पारोळा – प्रतिनिधी तालुक्यातील मोंढाळे प्र अ हिवरखेडे खू शिवारादरम्यान बिबट किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने एक गाय व एक वासरी ठार केली आहे. मोंढाळे व हिवरखेडे गावातील नागरिकांना आवाहन करण्यात येत कि आपल्या गावाच्या परिसरात बिबट्याने किंवा हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नये व आपली गुर ढोर शेतातुन घरी घेऊन यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी देसले यांनी केले आहे. दरम्यान घटनास्थळी वनविभागाचे प्रेमराज सोनवणे,श्रीमती सविता पाटील, रामदास वेलसे यासह वनपाल, वनमजूर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर बिबट नाहीतर तडस किंवा इतर हिंस्त्र प्राण्याचे ठसे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने रस्त्यामध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार शेतकरी विजय मुरलीधर पाटील (वय-65, रा. नशिराबाद) हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता जळगाव खुर्द उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे विजय पाटील हे वास्तव्यास असून शेती करतात. शनिवारी सकाळी रावेर तालुक्यातील पिंपळगांव येथे खासगी कामासाठी जाण्यासाठी (एमएच 19-बीबी-6933) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वेवरील उड्डाण पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. वाहनचालकांना पुढे अपघाती जागा असल्याची कल्पना यावी म्हणून पुलावर सिमेंटचे मोठे ब्लॉक ठेवण्यात आले आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा परिसर विकास मंच या संस्थेला सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात पुरस्काराने गौरविण्यात आले असून सर्वत्र मंचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिनाक २४ रोजी आकाशवाणी सभागृह पुणे येथे पुरस्कार समारंभ कार्यक्रमात हरित मित्र परिवार व गुरुकृपा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचा पुरस्कार सुनील फुलारी (इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर परिक्षेत्र) यशवंत मानखेडकर (डेप्युटी डायरेक्टर नेहरू युवा केंद्र भारत सरकार, मुंबई) डॉ. सुनीता सिंह (प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य) इंद्रजित बागल ( कार्यक्रम प्रमुख दूरदर्शन व आकाशवाणी) विवेक खांडेकर ( अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य) महेन्द्र घागरे (अध्यक्ष हरित मित्र परिवार) प्रशांत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या विवाहितेचा माहेरून पैसे न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात जळगाव शहर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील शाहू नगरातील रुक्सार समीर पिंजारी (21) यांचा विवाह शाहू नगरातील समीर सत्तार पिंजारी यांच्याशी झाल्यानंतर लग्नानंतरच्या काही दिवसांनी पतीसह सासरच्या मंडळींनी रुक्सार हिने माहेरुन आई वडीलांकडून पैसे आणावेत, अशी वारंवार मागणी करण्यात आली मात्र मागणी पूर्ण न झाल्याने रुक्सार हिला वेळावेळी शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शारीरीक तसेच मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून रुक्सार या माहेरी निघून आल्या व त्यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पती समीर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील बसस्थानक परीसरातून अट्टल दुचाकी चोरट्याच्या गुरूवारी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने चोपडा आणि अमळनेर तालुक्यात दुचाकी चोरींची कबुली देत तीन दुचाकी काढून दिल्या आहेत. अधिक कारवाईसाठी संशयीताला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. राजेश श्रीराम बारेला (22, मोहन पडवा, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमळनेर शहरातून एक आणि चोपडा शहरातून दोन अश्या तीन दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हा चोपडा शहरातील बसस्थानकात आल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहीवद गावातील १९ वर्षीय तरुणीचा एका तरुणाने गेल्या सहा महिन्यापासून एकतर्फी प्रेमातून पाठलाग केला. मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यासोबत लग्न कर असेच सांगून तिला धमकी दिली मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपी तरुणाने तरुणीचे लग्नदेखील मोडले. या प्रकरणी तरुणाविरोधात यावल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील दहीवद गावातील १९ वर्षीय तरुणीने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच संशयित हेमंत विजय पाटील हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करीत होता. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर म्हणत लग्नासाठी गळही घातला. तरुणीने या प्रेमसंबंधाला नकार दिला असता या तरूणाने तिला…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांसह जिल्ह्यातील शाळा १ मार्चपासून सकाळसत्रात भरविण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून हालचाली सुरु केली आहे. दहा दिवसा पासून तापमानाचा पारा वाढत आहे. दिवसा उन्हाचे चटके बसत आहे. तर रात्री व सकाळी थंडीचा गारठा जाणवत आहे. मात्र, तापमानात चढ-उतार सुरु असला तरी आज तापमानाच्या पार्याने ३६ ते ३७ अंशाचा टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. एका आठवड्याभरानंतर ४० अंशापर्यंत पारा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्याभरातील जि.प.शाळांसह खासगी शाळा देखील दि.१ मार्चपासून सकाळी ७ ते ११.३०वोजपर्यंत सुरु करण्याची…
बोदवड : प्रतिनिधी बोदवड तालुक्यातील खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी २० हजारांची लाच मागून तडजोडीअंती १६ हजारांची लाच स्वीकारणार्या पंटरासह बोदवडमधील हवालदारास जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दि २५ फेब्रुवारी शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला. हवालदार वसंत नामदेव निकम व खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बोदवडमधील तक्रारदारासह त्याच्या तीन मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यात सी फायनल न्यायालयात पाठवण्यासाठी तपासाधिकारी असलेल्या हवालदार वसंत निकम यांनी प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे 20 हजारांची लाच मागितली होती मात्र चार हजार प्रत्येकी देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील मनोहर संकुलातील रहिवासी एलआयसीचे सहायक प्रशासन अधिकारी हिमांशू सिंह यांच्या घरातून सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान घडली. हिमांशू ओमबीर सिंह (मूळ रा. हरियाणा) हे मनोहर संकुल भगवा चौक येथून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता ऑफिसमधून घरी परत आले. त्यावेळी घराला फक्त कडी लावली होती. कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. मात्र, काही वेळाने त्यांच्या आई घरी आल्या. त्यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेल्याचे सांगितले. संशय आल्याने घरातील वस्तू तपासल्या असता घरातील एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सावदा येथे दोन गटात वाद होत असताना तो सोडविणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनाच मारहाण झाल्याचा प्रकार २२ फेब्रुवारी रोजी सावदा विश्रामगृहासमोर घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी दोन गटात भांडणे होत असल्याची माहिती मिळाली असता सावदा पोलिस पथक घटनेची शहानिशा करण्यास गेले. त्यावेळी दोन गटात वाद सुरू असताना उपनिरीक्षक खांडबहाले यांनी तो सोडविण्याचा प्रयत्न केला असता वाद घालणाऱ्यांनी पोलिसांना वादात पडू नका असे सांगून खांडबहाले यांनाच मारहाण केली. याप्रकरणी पो.ना. मोहसीन खान यांनी सावदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरू गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली. त्यांना रावेर न्यायालयात शुक्रवारी…

