नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पण, दिलासा देणारी बाब म्हणजे इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे देशासह राज्यातील जनतेला मोठा झटका याचा बसला आहे. 21 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने वाहन इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) उत्पादन शुल्क कमी केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. यामध्ये बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी स्वस्त होऊन 108.90 रुपये आणि डिझेल 23 पैशांनी स्वस्त होऊन 95.57 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था RRR फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिने या वर्षी मेट गालामध्ये पदार्पण केले.मेट गाला हा जागतिक फॅशन इव्हेंट आहे. या वर्षी आलीया प्रथमच मेट गाला इव्हेंट मध्ये सहभागी झाली होती. आलिया मेट गाला इव्हेंट मध्ये अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसत होती. आलियाने या इव्हेंटसाठी एका आकर्षक पांढऱ्या गाऊनची निवड केली होती. इव्हेंटसाठी, आलियाने मोत्यांनी सजवलेला स्लीव्हलेस पांढरा गाऊन निवडला. तिने अंगठ्या आणि कानातल्यांसह अनेक दागिने सुद्धा परिधान केले होते. फोटोंमध्ये, आलियाने पापाराझींसाठी पोज देताना वेगवेगळे एक्सप्रेशन्स दिलेले दिसत आहेत. आलियाची बहीण शाहीन भट्टने या कार्यक्रमातील आलियाचे फोटो शेयर करत पोस्टला कॅप्शन दिले, “एंजल.” या फोटोंवर प्रतिक्रिया देताना,…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव व भडगाव शहरातून दोन अल्पवयीन मुलीना अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि ३० एप्रिल रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीच्या राहत्या घरातून पळवून नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.किशोर सोनवणे हे करीत आहे. दुसऱ्या घटनेत भडगाव शहरातील एका शाळेच्या परिसरात रहिवासी असलेल्या १७ वर्ष १० महिने अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने दि १ मे रोजी सकाळी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एकलग्न गावातून घराला कुलूप असतांना ते तोडून अनोळखी चोरट्यांनी घरातून हजारो रुपयाचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकलग्न येथील विजय योगराज पाटील(वय३४) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. दि १ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कामानिमित बाहेर गेले असता त्यांनी घरच्या दरवाजाला कुलूप लावून गेले होते. यावेळेत घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत देवघरामध्ये असलेले कपाटाचे कुलूप तोडून घरातून ४८ हजारांचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था आयुष्याची दोरी बळकट असल्याने वाचलेल्या ८ वर्षीय शिवमने पोलिसांना सांगितलेल्या आपबीतीने ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. ‘पप्पाने आधी श्रेयसला विहिरीत फेकल्यानंतर मी रडू लागलाे. त्यांनी मलाही विहिरीत फेकले, विहिरीत पडताच अंधारात हाताला लागलेला दोर मी धरला, दुसऱ्या हाताने श्रेयसचा हात पकडला. मात्र, तो हातातून निसटून पाण्यात बुडाला.’ हि घटना छत्रपती संभाजी नगरात घडली आहे. बाप पोटच्या गोळ्याच्या जिवावर उठलेला परंतु हा लहानगा जीव धाकट्या भावाला वाचविण्यासाठी धडपडत होता. चिकलठाण्यातील राजू प्रकाश भोसले या मद्यपीने पत्नी नांदायला येत नसल्याने शिवम (८) आणि श्रेयस (४) या त्याच्या दोन्ही मुलांना शुक्रवारी रात्री विहिरीत फेकले होते. यात श्रेयसचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्जाची परतफेड न केल्यानं एका ४० वर्षीय व्यक्तीनं जिल्ह्यातील मैरवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका ११ वर्षीय तरुणीशी लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. महेंद्र पांडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. तो मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी आहे.बिहारच्या सिवान जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील छेनी छपर गावात या घटनेची चर्चा सुरू आहे. लक्ष्मीपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा ४० वर्षीय महेंद्र पांडे यानं मुलीच्या आईला २ लाख रुपयांचं कर्ज दिलं होतं. महेंद्र हा मुलीच्या आईकडे पैसे परत मागत होता. मुलीचे आई-वडील गरीब असल्यानं त्यांना काही कारणास्तव कर्जाची परतफेड करता आली नाही.…
जळगाव तालुक्यातील एका गावातील दोन भाऊ गावापासून काही अंतरावर रानात सरपण गोळा करण्यासाठी गेले असल्याने एका २५ वर्षीय तरुणावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात घडली. यावेळी जखमीच्या भावाने त्याठिकाणी धाव घेत जखमी भावाला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात मदन सुखदेव अहिरे (वय- २५) हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावात मदन अहिरे हा तरुण वास्तव्यास आहे. त्याचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८) हा त्याला गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात सकाळी 11 वाजता सरपण गोळा करायला घेवून गेला…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली होती पण सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. तर गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ४८९ नवे रुग्ण आढळून आले असून या प्राणघातक विषाणूमुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. यासह, राज्यातील कोविड-19 (COVID-19) बाधित लोकांची संख्या आतापर्यंत 81,65,466 वर पोहोचली असून मृतांची संख्या 1,48,514 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे. रविवारी राज्यात 1126 जणांनी या साथीवर मात केली. यानंतर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 80,12,873 झाली आहे. राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रामानंद नगर पोलिस स्थानकाच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हे नगर परिसरातील शिव कॉलनीच्या शंभर फुटी रत्यावरील प्रतिक पार्क अपार्टमेंट नजीक संशयित आरोपी खुशाल विनोद पांडे, नागेश प्रल्हाद सोनार, मयुर उर्फ विक्की दिपक आलोणे, दुर्गेश सन्यासी आणि वसीम हुसेन पटेल हे पाच जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असतांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 143/23 भा.द.वि 392, आर्म अॅक्ट 3,4,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जामनेर रोडवरील वांजोळा परिसरातील रस्त्याच्या लागून तिसरे शेतात कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने तो विहिरीच्या कपरात बसून आहे. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या निमगाव शिवारात घडली. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माजी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सकाळी माहिती कळवल्यानंतर सुमारे २२ कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कुर्हा भागात यापूर्वीही बिबट्याचा संचार आढळला असून मध्यरात्री शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या निमगाव शिवारातील एका कोरड्या विहिरीत कोसळल्याचा अंदाज आहे मात्र विहिर खोल असल्याने त्यास…

