Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका परिसरातून सोन्याच्या दागिन्यासह रोकड असा एकूण ३३ हजाराची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार, शहरातील खोटे नगर परिसरातील हिराशिवा कॉलनी परिसरातील हनुमान मंदिराजवळील रहिवासी नम्रता गादिया(वय ५०)या दि १३ रोजी आपल्या मैत्रिणीच्या घरी जेवणासाठी गेले असतांना घर बंद असल्याचा फायदा घेत अनोळखी चोरट्यांनी दि.१३ मे रोजी भर दुपारच्या सुमारास बंद घरचा दरवाजा कडीकोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातून २० हजाराचे सोन्याची चैन, ३६०० रुपयांचे चांदीचे शिक्के सोबत १० हजाराची रोकड लंपास केली आहे. महिला घरी आले असता त्यांना घर उघडे दिसल्याने त्यांनी घरात…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  ७ वर्षीय मुलीला तुला घरी सोडून देतो असे म्हणत २९ वर्षीय तरुणाने तिला घरी सोडून न देतो एका दुसऱ्या जागेवर घेवून जात तिचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी एका विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत रहायला आहे. दि १२ मे रोजी मुलगी रेल्वे स्थानक परिसरात उभी असतांना याठिकाणी संशयित आरोपी आकाश पाटील (वय २९) हा याठिकाणी येत तुला घरी सोडून देतो असे म्हणत त्याच्या दुचाकीवर बसवून तिला शहरातील एका मैदानावर नेत भितींच्या आडोशाला नेत तिच्या सोबत चुकीचे कृत्य केले त्यानंतर मुलगी रडू लागल्याने त्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ३५ बोगस चिनी लोन अॅप इन्स्टॉल करायला सांगून पैशांची मागणी केलेली नसतानासुद्धा लोन स्वरूपात ६ लाखाची रक्कम पहूर येथील डॉ. जितेंद्र वानखेडे यांच्या बँक खात्यात पाठविली. त्यानंतर लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जिवे मारण्याची धमकी देऊन डॉक्टराकडून ४ लाख २३ हजार ७१९ रुपये उकळणाऱ्या सायबर ठगांच्या गँगच्या सायबर पोलिसांनी बंगळुरू (कर्नाटक) येथून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून २ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करीत ती रक्कम डॉक्टरांना परत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. जितेंद्र वानखेडे यांना ९ जुलै २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सायबर ठगांनी संपर्क साधून ३५ चिनी लोन अॅप इस्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका महाविद्यालयात झालेल्या ‘साडी डे’ ला काढलेला फोटो एकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवून माय वाइफ, लव्ह यू मेरी जान, मिस यू बेबी… असा मजकूर लिहल्याने तरूणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील तरुणी १२ वीचे शिक्षण घेत असून तिच्या महाविद्यालयात दोन महिन्यापूर्वी ‘साडी डे’ हा कार्यक्रम झाला. मुलीच्या एका ओळखीतील मुलाने सर्व मुलीचे फोटो काढले होते. त्यानंतर त्या मुलाने तरुणीसोबत देखील फोटो काढलेले असून त्यानंतर तरुणाने सोशल मिडीयावरील इन्स्टाग्राम स्टोरीवर तो फोटो ठेवून माय वाइफ, लव्ह यू मेरी जान, मिस यू बेबी… असा मजकूर लिहून ठेवला. तो फोटो मुलीसह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील ३४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निवृत्ती नगरातील रहिवासी असलेले हेमंत राजेंद्र चौधरी (वय-३४) या तरुणाने दि १२ मे रोजी रात्री नेहमी प्रमाणे जेवण करून झोपलेले होते. मध्यरात्री घरात चौधरी कुटुंबिय गाढ झोपलेले असतांना त्यांनी दोरीच्या सहाय्याने किचनमध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पतीचा मृतदेह दिसताच पत्नीने एकच हंबरडा फोडला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. हा प्रकार शनिवारी 13 मे रोजी सकाळी 5 वाजता पत्नी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान एका पेट्रोलपंपावर नादुरूस्त ट्रक उभा असतांना अनोळखी चोरट्यांनी ट्रकची ताडपडी फाडून पाच लाख १८ हजार ७०० रुपयांचे शेंगदाण्याचे ९१ पोते लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सुभाष नगरातील रहिवासी असलेले रवींद्र गन्नाथ जाधव हे ट्रक चालक असून सुमारे ५ लाख १८ हजार ७०० रूपये किंमतीचे ९१ कट्टे शेंगदाणे ट्रक (एम.एच. 18 ए.ए. 0963) मधून घेऊन जात असताना चाळीसगाव-मेहुणबारे दरम्यान ट्रक नादुरूस्त झाला. हा नादुरूस्त ट्रक नायरा पेट्रोल पंपावर उभा असतांना बुधवार, 10 मे रोजी पहाटे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात असलेल्या हायस्कूलचा वॉचमनचा हौदातून पाणी काढत असताना त्या पाण्यात बुडाल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार १२ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात किशोर दत्तात्रय चोधरी (४२, मुंदडा हायस्कूल) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा ीरीसरातील मुंदडा हायस्कुलमध्ये किशोर चौधरी हे गेल्याआठ वर्षांपासून पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शाळेतील वॉचमनचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किशोर हे शाळेच्या आवारात असलेल्या हौदातून पाणी काढण्यासाठी गेले असता त्याचा तोल जावून ते हौदात पडले व…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील कर्नाटकातील  निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसला मोठे यश या निवडणुकीत मिळणार आहे. या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत डी. के. शिवकुमार १ लाख मतांनी विजयी झाले आहेत. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. फटाके फोडताना काँग्रेस नेता थोडक्यात बचावला. कर्नाटकात निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान, सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साह साजरा करताना दिसत आहेत. अशातच मोठी दुर्घटना घडताना थोडक्यात टळली. फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे. तोल गेल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महावितरण वीजचोरीविरोधात राबविलेल्या मोहिमेत जळगाव परिमंडलात गेल्या वर्षभरात वीजचोरीची 11794 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी 23 कोटी 9 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 88 प्रकरणांत वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणतर्फे जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात एप्रिल -2022 ते मार्च-2023 या आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात जळगाव मंडलात 8196, धुळे मंडलात 2147 तर नंदुरबार मंडलात वीजचोरीची 1451…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या आज मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. कर्नाटकाच्या रणसंग्रामात काँग्रेसने मुसंडी मारली असून 121 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा 69 जेडीएस 26 इतर ८ तर महाराष्ट्र एकीकरण समिती सर्व जागांवर पिछाडीवर आहे. अद्याप निकालाची चित्र पूर्ण स्पष्ट झाले नसले तरी 50 जागांवर अटीतडीची काँग्रेस आणि भाजपा मध्ये लढत आहे. त्यामुळे कोणाचे बहुमत येणार हे अद्याप निश्चित नसल्याने सर्वांच्या धाकधूक वाढलेली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. सध्या सुरवातीच्या कलांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि जेडी (एस) चे एचडी कुमारस्वामी…

Read More