Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  आज पुन्हा एकदा महसूलच्या तलाठ्यासह कोतवालाने शुल्लक कारणाने चार हजाराची लाच घेतल्याने महसूल विभागात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. मिळालेली माहिती अशी कि, रावेर तालुक्यातील खिरोदा येथील एका तालाठ्यासह कोतवालाला सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या टीमने रंगेहाथ अटक केली असून यामध्ये खिरोदा तलाठी न्यायदे तर कोतवाल असलेला शांताराम कोळी असे अटकेतील आरोपीची नावे आहेत. जळगाव एसीबीचे पोलीस अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांच्यासह आदीच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील वडली या गावातील रहिवासी असलेल्या आई वडिलासोबत मुलाने विषप्राशन केल्याची घटना आज सकाळी गुरुवार ६ रोजी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यातील वडिलांचा मृत्यू झाला असून आई आणि मुलगा या दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान तिघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती समोर आली नाही. सविस्तर वृत्त असे  कि, वडली गावातील रहिवाशी असलेले नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती पाटील (वय-५५) आणि मुलगा गणेश पाटील (वय-३३) असून त्यांच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून तणावाची परिस्थिती असल्याने त्यांनी आज सकाळी विषप्राशन केले. यानंतर त्यांना अत्यवस्थ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात युवतीचा गाल ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शहरातील नवी पेठ परिसरात घडली आहे. मिळालेली माहिती अशी कि, पीडिता हि शहरातील एका भागात राहत असून नवीपेठ परिसरात एकाने तिचा हात धरून नंतर गाल ओढून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार ५ एप्रिल रोजी दुपारी घडला. या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला समीर शेख )नाव गाव पूर्ण माहीत नाही ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत तपास करत आहेत.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरी चिकन खायला मिळालं नसल्यामुळे बापाने आपल्या पोटच्या मुलाला दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर काही वेळात मुलाचा मृ्त्यू झाला, असल्याचं एका वेबसाईने म्हटलं आहे. कर्नाटक राज्यात एक भयानक घटना घडली आहे. त्या मुलाचं वय 32 होतं. पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की, त्या मुलाला दांडक्याने मारहाण केली आहे. त्यामुळे त्याचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणाची सगळी माहिती पोलिसांनी (police) बुधवारी झाली केली आहे. मंगळवारी दक्षिण कन्नड़ जिल्ह्यात सुलिया तालुक्यातील गुट्टीगर गावात ही घटना घडली. ज्या मुलाचा मृ्त्यू झाला आहे, त्याचं नाव शिवराम असं आहे. घरात बनवलेली चिकन करी खाण्यावरुन शिवराम आणि त्याच्या वडिलाचं भांडण झालं. त्याच्यानंतर संतापलेल्या…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने घरातून पळवून नेल्या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे  कि, तालुक्यातील मांडळ गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ४ एप्रिलच्या रात्रीपासून ते ५ एप्रिल २०२३ च्या सकाळी ४ वाजे दरम्यान अल्पवयीन मुलगी घराच्या ओसरीत असलेल्या खाटेवर झोपलेली असतांना अनोळखी इसमाने मुलीस काहीतरी आमिष देत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मारवाड पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.भरत गायकवाड हे करीत आहेत.

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष सुरेश मोरे असे आरोपीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विशाल राजु अहिरे व त्याचे साथीदार टोळीने दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजल्यावरून त्यांनी ४ रोजी ११ : ३० वाजेच्या सुमारास मेहरुण स्मशानभूमीजवळ असलेल्या उद्यानाजवळ विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे (रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव), गोपाल चौधरी, दिक्षांत उर्फ दादु सपकाळे, शुभम धोबी आदी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने याठिकाणी जमले होते. .त्यांची दरोडा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील एका ४४ वर्षीय महिलेचा एका तरुणाने विनयभंग भर दिवसा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे  कि, तालुक्यातील एका गावात ४४ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ५ एप्रिल रोजी दुपारी ६.३० वाजेच्या सुमारास गावातील बस स्थानकाजवळ महिला जात असतांना संशयित आरोपी इब्राहीम टिप्या सत्तार(वय २९) हा महिलाचा त्याच्याजवळील विनानंबरच्या दुचाकीने सतत पाठलाग करीत शिट्या मारीत वाईट इशारे करीत त्यासोबत महिलेच्या अंगावर दुचाकी आणत चलती का खंडाळा असे म्हणून ४४ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी महिलेने भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मोठ्या जोमात कामाला लागली आहे. तर जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवत दोनगाव गाव येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. त्यामुळे आजही जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जलवा कायम मानला जात आहे. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांचा नेतृत्वात व पालकमंत्री ना.श्री गुलाबरावजी पाटील यांचा आशीर्वादाणे दोनगाव बु!! ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला या वेळी ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच पदाचे पदभार स्वीकारलेले प्र.सरपंच सौ,वनिता सुरेश पवार, सौ चंदनबाई सुरेश पाटील. सौ. मनीषा भाऊलाल पाटील. सौ शुभांगी संदीप पाटील.सौ.अश्विनी गणेश पाटील. युवासेना उपतालुका प्रमुख अमोल विजय पाटील, सुरेश पवार, सुरेश…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अनेकदा प्रवाशांची तक्रार असते की ट्रेन खूप उशिरानं धावत आहे. भारतीय रेल्वे तुम्हाला फक्त ट्रेनमध्येच प्रवास करवत नाही, तर रेल्वे स्थानकावर अनेक आलिशान खोल्या आहेत ज्यात तुम्ही आरामही करू शकता. या ५ स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त ४० रुपये खर्च करावे लागतील. आजही ९९ टक्क्यांना लोकांना याबद्दल कोणतीही माहिती नाही, त्यामुळे बहुतांश लोक रेल्वेच्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कशी कराल रुम बुक? रेल्वे स्थानकावर रूम बुक करण्यासाठी तुम्हाला आधी कन्फर्म तिकीट लागेल. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करत आहात त्या ट्रेनच्या कन्फर्म तिकिटाचा PNR नंबर रेल्वे स्टेशनवर रूम बुक करण्यात मदत करेल. या खोल्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नुकतीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केल्यानंतर हि टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिव्हारी लागली असून आता त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचा जन्म काढल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, आदित्य ठाकरेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तर ही चोरांची टोळी आहे. महाराष्ट्रात गुजरातचे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी घणाघाती टीका बुधवारी ठाण्यात काढलेल्या…

Read More