Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केले आणि होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या धरणगाव तालुक्यातील नारणे येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नारणे येथील मूळ रहिवासी शरद सखाराम भिल (२४) हा चहार्डी, ता. चोपडा येथे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झालेले होते. मात्र पत्नी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेलेली होती. म्हणून त्याने चहार्डी येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीचा २०१९ ते २०२० दरम्यान रोज पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालायचा आणि तिला लग्नाचे आमिष दाखवायचा. तिच्याशी जंगलात, पाटचारीजवळ बळजबरीने शारीरिक संबंध करत असे. मुलगी विरोध करीत असताना तिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील नवीन बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेऊन काजल कमलेश पवार (रा. कोळसेवाडी कल्याण ईस्ट, ता. ठाणे) या प्रवासी महिलेची २६ हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली लहान पर्स रावेर-पुणे बसमधून उतरत असताना चोरट्याने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी काजल पवार या भुसावळ येथून रावेर-पुणे बसमधून जळगावला येण्यासाठी निघाल्या. १२.३० वाजता त्या नवीन बसस्थानक येथे उतरल्या. त्यानंतर रिक्षात बसत असताना त्यांना त्यांची मोठ्या पर्सची चेन उघडलेली दिसली. त्यातील दागिने ठेवलेली लहान पर्स दिसून आली नाही. पवार यांनी लागलीच बसमध्ये जाऊन पर्सचा शोध घेतला. पण,…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील मारवड रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका दुचाकीधारकावर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वाघरे येथील रहिवासी बापू वेलचंद पाटील हा तरुण दुचाकी एमएच १८ बीबी ८८०६ मारवाड रस्त्यावरून धार येथे जात होता. त्यावेळी समोरून येणारी दुचाकी एमएच १९ सीडी ४१२१ वरील चालक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड ता. अमळनेर यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत बापू वेलचंद पाटील हा गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघात घडल्यानंतर दरपण मुरलीधर पाटील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे गट व शिवसेनेच्या शिंदे गटाचा वाद आता वाढला असून यात शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. कारण देखील तसेच काही आहे. शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी प्रमुखांकडे सोपवा अशी मागणी करणारी याचिका अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात ही याचिका करण्यात आलीय. पक्षाचा निधी आणि स्थावर मालमत्ता सध्याच्या प्रमुखांकडे देण्याची मागणी करण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल योग्य असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. शिवसेना भवन, पक्षाचा निधी आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात असं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचा निकाल योग्य केंद्रीय निवडणूक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील शाहू नगरात शुल्लक कारणाने दोन भावांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरातील हनुमान मंदीराजवळ मयुर रानवडे हे आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहे. याच परिसरात समीर बिहारी आणि सुमेर तडवी यांना सोईस्कर जाण्या येण्यासाठी दुसरा रस्ता असतांना दोघे मयूरच्या घरासमोरून जातात. त्यामुळे त्यांच्या घरात असलेली मुलगी घबरते. दरम्यान, ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घराकडून का जातात असा जाब मयूर व त्याचा भाऊ कल्पेश यांनी विचारला. याचा राग आल्याने समीर बिहारी आणि सुमेर तडवी या दोघांनी प्लास्टीकचा पाईपाने दोन्ही भावांना…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  येत्या 8 जूनपासून महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार असून, 22 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत वर्तविला आहे. पंजाब डख म्हणाले, 9 आणि 10 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. रविवारपासून संगमनेरकडे पाऊस पडणार नसून, तो पाऊस संगमनेरकडून नगर जिल्ह्याकडे पडणार आहे. त्याचबरोबर 10 तारखेपर्यंत राज्यात असेच वातावरण असणार आहे. त्यानंतर 11, 12, 13 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा थोडय़ाफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 13, 14, 15 तारखेला पुन्हा हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर 16, 17, 18 एप्रिलला राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण होणार आहे. त्याचबरोबर…

Read More

अकोला : वृत्तसंस्था  जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले. पारस येथील महात्मा फुले विद्यालयाजवळ समर्थ बाबुजी महाराज संस्थानात रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी आरती झाल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही जण सुरक्षेसाठी या परिसरातील शेडखाली थांबले. मात्र या शेडवर कडुनिंबाचे मोठे झाड कोसळल्याने त्यात उभे असलेले सुमारे 50 च्या वर भाविक-ग्रामस्थ अडकले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका फळविक्रेत्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. तसेच गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळ असलेल्या फळविक्रीचे पैसे हिसकावून नेणाऱ्या एकावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये फळविक्रीचे दुकान ज्ञानेश्वर रतन साटोटे यांचे आहे. दि ७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनोज ऊर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे (राजारामनगर) हा रिक्षा घेऊन दुकानात आला व शिवीगाळ करू लागला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व कमरेला असलेला चाकू काढून गळ्याला लावत जिवे मारण्याची धमकी दिली. फळविक्रीचे जमा झालेले दीड हजार रुपये शर्टच्या वरच्या खिशातून काढून…

Read More

जळगाव ; प्रतिनिधी  शहरातील मेहरुण तलाव ट्रॅक परिसरामध्ये बाईकवर स्टंटबाजी करणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. या अल्पवयीन स्टंटबाज विद्यार्थ्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि ९ रोजी रविवारी सकाळी स्टंटबाजीचा प्रकार खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, समाधान टहाकळे, राकेश बच्छाव यांनी पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणेश शिरसाळे हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पाण्याच्या मोटारीची वायर काढल्याच्या शुल्लक कारणावरून शेजारच्यांनी बाप व मुलाला  मारहाण केल्याची घटना दि. ८ शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास समतानगर येथे घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील समतानगर येथे शंकर शालिक सोनवणे (३०) हे आई-वडील, पत्नी व बहिणीसह वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्यामुळे सोनवणे कुटुंबीय पाणी भरत होते. त्यावेळी शंकर यांनी एकत्रित असलेल्या पाण्याच्या मोटारीची वायर काढल्यामुळे मोटार बंद झाली. याचा राग येऊन शेजारच्यांनी सोनवणे कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शंकर यांना काठीने मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेले त्यांचे वडील…

Read More