Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  देशात होत असलेल्या महागाईवर आता कुणीही त्यावर तोडगा काढण्यास तयार नाही पण राज्यात होणारे लग्नसराई मात्र त्याच महागाईमध्ये मोठ्या धमाक्यात साजरा होत आहे. त्या महागाईत भर म्हणून सोन्याच्या भावाने ग्राहकांना झटकाच दिला आहे. दिपावली पर्यंत सोनं ६५ हजारापर्यंतो पोहचू शकत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दरात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोने ६५,००० रुपये आणि चांदी ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या चांदी ७६, ००० रुपयांवर पोहोचली आहे. सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेना याबाबत एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलंय. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन म्हणाले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांना अटक होणार होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, जवळपास आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  फेब्रुवारीअखेरपासून कोरोना झपाटय़ाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येचा अक्षरशः गुणाकार सुरू आहे. संपूर्ण जानेवारीत 128, फेब्रुवारीत 122 रुग्ण आढळले असताना मार्चमध्ये तेरा पट वाढ होऊन तब्बल 1719 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांत 1941 रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ कायम राहणार असून मे महिन्यात सध्याच्या रुग्णसंख्येच्या दहा पट रुग्णवाढ होणार असल्याचा धोका पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने खासगी रुग्णालयांसह आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि तत्कालीन राज्य सरकारच्या नियोजनामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले. यानंतर जानेवारी 2023 मध्ये दैनंदिन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आज मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यातही विशेषत: मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) दक्षिण कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर. वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड. मध्य महाराष्ट्र : जळगाव, सांगली, सोलापूर, मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर. विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि…

Read More

भुसावळ :  प्रतिनिधी  साकेगाव महामार्गावर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या आयुष प्रोकॉन कंपनीचे लाखोंचे साहित्य असलेल्या कार्यालयास भीषण आग लागली. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात, लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आयुष प्रोकॉन कंपनीच्या कंपाऊंडच्या बाहेर कुणीतरी शेत शिवारामध्ये आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग काही क्षणातच आयुष प्रोकॉनच्या परिसरात पसरली व पत्र्याच्या शेडजवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयामध्ये दहा-पंधरा दिवसांपूर्वीच बेल्टचे साहित्य उतरविण्यात आले होते. यांची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. नेमके याच बेल्टच्या कार्यालयाला आग लागली. दुपारी तीन वाजेला लागलेली आग तीन ते साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. आग लागल्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहराच्या तापमानाने यंदा पहिल्यांदा चाळिशी पार केली असून, बुधवारी जळगाव शहराचे तापमान राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होते. ४१.६ अंश अशी तापमानाची नोंद झाली. बुधवारी राज्यात चंद्रपूर शहरात सर्वाधिक ४१.८ अंश तापमान होते. धुळ्याच्याही तापमानाने बुधवारी ४० चा टप्पा ओलांडला आहे. जळगाव शहराच्या किमान तापमानातदेखील वाढ झाली असून, मंगळवारी रात्रीचे तापमान २५ अंशांवर होते. तर बुधवारी रात्रीचे तापमान २७ अंशांवर पोहोचले होते. राज्यातील रात्रीच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद जळगाव शहरात झाली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात अजून एक चोरीची भर पडली आहे. शहरातील शिवाजी नगर परिसरात चोरट्यांनी एका घरात डल्ला मारला आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर परिसरातील असलेले मारुती मंदिराच्या बाजूला वास्तव्यास असलेले प्रेमलता तिवारी (वय ४०) आहे. दि ११ रोजी घर बंद असून दरवाज्याची दोरी तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल २० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यात १५ हजारांची रोख रक्कम तर २ मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.विजय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील शिंदे व भाजप सरकार शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देत असताना जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याना मात्र वाऱ्यावर सोडले कि, काय असा प्रश्न निर्माण होत आहे, शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिग बाजूला एक वेअर हाऊसचा खुलेआम भाड्याने दिल्याने आज देखील जिल्ह्यातील शेतकरीना माल साठवणूक करण्यासाठी जागा नाही. यावर सहकार विभाग कारवाई करेल का ? शहरातून आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिगच्या बाजूला असलेले लक्ष्मी कृषी उत्त्पन्न खाजगी बाजार आव्हाणे शेतकऱ्याच्या मालासाठी गोडावून याठिकाणी असलेली भली मोठी जागा हि शहरात होणाऱ्या पिंप्राळा उड्डाणपुलाच्या गुजरात येथील कंपनीला भाड्याने दिल्याने तालुक्यातील शेतकरीना मात्र भर उन्हाळ्यात माल ठेवण्यासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील खान्देशातील आठ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या महसुल विभागाने बुधवारी पहाटे काढलेल्या आदेशानुसार करण्यात आल्या आहेत. त्यात तीनही जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसह जळगाव व धुळ्यातील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून महसुल विभागातील बदल्या रखडल्या होत्या. बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी त्यात नाशिक विभागातील १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांच्या आदेश जारी झाल्यानंतर अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात पुन्हा बदल्यांचे आदेश जारी होणार असल्याचे सांगण्यात आले. खान्देशातील या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या किरण सावंत-पाटील- भूसंपादन, जळगाव- श्रीरामपूर प्रांताधिकारी राहुल पाटील- आरडीसी, जळगाव- निवडणूक विभाग, नगर सीमा अहिरे-…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अनेक तरुणांना आपल्या मैत्रिणीसमोर दुचाकीवर स्टंबाजी करण्याचा मोठा शौक असतो पण हाच शौक त्यांच्यावर कधी उलटतो हे त्यांना देखील समजत नाही अशीच एका घटना मुंबईतील एका तरुणाचा स्टंबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक तरुण दोन तरुणींसोबत खतरनाक स्टंट करताना दिसत होता. या स्टंटबाजावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यानंतर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहे. मात्र, त्याची चांगलीच फजिती झाली आहे. कारण स्टंटबाजी करताना हा तरुण त्याच्या मैत्रीणीला घेवून आपटला आहे. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘dbr.offroad’ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात…

Read More