Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शिरसोली जवळील विटनेर शेतकर्‍याचा भरधाव आयशरने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दोन वाजता घडला. आयशर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान विठ्ठल साबळे (44, विटनेर, ता.जि.जळगाव) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी कि, २२ फेब्रुवारी बुधवार रोजी ते शेतात दुचाकीने गेले असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाल्यानंतर जळके ते विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने येणार्‍या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सोपान साबळे यांचा मृत्यू झाला. नागरीकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह हलवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. एमआयडीसी पोलिसात अज्ञात आयशर ट्रक चालकाविरोधात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  कापसाची भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळत आहे. गेल्यावर्षी तुरीचा भाव हा 5 हजार 250 असा होता. मात्र, यंदा 7 हजार 500 ते 8 हजार 050 पर्यंत भाव तुरीला औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मिळत आहे. मराठवाड्यामध्ये कापूस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यावर्षीही तुरीला चांगला भाव मिळेल याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतलं. तुरीला यावर्षी चांगला भाव मिळत आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तुरीवर बुरशीचा आजार आढळून आला होता तसेच काही ठिकाणी तूर फुलांच्या अवस्थेत आलेली…

Read More

देशातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगारीकडे जात असतांना त्या युवकांनी व्यवसाय सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. ज्याअंतर्गत लोकांना कोणतीही हमी किंवा तारण न ठेवता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. प्रधानमंत्री मुद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते. तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या आणि छोट्या व्यावसायिकांना बळकट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. महत्त्वाचं म्हणजे या योजनेंतर्गत नॉन-कॉरपोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी कर्ज दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचे फायदे आणि अर्ज करण्याची प्रोसेस या योजनेसाठी, तुम्ही कोणत्याही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  प्रेम म्हणजे कुठलीही सीमा नसलेले असते. जे कधी कुणावर होईल हे कधीच सांगता येत नाही अशीच एक थक्क करणारी घटना घडली आहे. गुजरातमध्ये चमेली नावाच्या एका महिलेचं दोन तरुणांवर प्रेम जडलं होतं. या दोघांनाही तिने लग्नाची गळ घालत पिच्छा करायला सुरुवात केली होती. ही महिला विवाहीत होती आणि तिला 3 मुले आहेत. चमेलीचं पहिले अजय यादव नावाच्या तरुणावर प्रेम जडलं होतं. मात्र त्याचं गावाला लग्न ठरल्याने तो गावाला निघून गेला होता. यामुळे चमेली भडकली होती. अजय गावाला गेल्यानंतर चमेलीची ओळख अजयचा मित्र असलेल्या उदय शुक्लाशी झाली. चमेलीचं उदय शुक्लावरही प्रेम जडलं. उदयलाही चमेली आवडायला लागली आणि दोघांमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अनेक भागात मोठ्या प्रमाणात ‘पुष्पा’ च्या स्टाईलने गुन्हेगारी जगत वाढत चालले असतांना पोलिसांनी याचा बंदोबस्त केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावलगत जंगल परिसरात वनपाल, वनरक्षक यांना गस्थी दरम्यान चंदनाचे लाकूड तोडून, तस्कारी करणारे दोन चोरटे तस्कर आढळुन आले आहे. त्यांच्या ताब्यातून ५.१५० कि.ग्रॅम. लाकडासह लाकूड तोडीचे साहित्य मिळुन आले आहे. याप्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला आहे. माहिती अशी, दि.२१ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा जंगल गस्ती करत असताना, बोढरा गावामधील कक्ष क्रमां क.३१३ मध्ये दोन संशयात्मक इसम आढळून आले. वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कमरेला गावठी पिस्तूल लावून वरणगाव शहरात दहशत माजविणाऱ्या उदय राजू उजलेकर (२२, रा. आंबेडकर नगर, वरणगाव) या गुन्हेगाराला मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले. त्याच्यावर कारवाई करून पोलिसांनी गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले असून, याप्रकरणी वरणगाव पोलिसात आर्म अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उदय उजलेकर हा स्वत:च्या कमरेला गावठी पिस्तूल लावून वरणगाव शहरात दहशत माजवित असल्याची माहिती मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यांनी त्वरित स्वतंत्र पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने वरणगाव गाठून उजलेकर याचा शोध सुरू केला. अखेर त्याला पारस हॉटेलजवळ पोलिसांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तू जर माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव, अशी धमकी देऊन पतीच्याच मित्राने २० वर्षीय महिलेला घरी बोलवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बुधवारी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. अधून-मधून पतीसोबत त्यांचा मित्र हा घरी येत होता. दीड महिन्यापासून पतीचा मित्र हा फोन करून विवाहितेशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याने विवाहितेला फोन करून तुझ्याशी अर्जंट काम आहे, तू लवकर माझ्या घरी ये असे त्याने सांगितले. विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर…

Read More

जळगाव : प्रतीनिधी जळगाव जिल्हा पोलीस स्थानकाच्या रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी काढले आहेत. त्यातच धरणगाव पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे. धरणगाव पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची बदली पाचोरा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी करण्यात आली असून त्याच्या जागी धरणगाव पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी उद्धव कोंडीबा डमाळे हे पदभार घेणार आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा पोलीस स्थानकाच्या रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी काढले आहेत. त्यामुळे आता १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने प्रभारी राज संपला आहे. बदली आदेशानुसार रामानंद पोलीस निरीक्षकपदी शिल्पा पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी संदीप भटू पाटील, चोपडा ग्रामीणसाठी कावेरी कमलाकर, यावल पोलीस ठाणे राकेश माणगावकर, जिल्हा विधी शाखा रंगनाथ धारबळे, चाळीसगाव ग्रामीण बबन आव्हाड, धरणगाव पोलीस ठाणे उद्धव डमाळे, भडगाव पोलीस ठाणे राजेंद्र पाटील, एरंडोल पोलीस ठाणे सतीश गोराडे अमळनेर पोलीस ठाणे विजय शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाणे जयपाल हिरे, जिल्हा पेठ पोलीस ठाणे ज्ञानेश्वर जाधव, सायबर…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  राज्यातील चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु असून यामध्ये मोबाईलसह दुचाकीची चोरी होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक घटना नाशिकरोड परिसरातील परिक्षा केंद्रावर पेपरसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घडली आहे. चोरट्यांनी परिक्षा सुरु असतांना दहा महागडे मोबाईल चोरुन नेले. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी सुमारे ५३ हजार रूपये किमतीचे जुने वापरते दहा मोबाईल चोरी गेल्याप्रकरणी एकत्रीत गुन्हा दाखल केला आहे. आशिष किरण आहिरे (रा.श्रमिकनगर,जेलरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बारावीची परिक्षा सर्वत्र सुरू झाली आहे. मंगळवारी (दि.२१) इंग्रजीचा पहिला पेपर होता. नाशिकरोड भागातील के.जी.मेहता,बिटको कॉलेज व जयरामभाई हायस्कूल या परिक्षा केंद्रावर ही घटना घडली.…

Read More