Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या अपघातावर शंका उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. “अजितदादांचा मृत्यू झाला, यावर विश्वास बसत नव्हता. आज दादा आपल्यात नसले तरी विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात सविस्तर माहिती आणि सादरीकरण मांडले. “दादा परत आले, तर मी त्यांना घट्ट मिठी मारेल, अशी इच्छा आजही मनात आहे. मात्र वास्तव स्वीकारावे लागते,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रोहित पवार म्हणाले की,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या व्याख्यानमालेदरम्यान संघप्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या भाषिक वादावरील वक्तव्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले असून, त्यांनी सोशल मीडियावरून तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे, “मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, तुमच्या कार्यक्रमाला आलेली मंडळी तुमच्या प्रेमाखातर आलेली नव्हती, तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. अन्यथा आजवर या असल्या रटाळ प्रवचनांना कोणी आले नाही. त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती, या गैरसमजातून आधी बाहेर या,” अशी घणाघाती टीका केली. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला भाजपचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १० फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असल्याने संपूर्ण बैठकीला भावनिक पार्श्वभूमी लाभली होती. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देत मंत्रिमंडळात त्यांचे स्वागत केले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांनी यापूर्वी सूचवलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या बैठकीत बारामती…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अलिकडेच कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत देणारे वक्तव्य केले होते. कणकवली येथे स्थानिक नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना त्यांनी, “आता आपण थकलो आहोत. किती करणार यालाही मर्यादा असते,” असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. याच भाषणात त्यांनी आपली दोन्ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्या प्रक्रियेशी माझा थेट संबंध नाही. पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीपुढे प्रस्ताव घेऊन आले, तरच यावर बोलणे योग्य ठरेल. तोपर्यंत हवेत पतंगबाजी कशाला?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित दिल्ली दौऱ्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याच्या वृत्तामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मात्र, या चर्चांवर फडणवीस यांनी संयमित भूमिका घेत अफवांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घराशेजारी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या दोरीला गळफास घेत रियाज जोहबा तडवी (वय १९, मूळ रा. लोहारा, ता. रावेर, ह. मु. सुप्रिम कॉलनी) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील लोहारा येथील रियाज तडवी हा तरुण कुटुंबासह सध्या सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होता. तो मजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्यांच्या घराशेजारी कार्यक्रम असल्यामुळे मंडप उभारण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रियाज याने मंडपाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. शनिवारी पहाटे ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कट लागल्याच्या कारणावरुन दुचाकी आणि कार चालक रस्त्यात थांबले होते. त्यामुळे ट्रॉफिक जाम होत असल्याने सोडविण्यासाठी गेलेल्या वाहतुक पोलिसांच्या दारुच्या नशेत असलेले तरुण अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडली. याप्रकरणी संशयित अविनाश दिलीप शरमळे (वय २२) आणि शाईदास भगवान राठोड (वय २०, दोन्ही राहणार रामेश्वर कॉलनी) या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहर वाहतुक शाखेत नियुक्त असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक तुळशीराम बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल आकाश गोसावी हे रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. रात्री साडेआठ…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था राज्य प्रशासनातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि कामकाजाला गती देण्यासाठी लवकरच ७० हजारांहून अधिक पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि संपूर्णपणे नव्या पद्धतीने पार पडणार असल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५० हजार पदे, तर उर्वरित पदे आयोगाबाहेरील यंत्रणेमार्फत भरली जाणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रशासकीय सुधारणांचा भाग म्हणून ही भरती करताना पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अनावश्यक कागदपत्रे आणि भरती प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी ऑनलाइन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर सरकारचा भर…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१० फेब्रुवारी २०२६ मेष राशी लोकांवर अधिकार गाजवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा; त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना आज जवळच्या व्यक्तीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या करिअरच्या बाबतीत, तुमच्यावर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्यांचा भार पडू शकतो. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस खूप छान असेल. जोडीदाराचे प्रमोशन होईल, आनंद वाढेल. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या अंतःप्रेरणेनुसार निर्णय घ्याल. पण, ते फक्त आर्थिक बाबींमध्ये फायदेशीर ठरतील. जर तुम्ही आज येणाऱ्या सर्व आव्हानांना धैर्याने तोंड दिले तर तुम्हाला यश मिळेल. मात्र, चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला आळस सोडावा लागेल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दिनांक ०८/०२/२०२६ रोजी आनंद मोर्या, रा. अयोध्या, झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान त्यांची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या बॅगेत १,६५,०००/- रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने होते. सदर प्रकरणाची तक्रार आनंद मोर्यांनी इटारसी रेल्वे पोलीसात दाखल केली होती, जी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तपास सुरू केला. तपासात जळगाव येथील रेकॉर्डवरील आरोपी समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर, अल्फरा मशीद जवळ, वय २१) आणि त्याचा साथीदार सोनु जयसिंग बागडे (रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) या दोघांनी हा गुन्हा केले असल्याचे खात्रीस…

Read More