पुणे : वृत्तसंस्था अनैतिक सबंधातून महिलेसह तिच्या दोन लहानग्यां मुलांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील या तिहेरी हत्याकांडात दिरानेच वहिनीसह तिच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून जाळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने चारित्र्यावर संशय घेत अगोदर गळा दाबून जीव घेतला आणि नंतर पेटवून दिल्याची माहीती पोलिसांनी दिले आहेत. वैभव वाघमारे असे खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर अम्रपाली वाघमारे असे मयत महिलेचे नाव आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा चौफुली जवळ भरधाव वेगाने जाणार्या कारने कंपनीतून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या राजकुमार सोमोमल धामेचा (वय-65) रा. सम्राट कॉलनी यांना जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून कारचालक पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सम्राट कॉलनीत राजकुमार धामेचा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. गेल्या 10 वर्षांपासून ते एमआयडीसीतील बाबा नमकीन येथे नोकरीला होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. त्यांची तब्बेत बरी नसल्याने ते रात्री घरी येण्यासाठी निघाले. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास अजिंठा चौकातील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने दारु पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत झालेली त्याची १२वी पत्नी होती. याआधी त्याने ११ लग्ने केली होती पण दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदरच्या पत्नींनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने बारावे लग्न केले. दरम्यान या पत्नीने देखील दारू पिण्यास पतीला विरोध केला. यावेळी त्याला राग आला, त्याने रागाच्याभरात पत्नीची हत्या केली. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. मिळालेली माहिती अशी, झारखंडमधील बोकारो येथे राहणाऱ्या रामचंद्र तुरी याने १२ लग्ने केली होती. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदर…
मुंबई : वृत्तसंस्था केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. त्याला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे. शाहरुख सैनी असे या आरोपीचे नाव आहे. सेंट्रल इंटेलिजन्स आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळून त्याला अटक केली. अलप्पुझा आणि कन्नुर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये २ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या दरम्यान, कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर ट्रेन पोहोचली असताना प्रवाशांसोबत झालेल्या वादातून आरोपी शाहरुख सैफी याने सहप्रवाशांवर एक ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तीन प्रवाशांनी चालत्या गाडीतून…
पुणे : वृत्तसंस्था उन्हाळा सुरु झाला की, आंबा प्रेमींना रसरशीत आंब्यांचे वेध लागतात. सुरुवातीला आंब्यांच्या किंमती या गगणाला भिडलेल्या असतात. यामध्ये हापूस आंब्यांविषयी तर मग बोलायलाच नको. पण पुण्यातील एका दुकानदाराने ग्राहकांसाठी खास ऑफर काढली आहे. मग काय आंबा प्रेमींना पैसे पाहून मनावर ताबा ठेवावा लागतो. पण पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, ते उगाच नाही. पुण्यातील एका आंबा विक्रेत्यांने आंबा प्रेमींसाठी एक खास ऑफर आणली आहे. येथे चक्क EMI वर हापूस आंबा मिळतोय. तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना? पण हे अगदी खरं आहे. गुरू सणस या व्यापाऱ्याने ही ऑफर सुरु केलीये. यामुळे आता आंबा प्रेमी पैशांची चिंता न करता…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्याबाबत अनेक चर्चा होवू लागल्या होत्या पण अद्याप तारीख जाहीर न झाल्याने आमदारासह कार्यकर्ते गोंधळात होते पण आता हा दौरा निश्चित झाला असून येत्या ९ रोजी मुख्यमंत्री शिंदेसह ४० आमदार अयोध्यात दाखल होणार आहे. या दौऱ्याचा टीझर आता जारी करण्यात आला आहे. ‘अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ’, अशी टॅगलाईन असलेला हा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र एक सुशासित राज्य आहे, असा दावा करण्यात आला आहे. टीझरमध्ये महाराष्ट्रात सामान्य जनता हा…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील गांधली येथील एका २८ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र बसमध्ये बसत असतांना अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील गांधली येथील रहिवासी शुभांगिनी पाटील (वय २८) या दि ४ एप्रिल रोजी साय.५ वाजेच्या सुमारास अमळनेर येथून आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानक परिसरात असलेल्या बसमध्ये गर्दीमधून चढत असतांना अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने तत्काळ अमळनेर पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.विलास पाटील हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात ३० वर्षीय विवाहितेला गरम दुधात गोळ्या देवून तिच्यावर एक वर्षापासून तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरीविठ्ल नगर परिसरात एक ३० वर्षीय विवाहिता आपल्या पती व मुलासह वास्तव्यास आहे. संशयित आरोपी जयदीप पाटील (वय ३०, पाचोरा) याने दि.४ जानेवारी २०२२ ते ३ एप्रिल २०२३ या काळात विवाहितेला गरम दुधात गोळ्या देत तिच्यासोबत शरीर संबध केले. हा प्रकार ज्यावेळी विवाहितेच्या लक्षात आला त्यावेळी विवाहितेने त्याला जाब विचारला असता त्याने तु हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या पतीचा मर्डर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील २२ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना सिगारेटसाठी पैसे मागितले असता वडिलांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला म्हणून मुलाने वडीलांशी हुज्जत घालून समजविण्यासाठी आलेल्या आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा-हुडको येथे घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा देवेंद्र गजानन साळूंखे (२२) याच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा-हुडको परिसरातील प्रमिला साळूंखे हे आपल्या पती गजानन, मोठा मुलगा देवेंद्र व लहान मुलगा कार्तिक यांच्यासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास देवेंद्र याने वडीलांकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने वडीलांशी…
बोदवड : प्रतिनिधी लग्नात सप्तपदी घेत सात जन्माची गाठ बांधली. मात्र, ही गाठ सैल झाली आणि सात वर्षांनी विवाहितेने नवऱ्याला सोडत प्रियकराचा हात धरला. बोदवड तालुक्यातील एका गावातील माहेर असलेल्या विवाहितेने हा प्रकार केला आहे. त्या प्रकरणात तिच्या भावानेच पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली, तर अन्य शहरातील तीस वर्षांची विवाहिता प्रियकरासोबत निघून गेली आहे. तालुक्यातील एका गावात २७ वर्षांच्या विवाहितेचे माहेर आहे. ती माहेरी आली होती. त्याच काळात सातत्याने गावात येत असलेल्या एका तरुणासोबत तिचे सूत जुळले. तिने कुठलाही विचार न करता त्याच्यासोबत जाणे पसंत केले. माहेरी आली असताना ती घरी नाही, हे पाहून तिच्या भावाने शोधाशोध केली. मात्र,…

