जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका हद्दीत लोकसंख्या ही १७ टक्क्यांच्या वर वाढलेली आहे. जळगाव महानगरपालिका हद्दीतील वार्डांची संख्या ही ७५ होती. त्यामुळे लोकसंख्या वाढलेली आहे तर जळगाव महानगर पालिका हद्दीत वार्डांची संख्या ही जवळपास ८७ वार्डांची करावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. पृथ्वीराज सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे, की जळगाव महानगरपालिका हद्दीत स्वतंत्र वार्ड एका वर्गात एक नगरसेवक करून वार्डांची रचना करावी म्हणजे प्रत्येक वार्डासाठी एक स्वतंत्र नगरसेवक मिळेल म्हणजे तो त्या वार्डाचे चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करू शकेल. चार नगरसेवकांचा एक प्रभाग ही रचना असल्यामुळे चार नगरसेवक निवडून येतात…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील तांबेपुरा परिसरातील रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (३३) या विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रोजी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथून विवाह सोहळा आटोपून गुरुवारी सायंकाळी रेल्वेनेरुपाली या शहरात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना मळमळ व उलट्या होत असल्याने तांबेपुरा परिसरातील एका खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. उष्माघाताची लक्षणे असल्याने संबंधित डॉक्टरांनी औषधोपचार केले. नंतर त्यांना रात्रभर बरेही वाटले. मात्र सकाळी पुन्हा तोच त्रास सुरू झाल्यावर पतीने गावातील अन्य खासगी डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी तपासणी करून रूपाली यांना मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केले. त्यांचा मृत्यू…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय विवाहितेचा एका १८ वर्षीय तरुणाने विवाहितेला खोलीत नेत घाणेरडे कृत्य केल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शहरातील एका परिसरात २० वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास विवाहिता शौचास जात असताना एका संशयित आरोपीने विवाहितेला जबरदस्ती एका खोलीत नेट जबरदस्ती करीत तिच्या सोबत घाणेरडे कृत्य केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.संदीप दूनगहू हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी पारंपारीक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरीपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बीयाणे मिळावे तसेच खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. शेतकऱ्यांनी 1 जून नंतरच पेरणी करावी खरीप हंगाम तोंडावर असतांना बोगस बियाणांची विक्री करणार्या दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा, पावसाविषयीचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पावसाचे अंदाज शेतक-यांना वेळोवेळी कळत राहिले तर दुबार पेरणीची वेळ किंवा इतरही नुकसान टळेल. त्यादृष्टीने शेतक-यांमध्ये सातत्यपूर्ण जाणीवजागृती करावी तसेच अवकाळी पावसाने वीजपुरवठा यंत्रणेचे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने आवश्यक दुरुस्त्या, विस्तार व इतर…
फैजपूर : प्रतिनिधी शहरातील श्रीराम थिएटर या चित्रपटगृहावर बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सुरू असल्याने अज्ञातांनी दगडफेक केल्याने शहरात काहीवेळ तणाव निर्माण झाले होते. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. शहरातील श्रीराम थिएटरमध्ये दि. ९ पासून ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे प्रदर्शन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी १२ वाजेचा ‘शो’ सुरु झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास थेटरच्या मागील बाजूने अनोळखी ३० ते ४० जणांनी काही एक कारण नसताना थेटरवर व प्रेक्षकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. याठिकाणी मोठा जमाव जमला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विद्या नगर परिसरातील रहिवासी मनोज हरिश्चंद्र पाटील यांच्या मालकीची आव्हाणे शिवारात गट नं ६८८ या ठिकाणी शेती असून ते मंगळवार ९ मे रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजता त्यांच्या शेतात गेले असता त्यांना शेतातील बोअरिंगजवळ एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत हांडांचा सांगाडा आढळून आला. त्यांनी याची माहिती लागलीच तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विनोद ठोळे यांनी आयुर्विमा क्षेत्रात जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. आयुर्विमा क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आणि नव व्यावसायिकांना, एलआयसी एजंटांना प्रोत्साहन देण्याचे काम विनोद ठोळे करीत आहेत. सध्या त्यांनी सर्वोच्च असलेली अमेरिकन संस्था “एमडीआरटी” चे सदस्यत्व मिळविलेले आहे. भारतात सर्वात जास्त “एमडीआरटी” एजंट घडविण्याचा त्यांनी पराक्रम केला आहे. एलआयसीतर्फे आता शनिवारी १३ व १४ रोजी दिवसभर विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान राबविण्यात येत आहे. सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत इयत्ता १० वी पास व १८ वर्षे पूर्ण असणारे तरुण मुलाखतीसाठी येऊ शकतात. मुलाखत कोर्टाच्या मागे रोझ गार्डन जवळ टिमवन कन्सल्टन्टच्या कार्यालयात होणार आहेत. तरुणांनी सुवर्णसंधीचा…
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात भरधाव पिकअप वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या चौघांना उडवल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चार जणांपैकी दोन जणांचे पायाचे जागेवरच तुकडे पडून दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. भडगावकडून बुलढाण्याकडे एम.एच. ४८ बीएम. ७९४३ या क्रमाकांचे पिकअप वाहन जात होते. यादरम्यान वाहन पाचोरा शहरातून जात असताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या वसंत भाईदास पाटील, विनोद पाटील, अमोल वाघ आणि कुंदन परदेशी या चार जणांना जोरदार धडक दिली. या जखमींवर खासगी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील तांबापुरा परीसरातील गौतमनगरात जुन्या वादातून आरोपींनी एका दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड तसेच दागिणे असलेली 33 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याने एमआयडीसी पोलिसात यात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दोघा आरोपी पती-पत्नीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संजना फरहान शेख व फरहान शब्बीर शेख असे अटकेतील दाम्पत्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुर परिसरातील गौतम नगराताील तबस्सुम आरा इक्बाल खान (21) यांच्या तक्रारीनुसार, त्या एका रुग्णालयात अकाउंटंट असून 9 रोजी रात्री साडेआठ वाजता घराकडे येत असताना संशयित संजना फरहान शेख व तिचा पती फरहान शब्बीर शेख (दोन्ही रा.तांबापुरा) यांनी अडवत तुझी आईला समजावून सांग,…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील ठाकरे गटाला न्यायालयाने धक्का दिला आहे. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार वाचलेले असल्याने राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात देखील जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी फटाके फोडून केले स्वागत करीत पाळधी येथे जल्लोष साजरा केला फटाके फोडून जय भवानी ,जय शिवाजी चा नारा देत जल्लोष साजरा केला या वेळी उपस्थित मध्ये ग्रामपंचायत सदस्य डिंगबर माळी , युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी, गुलाब माळी, योगेश पाटील, लखन पाटील,चंदू पवार, अक्षय पाटील , जितेंद्र माळी, बंटी पाटील , समाधान वाघ,अनिल कोळी, अजय…

