Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात वॉचमनचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    जळगावात वॉचमनचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskMay 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात असलेल्या हायस्कूलचा वॉचमनचा हौदातून पाणी काढत असताना त्या पाण्यात बुडाल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार १२ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात किशोर दत्तात्रय चोधरी (४२, मुंदडा हायस्कूल) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा ीरीसरातील मुंदडा हायस्कुलमध्ये किशोर चौधरी हे गेल्याआठ वर्षांपासून पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शाळेतील वॉचमनचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किशोर हे शाळेच्या आवारात असलेल्या हौदातून पाणी काढण्यासाठी गेले असता त्याचा तोल जावून ते हौदात पडले व त्यांचा बुडून मृत्यू झाला.

    बराच वेळ झाला तरी किशोर हे पाणी घेवून आले नसल्याने ते त्यांना बघण्यासाठी त्यांच्या पत्नी हौदाजवळ गेल्या असता त्यांना आपले पती किशोर हे हौदात बुडालेले दिसून आले. त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर परीसरातील नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेत किशोर चौधरी यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.