मुंबई : वृतसंस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेद पदवी प्रदान केली आहे. यावरुन संजय राऊत यांनी डॉक्टर झालेल्या एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळवतात येते. अशा पद्धतीने भ्रष्टाचाऱ्यांना डॉक्टरे देणाऱ्या विद्यापीठांचीच चौकशी व्हायला पाहीजे. अशा पद्धतीने डॉक्टरेट मिळवणारे लोक पायलीला पन्नास मिळतील. एकनाथ शिंदेंना डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाची अशी कोणती काम अडकली होती? अशा कोणत्या फायली अडकल्या होत्या त्यामुळे त्यांना असे काम करावे लागले. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आता डॉक्टर झाले आहेत. त्या डॉक्टरांना जाऊन विचारा की वीर सावरकर कोणत्या बोटेतून उडी मारून…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्यावर पायी जात असतांना एका ३९ वर्षीय महिलेची दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील स्टेशन रोड परिसरातील लोकसेवा झेरोक्स समोरील रोडवर दि २८ रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पटवारी कॉलनीतील रहिवासी असलेले वंदना गणेश पाटील (वय ३९) या पायी पाणीपुरी खाण्यासाठी जात असताना दोन भामटे दुचाकीने राँगसाईटने येत त्यांच्या गळ्यातील ३ ग्राम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी महिलेने थेट अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून…
जळगाव : प्रतिनिधी दोन मित्र वीटभट्टीवर दुचाकीने जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरुन भरधाव वेगाने येणार्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील मनुदेवी माता मंदिरासमोर घडली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीस्वार सुरेश गणपत कुंभार (हिवरकर)(वय-40, रा. चौघुले प्लॉट) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मित्र दिलीप तुकडू कुंभार हे गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील चौघुले प्लॉट परिसरात सुरेश कुंभार हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचा विटभट्टीचा व्यवसाय असून त्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. त्यांची ममुराबाद रोडवर विट भट्टी…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावदसह परिसरात सोमवारी रात्री येथील मुख्य रस्त्यावरील ४ ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे सकाळी उघडकीस आले. यात एक पतसंस्था असून २ मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश आहे. त्यापैकी कापड दुकानात मात्र किरकोळ चोरी झाल्याचे समोर आले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून परिसरात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. शेतशिवारातून केबल, स्टार्टर याचबरोबर मोबाइल, मोटारसायकली आदी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात बऱ्याचदा किरकोळ चोऱ्यांच्या घटनांची नोंद करण्यात ग्रामस्थ पुढाकार घेत नाहीत. दरम्यान, सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी येथील एका पतसंस्थेचे लोखंडी गेटचे कुलूप तोडले. परंतु लोखंडी गेटच ते उघडू शकले नाहीत. पुढे त्याच रोडवरील २ मेडिकल स्टोअर्सचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न…
धरणगाव : प्रतिनिधी आगामी बाजार समिती,जि.प.व पं स. तसेच विविध स्थानिक संस्थेचा निवडणुकीत जागेचा बरोबरीचा वाटाघाटी सहीत सन्मान पुर्वक वागणुक मिळाल्यास शिंदे गटाचा शिवसेनेशी युती करा अन्यथा स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी सज्ज व्हा..!अशी माहिती कार्यकर्ते चा मेळाव्यात देण्यात आली. नुकताच येथील भाजपा चा तालुक्यातील मेळावा संपन्न झाला त्या प्रसंगी कार्यकर्ते तसेच नेत्याचा चर्चेत एक मुखी मागणी करण्यात आली साळवा फाटा जवळील साकरे गावा जवळ भारतीय जनता पार्टीचा मार्केट कमिटी निवडणूक संदर्भात व बुथ सशक्तीकरण कार्यकर्ता मेळावा संपन्न त्या प्रसंगी विविध स्थानिक संस्थेचा निवडणुका विषयी युती संदर्भात चर्चा करण्यात आली त्यात तालुक्यातील बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख,शेतकरी आघाडी,ओबीसी आघाडी,युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारिंचा मेळावा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटकच्या बंगळुरू शहरात कारमधील ‘जीपीएस’ प्रणालीमुळे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध स्थानिक न्यायालयात धाव घेतली आणि कोर्टाच्या आदेशानुसार दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याचे २०१४ मध्ये लग्न झाले. दोघांना ६ वर्षांची मुलगीही आहे. तो रात्रपाळीत काम करायचा आणि कारमधील जीपीएसचा डेटा तपासेपर्यंत सर्व सुरळीत होते. ‘मी २०२० मध्ये कार खरेदी केली. त्यात स्मार्टफोनशी जोडलेली जीपीएस प्रणाली होती.