भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शिरपुर कन्हाळा रोडवरील वल्डस्कुलचे बाजुला रोडवर सार्व जागी काही इसम बनावट सोने असल्याचे माहिती असून सुद्धा संबंधित इसमास खरे असल्याचे भासवून फसवणूक करतांना मिळून आले म्हणून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेली माहिती अशी कि, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे तत्काळ पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले.पथक दिनांक २९ एप्रिल रोजी 05.15 वाजता शिरपुर कन्हाळा रोडवरील वल्डस्कुलचे बाजुला रोडवर सार्व जागी सापळा रचून होते.काही वेळेनंतर संबंधित आरोपी नामे किसनलाल दौलतराम बागरी वय 36 रा.बल्लुर ता.जि.सिरोही राजस्थान,बाबुलाल ओबाराम बागरी वय 42 रा.लक्ष्मी नगर बिबलसर ता.जि. जालोद राजस्थान हे स्वताचे फायदयासाठी त्यांचे जवळील…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस सुरुवातीपासून तर शेवटपर्यत बघायला मिळाली अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार पॅनलचा धरणगावात डंका वाजला आहे. धरणगाव बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर ठाकरे गटाचे नेते सुरेशनाना चौधरी, तसेच ठाकरे गटाची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट या पद्धतीने बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली होती. धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर…
जळगाव : प्रतिनिधी सहा बाजार समित्यांसाठी रविवारी आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. जळगाव कृउबा समितीसाठी शहरातील थोर सन्मित्र कार्यालय येथे मतमोजणीस प्रारंभ झालेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दहा जागा मिळवून भाजपा शिंदे गट युतिचा दणदणीत पराभव केला आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. यात दहा फेऱ्या होऊन युतीचे मिलींद दत्तात्रय चौधरी 268 मते व अपक्ष पल्लवी देशमुख 364 मते मिळवून विजयी झाले. सर्व साधारण गटातून लक्ष्मण गंगाराम पाटील, सुरेश पाटील, मनोज चौधरी, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, योगराज सपकाळे, प्रभाकर सोनवणे, शामकांत सोनवणे हे विजयी झाले असून आतापर्यत…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील महायुतीचे ‘सहकार’ पॅनलचे ३ उमेदवार तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाल्याचे कळते. सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. धरणगाव बाजार समितीची निवडणुक मोठ्या चुरशीची झाली होती. आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिला निकाल हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाजूने लागला. हमाल-मापाडी मतदारसंघातील ‘सहकार’ पॅनलचे ज्ञानेश्वर वसंत माळी हे विजयी झाले आहेत. सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस असून अवघ्या काही मतांनी दोन्हीकडचे उमेदवार मागेपुढे आहेत.…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव – एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून सुरु झाल्या आहे. तर पहिलाच निकाल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात हमाल मापाडी मतदार संघातून उमेदवार विजयी झाला आहे. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (संजय पवार गट) चे सहकार पॅनलच्या पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय पवार, पी. सी. आबा पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल तर महाविकास आघाडीतील सुरेशनाना चौधरी, गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ यांच्या वतीने शेतकरी पॅनल हि निवडणूक लढवीत आहे. त्यात सहकार पॅनलचे उमेदवार ज्ञानेश्वर वसंत माळी यांनी बाजी मारली असून त्यांनी शेतकरी पॅनलचे पितांबर महारु पाटील यांना पराभूत केले…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेरात हॉटेलमध्ये जेवण करून बिल देण्याच्या वादातून दोन मित्रांवर एकाने चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना काल रात्री घडली. यातील संशयिताच्या पोलिसांनी नाशिक येथून मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पैलाड परिसरातील ऋषिकेश श्याम सोनार (वय २२) व तेजस रवींद्र पाटील (22, रा. मिल कंपाऊंड) हे नाशिक जवळील एका देवीचे दर्शन घेऊन अमळनेरात परतले होते. त्यानंतर ते मित्रांसोबत एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले. तेथे बिल भरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला, यात ऋषिकेश सोनार गांभीर जखमी आहे. धुळे सिव्हिल ला बेशुद्ध अवस्थेत आहे. तर तेजस पाटील ही जखमी आहे. यात मुख्य दादू पाटील…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील घरामध्ये काही व्यक्तींसोबत आई दिसल्यानंतर संतापलेल्या मुलाने आईला लोखंडी सळईने हातासह कमरेवर आणि पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार, दि. २४ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता तालुक्यातील एका गावामध्ये घडली होती. दरम्यान, जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना अखेर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात मयत महिला ही दोन मुलांसह वास्तव्यास होती सोमवारी रात्री १० वाजता महिलेची दोन्ही मुलं गावातील एका लग्नात नाचत होती. त्यावेळी त्यांना त्यांची आई एका घराकडे जाताना दिसून आली. ही बाब त्यांनी लागलीच शेजारीच…
जळगाव : प्रतिनिधी साडी-चोळी नेसून साजशृंगार करत तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून नागरिकांच्या घरात शिरून जबरीने पैशांची मागणी करणाऱ्या तोतया तृतीयपंथीयांची खऱ्या तृतीयपंथीयांनी विवस्त्र करून धुलाई केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सागर पार्क परिसरामध्ये घडली. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी या परिसरामध्ये गोळा झाला होती. धुलाई केल्यानंतर तोतयाला सोडून देण्यात आले. शहरातील सागर पार्क परिसरामध्ये तीन तोतया तृतीयपंथीयांच्या वेशभूषेत नागरिकांच्या घरात शिरून पैशाची मागणी करीत होते. त्यांचा सातत्याने त्रास होत असल्याने तेथील नागरिकांनी खऱ्या तृतीयपंथीयांना याची माहिती दिली. काही वेळात खऱ्या तृतीयपंथीयांनी सागर पार्क परिसर गाठले. त्यांनी तिघा तोतयांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोन जण पसार झाले, तर एक त्यांच्या हाती…
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील बसस्थानकासमोर उभे असलेल्या ईश्वर भिका पाटील (५५) या प्रौढास जळगावकडून, पाचोराकडे भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने रात्री ८:३० च्या सुमारास धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. येथील अशोका कंपनीच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. येथील महामार्ग क्रमांक ७५३ चे काम झाल्यापासून रस्त्यावर भरधाव वेगाने वाहतूक सुरू असल्याने नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. अनेकवेळा गतिरोधकाची मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने ज्ञानदेव मोतीराम पाटील (६०, रा. आसोदा) या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील बोरनार येथे वादळी पावसात पत्रे उडाल्याने मार बसल्याने प्रभाकर जामा चौधरी (वय ७०) या वृद्धाचा मृत्यू झाला. सुरक्षारक्षक ज्ञानदेव पाटील हे शिवाजीनगर परिसरातील मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर सुरक्षारक्षक होते. शनिवारी पाटील हे महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळून जात असताना जिनिंगची भिंत कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वादळी पावसाचा तडाखा बोरणार येथेही बसला. प्रभाकर चौधरी यांचे पत्रे या वादळी पावसामुळे उडाले. त्यामुळे त्यांना छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात…

