नागपूर : वृत्तसंस्था शहरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगा जमुना येथे गुन्हे शाखेसह पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या मुलींची मोठ्या प्रमाणात सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान ८ ते ९ ग्राहकांनाही पकडण्यात आले आहे. बंदी असतानाही गंगा जमुना परिसरामध्ये अल्पवयीन मुली वेश्याव्यवसायात व्यस्त असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून हा संपूर्ण छापा टाकण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून गंगा जमुनामध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे. गंगा जमुनामध्ये सुमारे ३ ते ४ हजार मुली व महिला वेश्याव्यवसायात गुंतलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगा जमुनामध्ये अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, गंगा जमुनामध्ये या दलालांचे लकडगंज…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात लग्नाच्या वरातीत डीजेच्या गाण्यावर ताल धरत नवरदेवाने चक्क हातात तलवार घेऊन उपस्थित नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी नवरदेवासह दोन इसमाविरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भोईवाडा परिसरात मंगळवारी १६ मे विकी गोपाल कोळी उर्फ अहिरे यांचे लग्न होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लग्नाची वरात जात असतांना नवरदेव विकी कोळी याने हातात तलवार घेऊन मित्रांसोबत नाचत होता. त्यावेळी एका हातात तलवार व दुसऱ्या हातात म्यान दाखवून आणि दोन समाजाता जातीय तेढ निर्माण होईल असे गाणे वाजवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे यांनी दिलेल्या…
मुंबई : वृत्तसंस्था नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना नुकताच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खा. राऊत यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर २३ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करीत दिलासा दिला. मुंबई नाका पोलिस ठाण्यातील हवालदार ललित केदारे (रा.बनकर मळा, पुणा रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी १२ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना, शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राऊत यांनी, शिंदे -फडणवीस सरकारवर टीका करताना, हे सरकार तीन महिन्यांत…
धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून धरणगाव येथील संजय नगर भागात ६० लक्ष निधीतून महिला शौचालय बांधण्यात आले या शौचालयाचे आज रोजी माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर आणि त्या प्रभागातील नगरसेवक सुरेश महाजन (बुट्या महाजन) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संजय नगर परिसरात बांधण्यात आलेल्या शौचालयामुळे आता महिलांची गैरसोय होणार नाही म्हणून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलास भाऊ महाजन, भाजपा शहर प्रमुख दिलीप भाऊ महाजन गटनेते पप्पू भावे, वाल्मीक…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने तिच्या सोबत ६ ते ७ महिन्यापासून संबध ठेवत तिला गरोदर ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह रहायला असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी नोव्हेबर २०२२ ते आज पावेतो फिर्यादीच्या राहत्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी अशा ठिकाणी संशयित आरोपी प्रवीण याने अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य करीत तिला गर्भवती केले आहे. दि १६ रोजी अल्पवयीन मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसोबत तब्येत खराब असल्याने डॉक्टराकडे गेली असता, याठिकाणी डॉक्टरांनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरात एकाच दुचाकीने नातेवाइकाच्या लग्नासाठी जळगाव येथे येणाऱ्या चौघांना ट्रॅक्टरने उडविल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:४० वाजता तालुक्यातील किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर घडली. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जखमी झाले. तिघांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुफणी येथील रहिवासी ज्ञानेश्वर सपकाळे हे दुचाकीने जळगावला लग्नाला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (१२), त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (४२), नीलेश निकम (३८) हे तीन जण सोबत होते. एकाच दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील “नगरपालिका दवाखान्यासमोरील व्यापारी संकुलात असलेल्या न्यू गुजराती स्वीट मार्ट व मॉडर्न रोड गोपी शॉपिंग मॉल या दुकानाच्या मालकांना दोघा अज्ञातांनी अनुक्रमे १० व २० हजार अशी खंडणी मागून धमकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नगरपालिका दवाखान्यासमोरील न्यू गुजराती स्वीट माचे मालक कपिल मेहता हे दुपारी १:२० मिनिटांनी दुकानाच्या काउंटरवर बसलेले असताना २० ते २५ वर्षे वयोगटातील दोन तरुण तोंडावर रुमाल बांधून काउंटरजवळ आले व मोबाइल घेऊन ‘बात कर लो’, असे म्हणून फोन हातात दिला. पलीकडून ‘राजा बात कर रहा हूँ. पाच मर्डरवाला बोल रहा हूँ. आज जो लड़के दकान पे आये उनके…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या दोन महिन्यापासून देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आता पुन्हा एकदा त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी धमकी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आणि आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणण्यानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची पडताळणी केली जात असून, तपास सुरू आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमान वाढत आहे. यात जळगाव जिल्ह्यात दोन ते तीन बळी या उष्मघाताने घेतले असून राज्यातील विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला असताना बुधवार १७ मे पासून पुन्हा तापमानवाढीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अवकाळी पावसानंतर राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला शहरात घेण्यात आली. तर उर्वरित शहरांमध्येदेखील हा पारा ४२ ते ४४च्या दरम्यान होता. सोमवारी…
मुंबई : वृत्तसंस्था भारत हा देश कृषीप्रधान असल्याने देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. तर यंदा देखील मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने विलंबाने मान्सून दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. २२ मे रोजी दरवर्षी मान्सून देशात दाखल होतो आणि १ जून रोजी केरळमध्ये येतो. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे २२ मेची तारीख हुकणार आहे. केरळमध्ये नेमका कधी येणार, याबद्दल निश्चितता नाही. मागच्या वर्षी १ जूनच्या ऐवजी ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल…

