Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील १२ वर्षीय मुलाला विषबाधा होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदित्य योगेश माचरे असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी कि, आई व दोन बहिणींसोबत आदित्य माचरे हा वास्तव्याला होतो. वडीलांचे निधन झाल्याने त्याची आई रिना माचरे ह्या मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार दि.६ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने आदित्य हा त्याचा मामा जितू गारूंगे आणि मामी आरती गारूंगे यांच्यासोबत दुचाकीने एका ठिकाणी हनुमान मदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेतल्यानंतर परत येत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील पिंप्राळा आठवडे बाजार मुख्य रस्त्यावर शुक्रवारी एका ५६ वर्षीय इसमास मारहाण करीत मोबाईल लांबवत असतांना त्यांनी आरोडा ओरड केल्याने मोबाईल चोरटे पकडले गेले आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील दादावाडी परिसरातील रहिवासी असलेले लखीचंद वामन बडगुजर (वय ५६) हे मोबाइल दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना यांना चार जणांनी रस्त्यात अडवून मारहाण करीत त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. दरम्यान, त्यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तीन जणांना पकडले. मात्र, एक पसार होण्यास यशस्वी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंप्राळा आठवडे बाजार रस्त्यावर घडली असून, तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. लखीचंद बडगुजर हे स्कूल बस हे चालवून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अजित पवार सकाळी पुण्यात होते. अजित पवार यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला आहे आणि “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिलं आहे. त्यामुळे अजितदादा नॉट…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  उत्तर प्रदेशातील हरदोई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात आलेल्या तरुणामुळे सगळेजण चक्रावले होते. वेदनेने विव्हळणाऱ्या या युवकाने जे डॉक्टरांना सांगितले त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. या तरुणाने डॉक्टरांना सांगितले की त्याच्या गुप्तांगातून साप घुसला आणि तो पोटात शिरला आहे. हे ऐकून चक्रावलेल्या डॉक्टरांनी ताबडतोब या तरुणाला दाखल करून घेत चाचण्या करण्यास सुरूवात केली. या तरुणाचं वय 25 वर्षे असून तो बनियानी पुरवा गावचा रहिवासी आहे. मनीष (तरुणाचे बदललेले नाव) सोमवारी संध्याकाळी उशिरा पोट रिकामं करण्यासाठी परसाकडेला गेला होता. काहीवेळातच मनीष घरी ओरडत परतला होता. मनीषने त्याच्या भावाला सांगितलं की त्याच्या पोटामध्ये काळ्या रंगा किडा गेला आहे. तो…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  ऐन लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी अमोल कोल्हे यांना भाजपमध्ये यावे वाटू शकते. त्यावेळी त्यांना विद्यमान खासदार म्हणून तिकीट द्यावेच लागेल, असे वक्तव्य करून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धमाल उडवून दिली आहे. खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यापूर्वी रंगल्या होत्या. ही चर्चा शांत होते न होते, तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा कोल्हे खरेच भाजपच्या वाटेवर आहेत का, याची कुजबुज सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा फेब्रुवारी महिन्यातही रंगली. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. त्यामुळे या चर्चेला…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गजाआड केले आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना अशी धमकी देण्यात आली होती. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहे. त्यानेच महेश लांडगे, अविनाश बागवे आणि वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे. इम्रान शेख याला घोरपडी परिसरातून अटक केली. मागील दिवसांपासून पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत होते. या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी वेगाने तपास सुरु करून आरोपीला अटक केली. अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज वसंत मोरे यांच्या मुलास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दि ५ रोजी एकाच दिवसात वेगवेगळ्या तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलिसात तर दुसरा गुन्हा पिंपळगाव हरे.पोलिसात दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पहिली घटना एरंडोल शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ती घरी असताना अनोळखी इसमाने काही तरी फूस लावत पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलानी एरंडोल पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि.गणेश अहिरे हे करीत आहे. दुसरी घटना पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजी सोबत वास्तव्यास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात भर सायंकाळच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी सांधत घरफोडी केली आहे. यात तब्बल ४ लाख ३० हजाराचे सोन्यासह रोकड लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील विजय कॉलनी परिसरातील प्रसाद अपार्टमेंट येथील घर न.१० मधील रहिवासी गणेश नारायण व्यास(वय ४९) हे दि ६ रोजी घरी कुणीही नसताना चोरट्यांनी हीच संधीचा फायदा घेत घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान चोरून नेले. यातील १ लाख ८० हजाराची रोकड तर २ लाख २५…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन विवाहिता पतीला काही न सांगता, घरून निघून गेल्याच्या घटना १ एप्रिल व ३ एप्रिल रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसात हरविल्याची नोंद देखील करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, पहिल्या घटनेत शहरातील इच्छादेवी चौक परिसरात आपल्या पती सोबत राहणारी ३८ वर्षीय विवाहिता १ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरात काही न सांगता रफूचक्कर झाली. याबाबत पतीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार नितीन पाटील हे करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत शहरातील सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील ३० वर्षीय विवाहिता देखील पती किंवा घरातील…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  शहरातील एका ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमीष दाखवुन, एकाने तिच्यावर ब्युटीपार्लर व इतर ठिकाणी अत्याचार केले. तसेच वेळोवेळी 4 लाख रुपये घेवु परत केले नाहीत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेली ४३ वर्षीय महिलेस संशयित आरोपी निरंजन अशोक लद्दे रा. मिलगेटच्या पाठीमागे, चाळीसगांव याने महिलेचा विश्वास संपादन करुन, मला बायको पासुन समाधान मिळत नाही, मला तुझी आठवण येते, मला तुझी सवय झालेली आहे, मला माझी बायको आवडत नाही, तुच माझे एकमेव प्रेम आहे असे सांगुन तिच्या संमती शिवाय ब्युटी पार्लर चाळीसगांव येथे आरोपीच्या घरी…

Read More