कजगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाटेमुळे तापमानाचा पारा या आठवड्यात अधिक वाढला आहे. यामुळे उष्माघाताने तीन दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (वय २९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थान कडील गरम वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यात राज्यासह उष्णतेची लाट आहे. त्यातच वाढत्याच शनिवारी (ता.१३) संध्याकाळी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होता. अक्षयच्या मागे दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. सोळा आमदारांच्या अपात्रते बाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे झाला असून ते आज विधानसभा अध्यक्षांना 79 पानांची निवेदन देणार आहे, अशी माहिती विश्वासनीय सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे आक्रमक झाले असून. बेकायदेशीर पद्धतीने तयार झालेले सरकारवर न्यायालयाने ठपका ठेवलेला आहे. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा याबाबत ही निर्णय दिलेला आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर यावर प्रक्रिया करावी असा जोर आता उद्धव…
नंदुरबार : वृत्तसंस्था प्रेमसंबंधाचे ब्रेक अप झाल्यानंतर संतप्त झालेल्या माजी प्रियकराने भावासोबत घरी जाणाऱ्या मुलीला रस्त्यात गाठून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आड आलेल्या भावाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत, मुलीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा प्रकार नंदुरबार शहरात घडला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. नंदुरबार तालुक्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे नांदरखेडा येथील राजेंद्र सुरेश सूर्यवंशी (२४) या युवकासोबत प्रेमसंबध होते; परंतु कालांतराने दोघांच्यात ‘ब्रेक अप’ झाला होता. या ब्रेकअपमुळे सैरभैर झालेला राजेंद्र सातत्याने युवतीचा पाठलाग करून तिची मनधरणी अथवा भांडण करत होता. १२ मे रोजी युवती दुपारी शहरातील दुधाळे शिवारातील हस्तीनगरातून भावासह मोटारसायकलीने आपल्या…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त सरपंचाचा कार्यकाळ संपलेला आहे. या सरपंचानी गावासाठी अनेक कामे केली आहे. त्यामुळे नक्कीच या सरपंचान गावातील ग्रामस्थाचा मोठा पाठींबा असल्याने सरपंच ज्या दिवशी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. यादिवशी ते भावूक देखील झाल्याचे दिसले आहे. पण यात चर्चा मात्र एकाच सरपंचाची होत आहे. त्याने थेट गावातील मुख्य चौकात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल किवा नकळत तुमचे मन दुखले गेले असेल तर मोठ्या मनाने माफ करा असे फलक झळकल्याने राज्यातील अनेक गावामध्ये हे फलक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील लोकनियुक्त सरपंच सचिन जगन्नाथ पवार हे मागील निवडणुकीत ग्रामस्थांनी त्यांना निवडून…
मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा देखील झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशातील कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी देखील मोठ्या जल्लोषात पुन्हा कामाला लागली आहे, गेल्या महिन्याभरापासून वज्रमुठ सभा थांबविण्यात आली होती ती पुन्हा आता सूरु होणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय महिला घराबाहेर कपडे धूत असतांना दोन इसमांनी जवळ येत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोघाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय महिला आपल्या परिवारासोबत रहायला आहे. दि १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरी एकटी असतांना घराच्या ओट्यावर कपडे धूत असतांना गावातील दोन इसम या ठिकाणी येत महिलेजवळ उभे राहिल्याने महिलेणे सांगितले कि कपड्याचे पाणी तुमच्या अंगावर उडेल त्यामुळे तुम्ही दूर जा त्यांनी उलट महिलेला बोलले कि, तु काही माधुरी दीक्षित आहे का ? तुला एक दिवस उचलून…
अमळनेर : प्रतिनिधी शहरात भल्या पहाटे आपल्या पतीसोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेस चाकू लावून तिची १५ ग्रॅम सोन्याची पोत कापून नेल्याची घटना १४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आर. के. नगरजवळ घडली. दरम्यान चोपडा येथील घरफोडी व पोत कापून नेण्याची घटना शनिवारी चारचाकी चोरणाऱ्या टोळीनेच केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १४ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजता रंजनाबाई रामलाल पाटील या पती सोबत फिरायला निघाल्या होत्या. आर. के. नगरजवळ ते पोहोचले असता समोरून येणारी चंदेरी रंगांची वॅगन आर गाडी अचानक त्यांच्याजवळ थांबली. त्यातून तोंडाला रुमाल बांधलेले चारजण खाली उतरले. हा प्रकार पाहून पतीपत्नी कमालीचे घाबरले होते. त्या चौघांपैकी एकाने…
रावेर : बऱ्हाणपूर जवळील लालबाग येथील अभियंताचे बराणपुर येथील ब्युटी पार्लरच्या शिक्षणासाठी पुणे येथे गेलेल्या युवतीशी प्रेम जडले. प्रेयसीसोबत आंतरजातीय लग्न केले. तिला अंधारात ठेवत महिन्याभरातच जातीच्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या पतीचा साखरपुड्याचे वायरल फोटो बघतात विवाहाचा डाव पत्नीने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडल्याची घटना रावेर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील लालबाग येथील अभियांत्रिकीचा पदवीधर युवक व बऱ्हाणपूर शहरातील ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे येथे गेलेल्या मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले. महिनाभरापूर्वी आळंदीच्या वैदिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. महिनाभरात या विद्युत अभियंत्याने पत्नीकडून चार लाख रुपये उकळले. तिला काहीही कळून देत रावेर तालुक्यातील नात्यातील पदवीधर युवतीशी विवाह निश्चित केला. हा विवाह शनिवारी…
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, एक आवाहन केलं होतं की राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये, त्यामुळे त्याच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. काही दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटक निवडणुकीत भाजपचा कॉंग्रेस पक्षाने मोठा पराभव केला आहे. त्यावर आता माेदी सरकार आणि भाजपमध्ये माेठे फेरबदल हाेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या निकालामुळे माेदी सरकारला २०२४ मध्ये हाेणाऱ्या लाेकसभा निवडणुकीची चिंता लागली आहे. ती ध्यानात ठेवून पंतप्रधान माेदी लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. तसेच पक्ष पातळीवरही संघटनात्मक फेरबदल हाेण्याची शक्यता आहे. माेदी सरकारला ९ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. हा जल्लाेष साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच कर्नाटकच्या पराभवामुळे पक्षात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा झाली असून, लवकरच माेदी सरकारमध्ये बदल दिसणार आहेत.…

