Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात चॉपरच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍याला पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश शंकर चौधरी (रा.सम्राट कॉलनी जळगाव) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील एचडी फायर कंपनीजवळ शैलेस चौधरी हा चॉपरसह आल्याची माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सैय्यद, योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील, छगन तायडे आदींनी संशयिताच्या मुसक्या बांधत अटक केली. संशयिताविरोधात यापूर्वी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल आहे.

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असतांना दिसत आहे. बलात्कार, खून, अनैतिक संबंधातून फसवणूक, आत्महत्या यासांरख्या घटना सातत्याने राज्यामध्ये घडत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटीत) नर्स युवतीला एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तसेच तिला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. मात्र, या तरुणाने संबंधित प्रेयसीला सोडून देत दुसरीसोबतच विवाह केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले. प्रियकराकडून फसवणूक सहन न झाल्याने या तरुणीने राहत्या घरातील टॉयलेटमध्ये विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना 1…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  लग्नासाठी तरूणीच्या घरी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाच्या प्रेम प्रकरणाचा अचानक खुलासा झाला. त्यानंतर लग्नात वाद पेटला होता. अशात नवरदेवाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे नवरदेवाची प्रेयसी दुसरी कुणी नसून त्याची होणारी मेहुणीच निघाली. दोन्ही परिवाराच्या सहमती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. बिहारच्या सारण जिल्ह्यात एका लग्नात चांगलाच गोंधळ झाला. ही घटना भभौली गावातील आहे. गावात राहणाऱ्या रामू बीनची मुलगी रिंकू कुमारीचं लग्न छपरा शहरातील राजेश कुमार याच्यासोबत जुळलं होतं. 2 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. नवरदेव ठरल्यानुसार वरात घेऊन आला. पण पुढे जे झालं ते सगळ्यांना हैराण करणारं ठरलं. 2…

Read More

२ मे रोजी राज्यातील राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचा गोप्यस्फोट शरद पवार यांनी केल्यानंतर असंख्य कार्यकर्ते आक्रमक होत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर आता पक्षाध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मात्र यावरून भाजपने राष्ट्रवादीला कोंडीत धरले आहे. शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करू नये अशी इच्छा राष्ट्रवादीसह ठाकरे गटाने केली असली तरी, भाजपकडूनही त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर मात्र भाजपने आता राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पवार कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  असोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. रेल्वे कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून अनोळखी तरुण खाली पडला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. ही घटना रेल्वे कर्मचारी सुभाष सपकाळे आणि विकास कुमार यांच्या लक्षात आली. त्यांनी आसोदा गावातील गिरीश प्रदीप चिरमाडे आणि निखिल भानुदास चिरमाडे यांच्या मदतीने खासगी वाहनातून जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात सुसाट प्रवासी खासगी बस झाडाला आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चार प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तर बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी खासगी बस ही प्रवाशांना घेवून जळगावकडून पाचोराकडे निघाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील हॉटेल प्रितजवळून बस जात असताना अचानक दुचाकी समोर आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोराने आदळली. बस झाडाला आदळल्यानंतर खासगी बसच्या चालकाने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या दोन दिवसापासून राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना मोठा धक्का देणारी बातमी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवार माध्यमाशी बोलले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्यानंतर मी माझ्या निर्णयावर विचार करेन असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं ते म्हणाले आहेत. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यांनी 5 मेला बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपल्याला मान्य असेल असंही शरद पवार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातून जवळ असलेल्या शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष्य रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी, इसीजी व एक्स-रे च्या सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याला रुग्णालयातील तसेच बाहेरील रुग्णालयांचा रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्याचा लाभ शेकडो सर्वसामान्य रुग्णांना होत आहे. माजी मंत्री तथा रुग्णालयाचे संस्थापक गुलाबराव देवकर यांनी सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक गैरसोय टळावी, म्हणून आपल्या रुग्णालयात अत्यंत कमी दरात विविध सवलती उपलब्ध करून देण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महागड्या समजल्या जाणाऱ्या सर्वसाधारण सिटीस्कॅनची सेवा केवळ 700 रुपये, तर जॉईंट सिटीस्कॅन 2100 रुपये, पोटाची कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन 2600 रुपये व मणक्यांचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशीच चर्चा सध्या प्रत्येक गावागावात असलेल्या गौतमीचा काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ काढण्याचा खोडसाळपणा केला गेला होता. तो व्हिडिओ काढणारा कोण याचा तपास पोलिस घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं असून तो मुलगा अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशीच चर्चा सध्या गावागावात सुरु असते. अश्लील डान्स केल्याप्रकरणी गौतमीवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर तिने माफी मागितली तरी तिचा डान्स हे काय लावणी नाही असंच मत अनेकांनी व्यक्त केलं. दरम्यान गौतमीची क्रेझ वाढतच चालली होती तोच तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांच्या अंगठ्याचा चावा घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उशिरा वांद्रे पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी कैलास राजाराम भोकसे या ५० वर्षांच्या मद्यपी आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सचिन किसन ढवळे हे सांताक्रुज येथील कोळेकल्याण पोलीस वसाहतीत राहत असून, सध्या वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी त्यांची रात्रपाळी असल्याने ते रात्री आठ वाजता पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी त्यांच्यावर ठाणे अंमलदार म्हणून जबाबदारी होती. रात्री अकरा वाजता पोलीस ठाण्यात दत्ताराम…

Read More