Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने १५ ते २१ एप्रिलदरम्यान स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटीया, सचिव आर.एन. महाजन यांनी गुरुवारी दिली. हा कार्यक्रम बालकवी ठोंबरे विद्यालयात होणार असून, त्यात महाराष्ट्रातील नामांकित वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर संध्याकाळी ८:३० वाजता सुरू होईल. तरी शहर व तालुका परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटीया व सचिव आर. एन. महाजन यांनी केले आहे. या कार्यक्रमात १५ एप्रिल रोजी मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर विषयावर अक्षय जोग, पुणे, १६ एप्रिल रोजी सामाजिक राष्ट्रवादाचे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात होणारे खून प्रत्येकवेळी हे प्रेमप्रकरणातून होत असल्याचे नेहमी समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना घडल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. प्रथम विवाहितेने आपल्या प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला आणि संधी मिळताच चहामध्ये विष पाजून त्याला मृत्यूच्या स्वाधीन केले. यामध्ये पतीचा मृत्यू झाला. महिलेने या प्रकरणाला आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र या घटनेशी संबंधित मृत शाहिद खानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण उलघडलं. मृत्यूपूर्वी शाहिदने पत्नी, तिचा प्रियकर आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ बनवला होता. या व्हिडिओनंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकर आणि आईला अटक केली. या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका मार्केट परिसरातून एकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धामणगाव येथील रहिवासी असलेले योगराज लक्ष्मण सपकाळे(वय ३९) हे दि ७ एप्रिल रोजी शहरातील फुले मार्केट परिसरातील दाणा बाजार येथे कामानिमित आले होते. त्यांनी लोखंडी गेटजवळ आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.बीसी.८००५ हि २० हजार रुपये किमतीची पार्क करून कामानिमित गेले असता अनोळखी चोरट्यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हि दुचाकी चोरून नेली असून या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.राजकुमार चव्हाण हे करीत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील जनतेला नेहमी प्रत्येक पक्षातील नेत्यांचे खाजगी आयुष्य वाचायला खूप आवडत असते. तसेच अनेक वेळा बॉलीवूड क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील अनेक नेते व अभिनेत्याची खाजगी आयुष्य जरा चर्चेचा विषय असतो, अशीच चर्चा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रेमाची सध्या राज्यभर सुरु आहे. अमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल1979 साली झाला. अमृता या नेहमीच त्यांच्या पतीच्या बाजूने ठामपणे उभे राहताना आपण पाहिल्या आहेत. तसेच, अनेकदा त्यांचे नेत्यांसोबत झालेले ट्वीटर वाॅरही यला मिळतात. अमृता फडणवीस या गायिका तसेच समाजसेविका आहेत. अशा अमृता फडणवीस यांचा आज 44 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फिल्मी स्टाईलने केलेल्या प्रपोजचा भन्नाट…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. याचीच कुणकुण पोलिसांना लागल्याने भुसावळ शहरातील एका पान सेंटरमधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, भुसावळ शहरातील वसंत टॉकीज जवळील गायत्री पान सेंटरमधून राज्यात प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन दुकाने व घरून सुध्दा सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केला असून शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री पान सेंटरवर गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाल्याने त्यांनी एलसीबी कर्मचार्‍यांचे पथक मिळालेल्या…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  भर रस्त्यावर २९ वर्षीय महिलेची दुचाकी थांबवत व या आधी देखील महिलेवरवर अत्याचार केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, पारोळा शहरातील एका परिसरात २९ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दि ८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास महिला पारोळा येथून विचखेडा रस्त्यावर एकाने महिलेच्या दुचाकीसमोर येत गाडी थांबवत भररस्त्यावर महीलेला मारहाण करीत त्यासोबतच विनयभंग केला. या पूर्वी देखील याच महिलेसोबत संशयित आरोपीने अनेक वेळा अत्याचार केला असल्याने महिलेने थेट पारोळा पोलिसात धाव घेत एका संशयिताविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी.गंभीर शिंदे हे करीत आहेत.

Read More

पुणे : वृत्तसंस्था  कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असून शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सिंधुदुर्ग आणि मराठवाडय़ातील काही गावांत गारांचा वर्षाव झाला. दरम्यान, 10 एप्रिलपर्यंत पावसाळी वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी रात्रीपासून राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारीही काही भागांत पावसाचा जोर होता. सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला. यामुळे रब्बी हंगामातील आंबा, काजू, कोकम, सुपारी आदी फळबागांचे मोठे…

Read More

लखनऊ : वृत्तसंस्था  आयोध्येतील प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार त्यांनी हेच दर्शन आज घेणार आहे. त्यांच्या समवेत ४० आमदार व भाजपचे काही मंत्रीसह आमदार देखील असल्याचे समजते. शनिवारी रात्री लखनऊ विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ४० आमदारांसह लखनऊत पोहोचताच ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात शिंदेसेनेचे जंगी स्वागत करण्यात आले. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार आज अयोध्येसाठी लखनऊ विमानतळावरुन 9.30 वाजेच्या सुमारास निघतील. प्रथम हनुमान गढीवर पूजा करतील. दुपारी राम मंदिरात महाआरती करतील. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे भाजप नेतेही आज अयोध्येत दाखल होणार आहेत. शिंदेसेनेसह ते राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. एकनाथ…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन युवतीला प्रेमसंबंध तोडले तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत होता. अखेर युवतीने बदनामीच्या भीतीपोटी दि. २९ मार्च रोजी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन युवती व २३ वर्षीय तरुण यांच्यात प्रेमसंबंध जुळले. एकेदिवशी दोन्हींचे मोबाईलवरील संभाषण युवतीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. युवतीला बदनामीची भीती निर्माण झाली. नातेवाइकांनी युवतीला विश्वासात घेऊन प्रकार काय आहे? अशी विचारणा केली. यानंतर दोन्हींमधील प्रेमप्रकरण संपुष्टात आले. मात्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद येथे एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात शनिवारी त्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील ममुराबाद येथे जगदीश लक्ष्मण पाटील (३३) या तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जगदीश हा ममुराबाद येथे आई- वडिलांसह वास्तव्यास होता. तो जळगावातील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी घरात त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. सायं. ५ वाजता कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह…

Read More