Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !
    क्राईम

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    editor deskBy editor deskDecember 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कपडे विक्रीसाठी आसोदा येथे जात असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे नंद साबणदास जगिया (६८, रा. भुसावळ) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी, दि. २० रोजी, दुपारी आसोदा सहींस रोडवर झाला. तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  भुसावळ येथील नंद जगिया हे कापड विक्रीसाठी बायपासवरून आसोदा सव्र्व्हस रोडने जात असताना त्यांना मालवाहू वाहनाने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. काही जणांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यांनी जगिया यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. बायपासवर अपघात झाल्याचा व्हिडिओ व्हाटस् अॅप ग्रुपवर शेअर करण्यात आल्यानंतर तो मयताचे पुतणे विशाल अमरलाल जगिया (२३, रा. भुसावळ) यांनी पाहिला. त्यावेळी त्यांना काकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी वाहनचालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    धरणगाव नगर परिषदेत विनय (पप्पू )भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    January 13, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना भावनिक प्रतिसाद

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.