घरात कुणालाही याबाबत सांगितले नव्हते. एके दिवशी रात्रपाळीसाठी कामावर असताना कोणीतरी घरून गाडी बाहेर नेल्याचे लक्षात आले. जीपीएस तपासल्यावर कार एका हॉटेलबाहेर थांबल्याचे दिसत होते. पहाटे ५ च्या सुमारास कार पुन्हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर पहिल्याच दिवशी आपल्या डायलॉगबाजीमुळे चर्चेत आलेला पुष्पा चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. झुकेगा नही साला म्हणत अल्लू अर्जुनने केलेली हटके भूमिका पाहून तर चाहते त्याच्या प्रेमात पडले. आता हाच ‘पुष्पा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो, याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता फार वाट पाहावी लागणार नाहीये. कारण ‘पुष्पा २’ चा पहिले पोस्टर समोर आले आहे. अल्लू अर्जुनच्या अभिनयाने सजलेला ‘पुष्पा २’ म्हणजेच ‘पुष्पा: द रुल’ डिसेंबर महिन्यात धमाका करायला सज्ज आहे. पुन्हा एकदा अल्लू अर्जुनचा दबदबा यामुळे अनुभवायला मिळणार आहे. पुष्पाभाऊच्या नव्या अवतारात नेमकं काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चाहते पुढची कथा…
अमळनेर : प्रतिनिधी पिस्तूल दाखवून डांगर शिवारातील पेट्रोल पंपासह तिघांना लुटणाऱ्या आरोपीचा बुटावरून शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. रईस शेख उस्मान (४०) आणि आरिफ अहमद शेख (३५, दोघे रा. आळंद, ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी कि, २४ रोजी मध्यरात्री शिवारातील पांडुरंग पेट्रोल पंपावर एकाने पिस्तूल दाखवत पंपावरील कर्मचारी व पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एक अशांकडून ३६ हजार रुपये लुटले होते. त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या बुटावरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. रईस शेख हा बंगाली फाइलमध्ये राहत होता. गल्लीत वाहनचालक असल्याचे त्याने सांगितले. न्या. स्वाती जोंधळे यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.…
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरामध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे पथक रविवारी रात्री एमआयडीसी परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी चार लोकांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. सविस्तर वृत्त असे कि, चौघांना पकडून विचारपूस केल्यानंतर त्यांनी अकबर दगडू पटेल (३५, रा. हरिविठ्ठलनगर), ऋषिकेश कैलास पाटील (२२), अमोल संजय पाटील (२३, दोन्ही रा. एमआयडीसी) अशी त्यांची नावे सांगितली तर त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती चौघे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याजवळून चोरी करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, चेतन…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहरू चौकात सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावर आलेल्या पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या अॅड. योगेश जालमसिंग पाटील (४५, रा. दादावाडी) यांच्या वाहनाला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील मुळचे तमगव्हाण येथील अॅड. योगेश पाटील हे कुटूंबासह दादावाडीत वास्तव्यास होते. सायंकाळी ते त्यांच्या शाहु महाराज कार्यालयात कॉम्प्लेक्समधील असताना रेल्वे स्थानकावर आलेल्या एका पक्षकाराचा त्यांना फोन आला म्हणून ते पक्षकाराकडील कागदपत्र घेण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने (एमएच. १९. सीई. ६५११) निघाले होते. कोर्ट चौकाकडून रेल्वे स्थानकाकडे जात असताना…

