Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था  राज्यात अगदी शुल्लक कारणाने कोण कुणाचा जीव घेईल हे आता कळूच शकत नाही. अशीच एक थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली आहे. चक्क एका मुलाने आपल्या प्रेयसीबद्दल वडिलांनी वाईट शब्द बोलल्याने वडिलाचा खून केल्याची घटना घडली आहे. या खुनामध्ये मुलाला आईसह भावाने मदत केली आहे. पुण्यातील पिपरी परिसरातील दिघी येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलाला प्रेयसीबाबत वाईट शब्द उच्चारल्याच्या रागातून मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या मुलाने गळफास घेतल्याचा बनाव रचला तर मृताच्या पत्नीने पुरावा नष्ट केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. अशोक रामदास जाधव (वय ४५, रा. दिघी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी अशोक यांचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यांमध्ये सध्या जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रात देखील सध्या अवकाळी पावसाचा जोरदार धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुंबईसह, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरु असल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी सकाळी पुढील ३-४ तासांत मुंबई, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांत वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवला होता. यासोबतच हवामान खात्याने लोकांना बाहेर पडताना खबरदारी घेण्यास सांगितले होते. IMD ने…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  देशासह राज्यात आज धूलीवंदनचा सण मोठ्या उत्साहात सकाळपासून साजरा होत असतांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आज आपल्या पाळधी येथील निवासस्थानी धुलीवंदन साजरे केले. या प्रसंगी पालकमंत्री यांनी होळी व धुलीवंदन निमित्ताने महाराष्ट्रच्या जनतेला शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित प्रशांत झंवर, आबा माळी, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे, अनिल माळी,युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, चेतन पाटील, अनिकेत पाटील, महेश पाटील, सोनू फुलपगार, बळीराम सपकाळे, सागर पाटील, नवलसिंग पाटील, गजानन बापू,अंगरक्षक भावसार मेजर, सुरेश पाटील, पी ए बंडू दादा नारखेडे,माजी सरपंच सोपान पाटील, विजू बापू पाटील उपस्थित होते

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  नाशिकच्या उच्चभ्रू ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उध्वस्त केला. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शरणपूर रोड वरील सुयोजित मॉडर्न पॉईंट या इमारतीत अनेश अरुण उन्हवणे याने 2 गाळे भाड्याने घेऊन तेथे योग वेलनेस स्पा या नावाने मसाज पार्लर सुरू केले होते. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांना मिळाली होती. या माहिती वरून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे एक महिला व ललित पांडुरंग राठोड हे दोघे महिलांना पैशांचे प्रलोभन देऊन अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय करताना मिळून आले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  प्रत्येक नात्याला हौसेला मोल नसतं, असं म्हणतात ते काही खोटं नाही. त्यात जर हे नातं वडील आणि मुलगा असेल तर विचारायचीच सोय नाही. याचीच प्रचिती वसईतल्या एका वाढदिवसानिमित्त आली. वसईत पूर्वे कडील कामण गावातील नवीत भोईर हे जिल्हापरिषद शाळेत शिक्षक आहेत. भोईर यांच्या लग्नाला 6 वर्ष झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव नवीत यांनी रेयांश ठेवलं. जन्मानंतर रेयांश एक महिना आयसीयूमध्ये उपचार घेत होता. नवीत भोईर यांना मुलाचं बारसं थाटामाटात करायचं होतं, पण रेयांशच्या आजारपणामुळे त्यांना बारसं दणक्यात करता आलं नाही. रेयांश आजारपणातून पूर्ण बरा झाल्यानंतर नवीत यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. विशेष म्हणजे…

Read More

अमळनेर  : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून अनोळखी चोरट्याने एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुरुकृपा कॉलनी परिसरातील रहिवासी दीपक कनीराम जाधव यांच्या मालकीची असलेली दुचाकी क्र.एम.एच.१२.ई.डी.४२३८ हि त्यांच्या घराच्या अंगणात लावलेली असतांना अनोळखी व्यक्तीने दि ५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमास चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेका.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तालुक्यातील पाथरी येथे मोठ्या भावाच्या घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राहुल छगन माळी (वय-35) या लहान भावाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना पाथरी गावात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि,  जळगाव तालुक्यातील पाथरी येथे राहुल हा आई-वडील व भावांसह वास्तव्यास असून तो हातमजुरी करून कुटूंबियांना हातभार लावत होता. त्याच्या घराच्या शेजारीच मोठा भाऊ राजू याच्या घराचे बांधकाम सुरू होते. सोमवारी दुपारी या घरामध्ये राहुल याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर मोठा भाऊ राजू हा बांधकाम सुरू…

Read More

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील सावदा येथे रविवार पेठ आठवडे बाजारात खंडेराववाडीजवळ दि. ४ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ‘ट्रॅक्टर व दोन दुचाकी यांच्यात अपघात झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात तीन जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले आहे. आठवडे बाजारात अज्ञात ट्रॅक्टर चालक भरधाव वेगात होता. त्याचवेळी १३ वर्षीय बालक नूर मोहम्मद हा ओम कॉलनीतून जेवणाचा डबा घेऊन जात होता. तो एक दुचाकी ट्रिपल सीट व अन्य दुचाकी चालक नूर मोहम्मद याच्या मागे चालत असताना अज्ञात ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. याच ट्रॅक्टरने ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीलाही धडक दिली. या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  आपल्या अनैतिक संबंधाचा खुलासा होऊ नये म्हणून एका काकीने आपल्या पुतण्याची हत्या केली. ही घटना समोर आल्यावर सगळ्यांना धक्का बसला. प्रत्येक रात्री 14 वर्षीय सचिन आपल्या काकीला रोहितच्या मिठीत बघत होता. याला वैतागून सचिनने ठरवलं की, तो हे सगळं दुसऱ्या गावात राहणाऱ्या काकांना सांगणार. यासाठी तो पुरावे गोळा करत होता. दरम्यान एक दिवस त्याने काकी आणि तिच्या प्रियकराचा शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. पण काकांना पाठवण्याआधी हा व्हिडीओ त्याने काकीला दाखवला आणि म्हणाला की, वेळीच सुधार नाही तर व्हिडीओ काकांना पाठवणार. पण झालं उलटं. सचिनचा शीर धडापासून वेगळं असलेला मृतदेह गावातील आमराईत सापडला. जोरजा गावात…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था  अनेक कलाकारांना ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा त्यातल्या किमान एखाद्या चेहऱ्याला तरी प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा मनी बाळगतो. बरं हे शक्य होणार नाही असंच आपलं मत असतं. पण, ते म्हणतात ना; नियतीत असेल तर काहीही शक्य होतं. अगदी जगाच्या टोकावर असणाऱ्या व्यक्तीचीही तुम्हाला भेट घडून येते. एखादा कलाकारही असाच योगायोगानं तुम्हाला भेटतो. किंवा भेटूही शकतो. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ आताच पाहा. हा व्हिडीओ शेअर केला आहे खुद्द अभिनेता सनी देओल यानं. वय वाढत असलं तरीही शारीरिक सुदृढतेच्या बळावर सनी देओल नव्या जोमाच्या कलाकारांनाही लाजवत आहे. सध्या तो आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र…

Read More