धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री गावातून व्यापारी असलेल्या एका ३८ वर्षीय तरुणाची चारचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील व्यापारी प्रशांत ईश्वर बच्छाव (वय ३८) यांच्या मालकीची चारचाकी क्र. एम.एच.०६.डब्ल्यू.६२०१ काळ्या रंगाची एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीची दि २५ रोजी रात्रीच्या सुमारास एका बखळ जागेतून अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.राजेद्र कोळी हे करीत आहेत.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील राहत्या घरात उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिवारी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, स्वामी विवेकानंद नगर परिसरात जयश्री गजेंद्र ओझा (वय ४७) या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. २३ फेब्रुवारी रोजी त्या घरकाम करीत असताना उंचावरून खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना जीएमसीत दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आशाबाबा नगर परिसरातील २६ वर्षीय तरुणीचा आयएमआर कॉलेजजवळील अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या असतांना तिच्या तीन दिवस खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर तीन दिवसानंतर या तरुणीची शनिवारी प्राणज्योत मालवल्याने तीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील आशाबाबा नगरात पूनम सुनिल विसपुते ही तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. तळवलकर जीम येथे सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीला होती. दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास जीमला येत असतांना आयएमआर जवळील महामार्गावर अज्ञात वाहनाने पूजन विसपुते यांच्या दुचाकीला…
कोल्हापूर : वृत्तसंस्था कोल्हापुरातील घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील दोघा वृद्धांनी वयाच्या सत्तरीमध्ये लग्न गाठ बांधली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अनुसया शिंदे वय वर्ष 70 आणि बाबुराव पाटील वय वर्ष 75 हे दोघे वृद्धाश्रमातच भेटले. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडल्यानंतर या दोघांनी एकमेकांकडे मन मोकळं केलं. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर आता लग्नापर्यंत पोहोचले आहे. मानसिक दृष्ट्या खचलेल्या या दोघांनीही एकमेकांना आधार देण्याचा निर्णय घेतला आणि वृद्धाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ आणि प्रमुख लोकांच्या उपस्थितीत या दोघांचेही थाटामाटात लग्न पार पडले आहे. या लग्नामध्ये दोघांनीही एकमेकांची जात, धर्म आणि कुंडली याचा विचार न करता केवळ उर्वरित आयुष्य सुखात आणि एकमेकांना मायेचा आधार देऊन…
औरंगाबाद : वृत्तसंस्था औरंगाबाद ग्रामीणच्या पाचोड पोलिसांनी मोठी कारवाई करत चक्क अफूची शेती करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहे. पैठण तालुक्यातील गाव तांडा खुर्द शिवारात एका शेतात पोलिसांनी छापा टाकून अफूची 250 झाडे जप्त असून, यात दोन लाख 14 हजार 774 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यात एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामभाऊ गोर्ड असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील गाव तांडा खुर्द येथील शेतकरी रामभाऊ गोर्ड यांनी त्यांच्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेलील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या लोकांशी अनैतिक कृत्य करण्यास दबाव टाकून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आले. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता नितू उर्फ जोया राजू बागडे रा. जळगाव, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव यांनी अल्पवयीन मुलीला चाळीसगाव येथे बोलावून तिला सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोब…
चोपडा : प्रतिनिधी येथील चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास नटवरलाल गुजराथी यांची नुकतीच चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज (दि २५) विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी जळगाव जिल्हा माजी बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सत्कार केला. यावेळी गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, मजूर फेडरेशन संचालक राजेंद्र कोलते, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
पुणे : वृत्तसंस्था दाखल पोलीस केसमधून बाहेर पडण्यास मदत करतो म्हणत एकाने महिलेशी गैरवर्तन करत शिवीगाळ केली आहे. यावरून आरोपीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2 जून 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडत होता. रमेश दशरथ वाघदरे (वय 42 रा.खेड) असे गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचे नाव असून शनिवारी (दि.24) पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या पोलीस केसमध्ये मदत करतो म्हणून आरोपीने ओळख वाढवली. पुढे त्याने व्हॉटसअपवर अश्लिल मॅसेज करण्यास सुरुवात केली. फोनकरून फिर्यादीला शरीर सुखाची मागणी केली. तसेच माझी पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरात गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव शहर पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरातील उस्मानिया पार्क या भागात दि २५ फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टरमध्ये दीड ब्रास वाळू असतांना वाळूची अवैधरित्या वाहतूक करीत असतांना शहर पोलिसांनी पकडले आहे. स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९.बी.जी.००२७ असे ३ लाख रुपये किमतीचे तर यामध्ये दीड ब्रास वाळू सुमारे ३ हजार रुपये किमतीची असा एकूण ३ लाख ३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोना. नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एका…
जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एकता मराठा फाउंडेशनतर्फे रविवार आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकता मराठा फाउंडेशनतर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 22 व 26 फेब्रुवारी दरम्यान मराठा क्रिकेट लिग राष्ट्रीय स्तरावर मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. आज 22 फेब्रुवारी रोजी उद्दघाटन सोहळा शिवतीर्थ मैदान येथे झाला. इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी प्रवचनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते.…

