जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बस स्थानक परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेच्या ६९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन बस स्थानक परिसरातील एस.टी.वर्क शॉपच्या गेटजवळ दि २ मे रोजी दुपारच्या सुमारास किनगाव येथील सुनिता मधुकर ठाकूर (वय ३५) यांच्या जवळील सोन्याची मंगलपोत व लक्ष्मीहार असा एकूण ६९ हजाराचे दागिने अनोळखी चोरट्याने चोरून नेले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.महेद्र पाटील हे करीत आहेत.
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत अस्वस्थता आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल असतील अशी जास्त शक्यता व्यक्त होत आहे. तशी चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. शरद पवार अध्यक्ष पद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार दिल्लीत सर्वपक्षीय संबंध प्रफुल्ल पटेल यांचे आहेत. तसेच कार्यकर्त्यांची नाराजी कमी करायची असेल तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा विचार करावा असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष सुप्रिया की पटेल याची उत्सुकता आहे.…
चोपडा : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाएकी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यच नव्हे तर देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी शहरा-शहरांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. अशात एका कार्यकर्त्याने तर आपल्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहित आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी शरद पवार यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात उर्वेश साळुंखे यांनी म्हटले आहे की, आदरणीय पवार साहेब आपण आज जो निर्णय घेतला तो…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील ४० वर्षीय विवाहितेच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देत एकाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका विरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरात ४० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. गेल्या एक वर्षापासून भुसावळातील एक इसम या महिलेला तिच्या मुलाला नोकरी लावून देण्यासाठी २ लाख ५० हजार रोकड तर १५ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने घेवून महिलेच्या जवळीक साधत तिच्या मर्जीविरोधात अत्याचार केला आहे व हि घटना जर कुणाला सांगितल्यास तुझ्या मुलाला नोकरी लावून देणार नाही अशी देखील धमकी दिल्या प्रकरणी भुसावळातील एका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असताना देखील तलवार घेऊन शहरातील समतानगरमध्ये दहशत माजविणाऱ्या राहुल काकडे (रा. समतानगर) याला रामानंदनगर पोलिसांनी रविवारी सायंकाळी ७:५० वाजता बेड्या ठोकल्या असून त्यांच्याजवळून तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जळगाव जिल्ह्यातून उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये दोन वर्षासाठी हद्दपार असलेला राहुल काकडे हा रविवारी सायंकाळी समतानगरमध्ये तलवार घेऊन दहशत माजवित होता. ही माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळताच, त्यांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळून तलवार जप्त करून पोलिसात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाल देशमुख, संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय…
पाचोरा : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील वाडे-गुढे येथील २३ वर्षीय तरून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे-गुढे गावातील रहिवासी गोविंद समाधान मोरे (वय २३) असे मयत युवकाचे नाव आहे. गोविंद हा युवक २७ एप्रिल गुरुवार रोजी तालुक्यातील खडकदेवळा येथील मावशीकडे आला असता रविवार. 30 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोविंद हा धरणात पोहण्यासाठी गेला होता मात्र गोविंद यास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावात कळाल्यानंतर परीसरातील पट्टीच्या पोहणार्यांनी गोविंदचा शोध…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समितीही गठीत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच या समितीमध्ये कोण सदस्य असतील याची संभाव्य नावंही त्यांनी आपल्या भाषणातच जाहीर केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी टाहो फोडला आहे. निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाजेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राज्यभर राजीनामा मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी.…
नाशिक : वृत्तसंस्था चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले होते. ट्रक मागून येणाऱ्या चारचाकीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चित्रीकरण केले होते. व्हायरल झालेला हा व्हिडीओ इगतपुरी जवळचा असल्याचे स्पष्ट झाले असून संबंधितांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून समाज माध्यमावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्यात येत असल्याचा निर्दयी प्रकार समोर येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ आधी उत्तर प्रदेशमधील असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांनी हा व्हिडीओ महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यातील असल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील खंबाळे फाटा परिसरातील हा व्हिडीओ…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीची काल वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी १५० हून जास्त बैठका झाल्याचे सांगितले होते. त्याचा दाखला अजित पवार यांनी कालच्या भाषणात दिला. मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा हिंदकेसरी महाराष्ट्राला मिळाला, असा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांचे षडयंत्र सुरू होते, हे त्यांनीच सांगून टाकले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी एवढ्या बैठका घेतल्या? असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता.…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यानंतर यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवेसना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देताना राऊतांनी शरद पवारांची काय मानसिकता असेल हे सांगण्याचा प्रयत्न केला. https://twitter.com/rautsanjay61/status/1653305842391822338?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653305842391822338%7Ctwgr%5E060bada8660c399ebaf2db987458687548d3130a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fsanjay-raut-commented-on-sharad-pawar-retirement-gives-example-of-balasaheb-thackeray-aau85 संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलं की, “एक वेळ अशी आली…घाणेरडे आरोप…प्रत्यारोप…राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केलं आहे. जनतेच्या रेट्यामुळं बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत”

