जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथील छबीलदास मार्केटसमोरील गणेश ट्रेडिंग दुकानाचे संचालक मोहन चावराई यांना आधी बंदूक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेली आहे. मात्र चावराई यांनी साखळी पकडून ठेवल्याने चोरट्यांना फक्त अर्धीच साखळी मिळाली. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक गजानन पडघम घटनास्थळी दाखल झाले होते, तर माजी नगरसेवक निक्की बत्रा अजय नगराणी हेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चावराई हे दुकान बंद करत असताना दोन चोरट्यांनी येऊन चाकू व बंदूक दाखवून पैशांची बॅग मागितली. बॅग नसल्याने गळ्यातील सोन्याची…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तुषार शांताराम माळी (३३, रा. नशिराबाद परिसर) या खासगी क्लासच्या शिक्षकास जिल्हा न्यायालयाने गुरुवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये पीडित मुलीला बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण नियम २०१२ मधील कायदा ७ नुसार महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रुपये रक्कम पुनर्वसनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आरोपीला २ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यातील ५० टक्के रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका ३५ वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष देत एका ने फार्म हाऊसवर नेत तिच्यावर अत्यचार केल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्ण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेले मार्च २०२० पासून ते ८ फेब्रुवारी २०२३ पर्यत संशयीत आरोपी अंकुश मारुती महाजन (माळी) याने लग्नाचे आमिष दिले होते. या काळात फिर्यादी महिलेस संशयित आरोपीने ८ फेब्रुवारी रोजी एरंडोल ते जळगाव हायवे क्र.६ च्या बाजूला असलेल्या एका फार्म हाऊसवर फिर्यादीस दुचाकीने नेत महिलेवर शारीरिक संबध केल्याने पिडीत महिलेने एरंडोल पोलिसात धाव घेत संशयित आरोपी अंकुश महाजन(माळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल…
सुट्टीच्या काळात अनेकांना फिरायला जायला आवडते. लोक इन्जॉय करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जातात. पर्यटनस्थळी हॉटेल अथवा एखाद्या भक्तनिवासात मुक्काम करतात. पण आता एखादा बंगला किंवा रूमही भाड्याने घेण्याचा ट्रेंड आहे. हॉटेलच्या तुलनेने हे स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक पर्यटक याचा वापर करतात. परंतु हे किती घातक ठरू शकते याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियात १४ मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या २६ वर्षीय Kennedy CalWell सोबत जे घडले त्याने तिच्यासह तिचे फ्रेंडही घाबरले आहेत. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त आलेल्या लेडीज ग्रुपमधील मुलीला घरात काहीतरी अजब घडत असल्याचा संशय आला. अशावेळी मुलींनी फ्लॅश लाईट ऑन करून घरातील कानाकोपरा शोधण्यास सुरूवात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा निकाल आज हाती आलेला आहे. यात ठाकरे गटाला जरी धक्का असला तरी शिंदे गटातील ‘त्या’ १६ आमदारांवर आजही संकट कायम आहे. गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने आज ११ मे यावरील निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं सरकार बचावलं आहे. राहुल नार्वेकर आता याप्रकरणी काय निकाल देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. २००१ मध्ये अजनबी हा चित्रपट अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि नवोदित बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. पत्नी स्वॅपिंगची संकल्पनाही या चित्रपटात दाखवण्यात आली होती. चित्रपटाला शोभेल अशी घटना इथं घडली आहे. त्यात आता बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. त्यात आता बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. खुद्द पतीनेच स्वत:च्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत संबंध प्रस्थापित करण्यास सांगितल्याची बाब समोर आली आहे.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बस स्थानकावर आलेल्या एका महिलेचे तब्बल लाखो रुपयाचे दागिने अनोळखी इसमाने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिडको शहरातील सत्यम पार्क परिसरातील रहिवासी स्नेहन अजित तायडे (वय ३१) हि महिला दि १० रोजी दुपारच्या सुमारास जळगाव ते यावल येथे जाण्यासाठी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात येत बस मध्ये बसत असतांना अनोळखी इसमाने त्यांच्या ताब्यातील ५० हजार किमतीचे सोन्याची पोत ४० हजार रुपये किमतीची सोन्याची लहान पोत, १० हजार किमतीचे सोन्याचे टोगल, १२ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख १२…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्सुकता वाढली असतांना एक मोठी बातमी समोर आ ली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालयाने नोटीस पाठवली आहे. सोमवारी १५ मे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठवल्याचे समोर येत आहे. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं…
चाळीसगाव : प्रतिनिधी लोखंडवाला कॉम्प्लेक्ससमोर भडगाव रोड येथे हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या टेम्पोवरील स्पीकर बंद करण्याकरिता गेलेल्या दोघा पोलिसांना मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ मे रोजी रात्री उशिरा घडली. चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पो. कॉ. विजय अभिमन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते ९ मे रोजी रात्री गस्त घालत असताना मध्यरात्री १२:१५ वा. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी फोन करून भडगाव रोड चाळीसगाव या परिसरात स्पीकर बंद करण्याचे आदेश दिले. टाकळी प्र. चा. हद्दीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स समोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्याठिकाणी टेम्पोवर (एमएच ०४ / डीके ६६९७) मोठ्या…
पारोळा : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पारोळा शहराबाहेरील बायपासवर इंडिका व्हिस्टाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर तीन जखमी झाल्याची घटना दिनांक ९ रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे कडून एम एच १९ बी यू १७१७ हि इंडिका व्हिस्टा गाडी ही जळगाव कडे जात असताना पारोळा बायपास वर तिला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.त्यात बबलू अनुसे (३५) दुर्गाबाई अनुसे (६४) गोपीबाई कोकरे (६०) हे जखमी झाले तर पुष्पाबाई रमेश काले (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.जखमींना रुग्णवाहिकेने पारोळा कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. येथील बायपास वर तिन दिवसात किरकोळ पाच तर मोठें…

