जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका रस्त्यावरील शेतात दोन तरुणांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले होते. तर जखमी तरुणांना रूग्णालयात दाखल केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतात दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडत गोळीबार केल्याने भुसावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांच्या गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (24, भुसावळ) हे दोघे तरुण जखमी झाले असून त्यांना डोक्याला व…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी सातबारा उतार्यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून सुट्टीच्या दिवशी ती तलाठी कार्यालयात स्वीकारताना लाचखोर तलाठ्यासह कोतवालाला जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता रंगेहाथ अटक करताच महसूल विभागात लाचखोर हादरले आहेत. ही कारवाई भडगाव तालुक्यातील बु.॥ तलाठी कार्यालयात करण्यात आली. तलाठी सलीम तडवी व कोतवाल कविता सोनवणे अशी लाचखोरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भोरटेकच्या तक्रारदाराची वडिलोपार्जित जमीन असून सातबारा उतार्यावर वारसांची नाव लावण्यासाठी आरोपी तलाठ्याने प्रकरण स्वीकारताना एक हजार रुपये लाच घेतली मात्र त्यावर त्यांची भूक भागली नाही व त्यांनी पुन्हा पंधराशे रुपयांची लाच कोतवालासोबत मागितली. तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी महामानव…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आतापर्यत लग्न का नाही करत याबाबत त्याने अनेक ठिकाणी वेगवेगळे कारण दिले आहे. पण आता तो वेगळ्याच चर्चेत सापडला आहे. सलमान खान हा त्याच्यापेक्षा २५ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले गेल्याने हि चर्चा देशभर सुरु झाली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव पूजा हेगडेचं असल्याचेही समजते. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर पूजा हेगडेनं प्रतिक्रिया दिली आहे. सलमान आणि पूजा जेव्हापासून ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एकत्र काम करत…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचे सत्र सुरु आहे. यात आणखी एका आमदाराला धमकीचे निनावी पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत आहे ते पुन्हा आता एका नव्या चर्चेत आले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. राज्यातील काही नेत्यांना थेट मोबाइलवर फोन, संदेशाद्वारे धमकी मिळाली. तर बोरनारे यांच्या नावाने नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्रातून त्यांना जीवानिशी मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर शिवसेनेत यामुळे खळबळ माजली आहे. आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात तरुणाईच्या मनावर राज्य करणारी गौतमी पाटीलची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. ती म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील तिचा कार्यक्रम म्हणलं की राडा तर होणारच. गावागावात तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. कधीकधी गर्दी आवाक्याच्या बाहेर जाते आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. मात्र जुन्नर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. गौतमीचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा म्हणून गावातील महिलाच हातात काठ्या घेऊन समोरच्या रांगेत बसल्या. जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेदरम्यान गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, गोंधळ तर होणारच. पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेजच्या…
भुसावळ : प्रतिनिधी यंदा उन्हाळ्यातही ढगाळ वातावरण कायम असल्याने तापमान ३८ अंशांच्या वर गेले नव्हते, मात्र गुरुवारी भुसावळला ४२.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ही शासकीय नोंद असली तरी एका खासगी संस्थेने भुसावळला ४४ अंश तापमानाची नोंद केली आहे. उन्हाळा सुरू होऊन दोन ते अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. फेब्रुवारी व मार्च या महिन्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ४० अंशाच्या आतच होते. त्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांना बसत नव्हत्या. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये भुसावळ शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. १३ रोजी भुसावळ शहराचे तापमान कमाल ४२.९ किमान ३२.१ तापमानाची नोंद केली आहे. तर वेलनेस वेदर या खासगी संस्थेने…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील तालुक्यातील खेडीढोक येथील माहेर असलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेचा दोन लाखांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विवाहितेचे गुजरात येथील उधना हे सासर आहे. मिळालेली माहिती अशी की, डिसेंबर २०१८मध्ये मदनपुरा लिंबायत, उधना (गुजरात) येथे विकी राजेंद्र राजपूत याच्याशी विवाह झाला. घरात पती, सासू शोभा राजेंद्र राजपूत, दीर महेंद्र राजेंद्र राजपूत, दिरानी प्रियंका महेंद्र राजपूत असे एकत्र राहत होते. पती विकी हा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे, म्हणून वेळोवेळी मानसिक, शारीरिक छळ करून शिवीगाळ व मारहाण केली. वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने पैसे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दररोज अनैतिक संबंधातून पळून गेलेल्या लोकांच्या अजब-अजब घटना समोर येत असतात. पण सध्या राजस्थानमधील अशाच एका घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. या घटनेबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. सीकर शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिला आपल्या तीन मुलींना घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. साधारण 4 दिवस शोधाशोध घेतल्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही तर महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे महिला ज्या प्रियकरासोबत पळून गेली तो 5 मुलांचा पिता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीकर शहरात राहणारी 38 वर्षीय एक विवाहित महिलेला शेजारी राहणारा मुकेश नायक नावाची व्यक्ती पळवून घेऊन गेला. विवाहितेसोबत तिच्या तीन मुली ज्यांचं वय 17,…
जळगाव : प्रतिनिधी शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर आता पोलीस प्रशासनाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावत आहेत. शहरातील श्याम नगरमधून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आल्याची घटना १२ रोजी उघडकीस आली असून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शहरातील श्यामनगर ते हरीविठ्ठल नगरात अवैधरित्या वाळूची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे होत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्याम नगर परिसरात कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले. ट्रॅक्टर चालक समाधान खंडू सोनवणे रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव याच्याकडे वाळू…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिग बाजूला एक वेअर हाऊसचा खुलेआम भाड्याने दिल्याची चर्चा दोन दिवसापासून जिल्ह्यात सुरु होती. त्यावर आज थेट संबधित अधिकारी यांनी पाहणी करीत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. शहरातून आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिगच्या बाजूला असलेले लक्ष्मी कृषी उत्त्पन्न खाजगी बाजार आव्हाणे शेतकऱ्याच्या मालासाठी गोडावून याठिकाणी असलेली भली मोठी जागा हि शहरात होणाऱ्या पिंप्राळा उड्डाणपुलाच्या गुजरात येथील कंपनीला भाड्याने दिल्याने तालुक्यातील शेतकरीना मात्र भर उन्हाळ्यात माल ठेवण्यासाठी जागा मिळत नाही, मात्र या वेअर हाऊसचे जे मालक आहे. त्यांनी कशी काय हि जागा भाड्याने देत…

