Author: editor desk

एका कुटुंबात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. २३ वर्षीय मुलीने तिच्या आई आणि मावशीचे नग्न फोटो तिच्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचा आरोप आहे. ही घटना कुटुंबात मोठी खळबळ उडवणारी असून, आईने ताबडतोब पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रेमीविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी एका धक्कादायक प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका तरुणीने तिच्या आई आणि मावशीचे नग्न फोटो तिच्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचा आरोप या प्रकरणात समोर आला आहे. आईला ही गोष्ट कळताच तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, २३ वर्षीय मुलीने तिचे आणि मावशीचे खासगी फोटो तिच्या प्रियकर वरुण उर्फ गिरिधर याला पाठवले. मुलीने वरुणच्या…

Read More

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांचा समावेश असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असून, त्यानंतर किल्ले बनविण्याची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच चित्रकला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा पराभव हा त्यांच्या नकारात्मक प्रचाराचा परिणाम असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला राज्यभर मोठे यश मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी पार पडली. या निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीने बहुतांश जागांवर विजय मिळवला असून, विरोधी महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम राहिली आहे. पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “आम्ही निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामीण जनतेपुढे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारच्या…

Read More

बारामती  : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रकृती काहीशी ढासळली होती. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहात होते. आज बारामती येथे पार पडणाऱ्या अजित पवार यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. घरी विश्रांती घेऊनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांना पुण्यात नेण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे.…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत रात्री २.३० ते ३ वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून जाळपोळी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घरातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात इसम नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून घटनास्थळी आले होते. लोखंडी गेट ओलांडून ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचले आणि बिलसरीतून पेट्रोल ओतून आग लावली. दरवाज्याजवळील परद्याने तात्काळ पेट घेतल्याने धूर घरात पसरला, परंतु घरातील सदस्यांनी धाडस दाखवून आग विझवली. घटनास्थळी आढळलेल्या रिकाम्या पेट्रोलच्या बाटल्या, माचिस पेटी आणि जळालेल्या आगकाडीमुळे हा प्रकार जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. शेजारील किराणा…

Read More

३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन जळगाव : प्रतिनिधी  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करून माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले असून, जिल्ह्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांनी आवाहन केले आहे की, ज्यांची ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली आहे किंवा ज्यांना अद्याप लाभ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने जात असतांना दुचाकीचा अपघात होवून रतन वसंत गायकवाड (वय ५१, रा. दापोरा, ता. जळगाव) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांचयवर उपचार सुरु असतांना दि. ७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रतन गायकवाड यांचा वावडदा जवळून जात असतांना दुचाकीचा अपघात झाल्याची घटना दि. २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. त्यांना एका खासगी रुग्णालयता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदुला मार लागल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतू अतिदक्षता विभागात उपचार सुरु…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कांताई बंधाऱ्यावर घडली. आशुतोष दिलीप जोशी (वय २२, रा. गणेश नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नगर, जळगाव येथील रहिवासी असलेला आशुतोष जोशी याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो मंदिर व संस्थांच्यावतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन व कीर्तन सादर करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी सकाळी तो आपल्या मित्रांसोबत कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी आशुतोषचे मामा शिवराज जोशी तसेच इतर नातेवाईकांनी त्याला बाहेर जाण्यास विरोध करत वास्तूशांतीच्या विधीसाठी सोबत येण्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मैत्रीणीसोबत शिरसोली रस्त्यावरील कुरुक्षेत्र टर्फ परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशयिताने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दि. ७ रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  आदित्य विलास चेके (वय २२, रा. श्रीधरनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित शेख रोशन शेख उस्मान (रा. तांबापुरा) याने आदित्य व त्याच्या मैत्रीणीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता संशयिताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर आदित्य चेके यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

आजचे राशिभविष्य दि ९ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या धाकट्या भावाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल. या राशीचे प्रेमी आज भेटवस्तूंची देवाणघेवाण करतील, ज्यामुळे त्यांचे प्रेम द्विगुणित होईल. लोखंड व्यवसायात असलेल्यांना आज लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. आज अनावश्यक वाद टाळा. ताणलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मेष राशी आज लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या धाकट्या भावाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या…

Read More