जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यात यावर्षी हरभरा व मकाचे क्षेत्रात वाढ झाल्याने आता हरभरा काढणी सुरू आहे. तापमानाचा पारा देखील वाढू लागल्याने शेतकरी हरभरा काढण्यात मग्न आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर हरभरा घेऊन येतो आहे. मात्र शेतकऱ्याच्या या चाफा हरभरा मालाला 4400 ते 4600 पर्यंत भाव मिळत आहे. तर विठू हरभऱ्याला सहा हजार सहाशे रुपये भाव मिळत आहे. हरभरा मेक्सिको अकरा हजार पर्यंत भाव गेलेले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी सांगितलं सध्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढले असल्याने रोजचे 80 ते 90 ट्रॅक्टर हरभराचे येत आहे. या हरभऱ्याचे लिलाव…
Author: editor desk
धुळे : वृत्तसंस्था बहिणीची बदनामी केल्याच्या रागातून धुळ्यात भावाने एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल तरुणाचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु केला. सखोल तापासानंतर 12 तासात या हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. सतिश मिस्त्री असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सतिशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. चेतन गुजराती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सतिश हा चेतनच्या बहिणीबद्दल उलट सुलट बोलून तिची बदनामी करत असे. याच रागातून चेतनने अल्पवयीन आरोपीच्या मदतीने सतिशची हत्या केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने…
मुंबई : वृत्तसंस्था पुणे येथे सुरु असलेली पोटनिवडणुकीत सर्वच पक्षातील नेते प्रचारात लागल्याने अनेक विधान याठिकाणी होत आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे थेट ठाकरे गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे. ‘नारायण राणे यांना बाईन पाडलं… बाईनं’ या शब्दांमध्ये कोटी करत अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी शेलक्या भाषेत केलेल्या या टीकेवर भलतेच खूश झालेल्या संजय राऊत यांनी अजित दादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. दादा म्हणजे कमाल की चीज आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी आपला आनंद व्यक्त केला. अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना…
रावेर : प्रतिनिधी प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबविता त्यांच्याशी हुज्जत घालणार्या रावेर एस.टी.चालकाला निलंबित करण्यात आल्याने कर्मचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. टी.आर.शेख असे निलंबन करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. भुसावळ येथून रावेरकडे येणार्या बसला हात दाखवून ही चालकाने गाडी थांबवली नव्हती. सावदा येथे येत या महिीला प्रवाशांनी चालक टी. आर. शेख यांना याबाबत जाब विचारला असता त्याने या महिला प्रवाशांशी हुज्जत घालत उर्मट व असभ्य भाषा वापरल्याने चालकाची तक्रार जळगाव येथील विभागीय नियंत्रक यांच्याकडे करण्यात आली. याची तात्काळ दखल घेत रावेर डेपोचे चालक टी. आर. शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोमवारी रावेर डेपोची बस (क्रमांक 2398) भुसावळ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशातील झांसीमध्ये एका शिक्षिकेला प्रेमात धोका मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडियावर पोलिसांना साद घालत प्रियकर यासाठी जबाबदार असल्याचे सांगून त्यानंतर ती बेपत्ता झाली. सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत. झांसी जिल्ह्यातील रक्सा परिसरातील सिजवाहा कालवा येथील ही घटना आहे. हा व्हिडीओ चार दिवस आधीचा असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्या व्हिडीओचा तपास केला असता शिक्षिकेची स्कूटी मिळाल्यानंतर पोलिसांनी कालव्यापासून बांधापर्यंत बेपत्ता शिक्षिकेचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, कुंवर यादव नावाच्या व्यक्तीच्या…
रावेर : प्रतिनिधी अहिरवाडी येथील बहिरमबाबा परिसरातील खळवाडीत योगेश व रामदास दगडू धनगर यांच्या मालकीच्या खळ्याला २२ फेब्रुवारी रोजी रात्री लागलेल्या अकस्मात आगीत दावणीला बांधलेले एक बैल, दोन पारड्डू भस्मसात होऊन जागीच ठार झाल्याची तर एक गोन्हा आगीत होरपळून गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या आगीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्यांनी पोखरा योजनेंतर्गत शेतात पाइपलाइन करण्यासाठी खरेदी केलेले पीव्हीसी पाइप, कूपनलिकेचे फायबर केसिंग पाइप, मोटारपंप व गुरांचा चारा जळून भस्मसात झाला. याबाबत खानापूर महसूल मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी पंचनामा केला आहे. या खळ्याला २२ फेब्रुवारीच्या रात्री आग लागून धुराच्या लोटांसह आगडोंब आकाशात उसळू लागताच आग विझवण्यासाठी सारा गाव हातात मिळेल ते पाण्याची…
धरणगाव : प्रतिनिधी एका ४५ वर्षीय व्यक्तीचे एकाने ४ लाख ६० हजारात फसवणूक केल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बस स्थानक परिसरात दि ८ एप्रिल २०१८ रोजी अमळनेर शहरातील रहिवासी किरण नामदेव धनगर यांची संशयित आरोपी राहुल कुमार दामोदर हिरवे रा.मारुल हवेली, जि.सातारा याने किरण धनगर यांच्याकडून गाडीचा सौदा करून ४ लाख ६० हजार रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात गाडी न.८०५५ हि देणार होता पण आजपर्यत कुठ्लीही गाडी किवा पैसा परत न दिल्याने किरण नामदेव धनगर यांची फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तत्काळ धरणगाव पोलीस स्थानकात धाव घेत संशयित…
जळगाव : प्रतीनिधी एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत तिला गर्भवती केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आठ महिन्यापूर्वी एका मुलासोबत झालेला होता. यावेळी मुलगी हि अल्पवयीन असल्याचे तिच्या सासरच्या मंडळीना माहित असून देखील त्यांनी विवाह करून घेतला, या विवाहासाठी मुलीच्या आईचा नकार असल्याने विवाह झाल्यानंतर याचा राग मनात ठेवून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेस मारहाण शिवीगाळ व मानसिक त्रास देत फिर्यादीच्या पतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या घरी तिच्यासोबत अत्याचार करीत गर्भवती ठेवल्या प्रकरणी फिर्यादीने दि…
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि तिचे विचित्र कपडे हे जणू समीकरणच झाले आहे. अंग झाकलेले, जरा बरे कपडे उर्फीने घातले तर नवलच. तिला कितीही ट्रोल केले तरी फरक पडत नाही उलट ती हवे तसेच कपडे घालते. तिची फॅशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने डर्टी लिहिलेलं ब्रालेट टॉप परिधान केले आहे. यावेळी तिच्या टॉपपेक्षा आयब्रोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अतरंगी फॅशनच्या नावावर चक्क आयब्रो गायब करुन टाकले आहेत. उर्फी जावेदचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये…
पाचोरा : प्रतिनिधी आयुष्यातल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्यासोबत असणाऱ्या सहचारिणीचा मृत्यू झाल्याचे समजताच पतीनेही प्राण सोडल्याची हृदद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे घडली आहे. सिंधू दत्तात्रय वाणी (वय 75) आणि दत्तात्रय गणपत वाणी (वय 85) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सातगाव डोंगरीमध्ये दत्तात्रय वाणी यांचे कुटुंब रहायचे. त्यांची पत्नी सिंधू व ते दोघेही अनेक दिवसांपासून आजारी होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा नव्हती. त्यातच 21 फेब्रुवारी रोजी सिंधू यांचा मृत्यू झाला. खरे तर घरातल्या व्यक्तींनी ही बातमी दत्तात्रय यांना कळू दिली नव्हती. मात्र, आईच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी टाहो फोडला. तेव्हा…

