Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात दुचाकी जवळून गेल्यामुळे पाळीव कुत्रा घाबरून पळाल्याच्या शुल्लक कारणावरून शेख सलिम शेख निजाम (५२, रा. सुप्रिम कॉलनी) यांना कुत्र्यांच्या मालकासह इतर तीन जणांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास समता नगरातील वंजारी टेकडीजवळ घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सलीम त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी भावाकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. वंजारी टेकडी जवळून जात असताना एका पाळीव कुत्र्याच्या बाजूने त्यांची दुचाकी गेली आणि तो कुत्रा घाबरून पळून गेला. हा प्रकार कुत्र्याच्या मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेख सलिम यांना शिवीगाळ करून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एमआयडीसीतील डी सेक्टर येथील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरून 50 हजार रुपये न आणळल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसी भागातील रहिवासी नयना प्रदीप राठोड (25) यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव करजगाव येथील प्रदीप शंकर राठोड यांच्याशी विवाह झाला आहे. नयना तिचे पती यांनी नयना हिच्या नणंदेकडून पन्नास हजार रुपये घेतले होते. या पैशांची परतफेड करण्यासाठी नयना हिने तिच्या माहेरून पन्नास हजार रुपये आणावेत, अशी मागणी पतीसह सासरच्या मंडळींनी केली तसेच या कारणावरून वेळोवेळी नयना तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात शिंदे गटाची व ठाकरे गटाची एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणात बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करत असतात. तर गुलाबराव पाटील त्यांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देताना पलटवार करत असतात. शनिवारी रायगड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे नुकसान केले त्यांच्यासोबत तुम्ही बसला आहात असा टोला लगावला. गुलाबराव पाटील म्हणाले, ज्या काँग्रेसने आम्हाला (शिवसैनिकांना) तुडवलं, ज्या काँग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडल. आधी छगन भुजबवळ ,…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्याचे राजकारण शुक्रवारी रात्रीपासून तापले होते. कारणही तसेच काही होते राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यानंतर आज दुपारी ते जेव्हा माध्यमासमोर आले तेव्हा अनेक राजकारणीचा जीव भांड्यात पडला आहे. “तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊन घरीच विश्रांती घेत होतो,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. “माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे व्यथित झालो आहे,” असं अजित पवार म्हणाले. तसंच “माध्यमांनी विनाकारण बदानामी करणं थांबवावं, खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात,” असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला. दरम्यान अजित पवार यांनी आज (8 एप्रिल) पुण्यातील खराडी येथे रांका ज्वेलर्सच्या शोरुमचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असतांना आज अचानक सोन्यासह चांदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसले आहे. सध्या सोन्याचा दर 60623 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74164 रुपये किलो दराने विकली जात आहे. मात्र, त्यावर कोणताही कर जोडलेला नाही. त्यामुळे आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सराफा बाजारातील नवीन दर सोमवारी म्हणजेच 10 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत. गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी बाजार बंद होता, तर आज शनिवार आणि उद्या रविवारी सराफा बाजारात सुट्टी आहे. याआधी गुरुवारी सोने 158 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60623 रुपये प्रति किलोवर बंद झाले. बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी…

Read More

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी  शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते येथे पार पडले. यावेळी महाजन बोलत होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याने राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धरणगाव शहरातील वैदूवाडा येथील मटण मार्केटची दुर्गंधी कायम स्वरुपी घालवून, गटार लाईन बंदिस्त करण्याबाबतचे निवेदन आज वैदू समाज विकास संस्थेच्या माध्यमातून तहसीलदार यांना देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हा अध्यक्ष दिपक सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे कि, नगरपरिषद धरणगावच्या मालकी हक्काची वैदूवाडा येथे बोकड-बकरी मटणाचे सहा व्यवसायिक गाळे चालू असून, गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या ठिकाणाची स्वच्छता करण्यासाठी येणारे पाण्याचे टँकर बंद झाले आहेत. आता त्या ठिकाणी कापले जाणारे पशुंची सर्व घाण सहा गाळ्यांचे व्यावसायिक फक्त एक-दोन बादल्या भर पाण्यात सर्व स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून खुनाची मालिका सुरूच आहे. नुकतेच रावेर तालुक्यातील निमड्या गावात एका इसमाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील निमड्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर तरुणाचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना शनिवारी सकाळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. रावेर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.घटनास्थळी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मयताच्या खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापूर्वी एका परिवारातील तीन जणांनी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यात दुर्देवाने वडिलांना जीव गेला होता तर आई व मुलगा जखमी असल्याची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट रुग्णालयात धाव घेत त्यांना धीर दिला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील त्याच्याशी बोलतांना म्हणाले कि, आत्महत्त्या पर्याय नाही आम्ही आहोत तुमच्या सोबत ना.गुलाबराव पाटील यांची सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या कुटुंबाला हात जोडून विनंती. कर्जाच्या जाचाला कंटाळून जळगाव तालुक्यातील वडली येथील शेतकरी कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी विष प्राशन केले. त्यांना ताबडतोब शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये वडीलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलाची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात होणारे महिलासह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कुठल्याही प्रकारे थांबता थांबत नाही आहे. नुकतेच शिक्षकी पेशाला काळिमा फासेल अशी घटना भुसावळ शहरात घडल्याने संतापजनक वातारण निर्माण झाले आहे. मिळालेली माहिती अशी कि, भुसावळ शहरातील एका १९ वर्षीय तरुणी एका मोठ्या करिअर क्लासमध्ये शिक्षण घेण्यासाठी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली आहे. त्याच क्लासेसमधील एका शिक्षकाने त्या तरुणीसोबत दि १ जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात वेळोवेळी क्लासमध्ये शिकवीत असतांना तरुणीला न विचारता त्याच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढली त्यासोबतच एका मैदानावर रनिग करीत असतांना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तसेच सुरु असलेल्या क्लासमध्ये देखील तरुणीसोबत चुकीच्या पद्धतीने इशारे करीत असल्याने शिक्षकाविरोधात…

Read More