळेस विहीरीवर काम करीत असतांना अंगावर माती पडून मातीखाली दाबुन गुदमरून मुबारक रमजान तडवी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘बाळासाहेब घात झाला हो’, असे म्हणत ढसाढसा रडतानाचा शिवसैनिकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयाला ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निषेध व्यक्त केला जात आहे. आयोगाच्या निकालानंतर परभणीतील शिवसैनिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले आहेत. ज्या शिवसैनिकाचा हा व्हिडिओ आहे. त्याचे नाव विजय खिस्ते पाटील आहे. यापूर्वीही त्यांनी…

Read More

लग्न म्हटलं की खूप सगळी धमाल मस्ती पहायला मिळते. लग्नाला खास बनवण्यासाठी दोन्ही कुटुंब खूप मेहनत घेतात, कोणतीही कसर सोडत नाही. आजकाल सोशल मीडियावरही अनेक लग्न चर्चेत असतात. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सोशल मीडियावर लग्नातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमद्ये दिसतंय की, हार घाल्याच्या वेळी वधू-वर स्टेजवर उभे होते. व्हिडीओ पाहता हार घालण्याचा कार्यक्रमही झाला असून फोटो क्लिक होत असल्याचे दिसते. अचानक नवरदेवाच्या मागून फटाको वाजवले जातात आणि यामुळे नवरेदव चांगलाच घाबरतो. हे पाहून स्टेजवर उपस्थित सर्वजण हसू लागतात. मात्र नवरेदव यामुळे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये रुद्राक्ष महोत्सवात भाविक जात आहे. या ठिकाणी अनेक भाविक हरविले तर खान्देशातील ५ महिलासह १ लहान मुलाचा मृत्यू विविध कारणाने झाला असतानाच पुन्हा एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुसावळातील तरुण भाविकांना घेवून गेला होता. त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. खंडवा शहरापासून काही अंतरावर महामार्गावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा अपघात घडला. मंगल पाटील (४२, कृष्ण नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील कृष्ण नगरातील मंगल पाटील हा तरुण मध्यप्रदेशातील खाजगी लक्झरीवर क्लीनर म्हणून कार्यरत होता. भाविकांना कथा श्रवणासाठी सिहोर येथे खाजगी लक्झरीने घेवून गेला होता व…

Read More