छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था एकाच कुटुंबातील पाच वर्षीय मुलीसह पती-पत्नीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची ह्र्दयद्रावक घटना वाळूज परिसरातील वळदगावात घडली आहे. हि बातमी वाऱ्यासारखी फिरत असल्याने तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना दि १९ रोजी पहाटे उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील वळदगावात रहिवासी असलेल्या मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) व श्रेया (वय पाच) वर्ष असे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आलेल्यांची नावे आहेत. मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहून शेती करत होते. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी शहरात सुरु असलेल्या एका यात्रेदरम्यान २४ वर्षीय विवाहितेचा चार तरुणांनी पतीसमोर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात चार जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बोरी नदी पात्रात यात्रा सुरु असतांना दि १८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास २४ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसोबत यात्रेत गेली असता. यात्रेतील एका ठिकाणी रांगेत उभी असतांना ४ तरुण या ठिकाणी रांगेत असतांना महिलेच्या पतीला एका मुलाचा धक्का लागला यावेळी त्या तरुणांना पतीने बोलले असता ते तरुणांनी पतीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केल्याने महिला याचे भांडण आवरण्यास गेली असता. त्या तरुणांनी २४ वर्षीय महिलेला शिवीगाळ…
मुंबई : वृत्तसंस्था एका उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना उत्तरे मायक्रो ब्ल्यूटूथद्वारे सांगितले. शेकडो जणांनी या प्रकारे परीक्षा दिली. एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेण्यात आल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर कवठेकर यांनी तब्बल १६ प्रकारचे प्रश्नपत्रिकांचे फोटो मुंबई पोलिसांना पुरावा म्हणून दिले आहेत. भांडूप पोलिसांनी कवठेकर यांचा गुरुवारी जबाब नोंदवला आहे. एसआयटीकडून भरती प्रक्रियेतील या गैरप्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी समितीने केली आहे. मुंबई पोलिस दलात रिक्त ७ हजार ७८ जागांसाठी ७ मे रोजी लेखी परीक्षा पार पडली. एकूण…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले असतानाही सुप्रीम कॉलनीमध्ये सुरा फिरणाऱ्या घेऊन गुन्हेगाराला बुधवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास पकडले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनूसिंग रमेश राठोड (२३, रा. सुप्रीम कॉलनी) असे अटक झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सोनूसिंग राठोड याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, तो हद्दपार असतानाही सुप्रीम कॉलनीमध्ये फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. बुधवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला पकडून अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ लोखंडी सुरा मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करीत सुरा जप्त केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांच्या धूमस्टाइलने हातातून मोबाईल लांबविणाऱ्या एकास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून ताब्यात घेवून त्यास रामानंद पोलीस स्थानकाच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या काही दिवसापासून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांच्या धूमस्टाइलने हातातून मोबाईल लांबविल्याच्या घटनेत वाढ होत होती. त्याच अनुषंगाने जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत शहरातील मोहाडी परीसारतील उमेश पार्क परिसरातून राहुल रानू देखनाळे (वय २४) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्याजवळून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्याला पुढील कार्यवाहीसाठी रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोबाईल चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील रामपुरा, पारधीवाडा भागातील रहिवासी असलेला संदीप निळकंठ चव्हाण (२४) याचा घराजवळच सुरू असलेल्या कार्यक्रमात नाचत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि. १८ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ रोजी मयत संदीप चव्हाण याच्या घराशेजारी गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी १८ रोजी पहाटे ३:३० वाजता गाण्यांवर नाचत असताना चक्कर आल्याने संदीप जमिनीवर पडला. त्याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रसाद पाटील यांनी मृत घोषित केले. मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदीपने चुलत भावाचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. मयत संदीपचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रोजी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास वाढदिवस साजरा करीत असताना दोन गटात तुफान राडा झाला होता. या प्रकरणी घटनास्थळी एमआयडीसी पोलीस पथक दाखल होत रात्री उशिरा कार्यवाही सुरु केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनी परिसरातील मासूमवाडीमध्ये बुधवारी रात्री ९:५० वाजेच्या सुमारास एका तरुणाचा वाढदिवस साजरा सुरू होता. त्यातील काही तरुणांनी मौजमजा करताना एकमेकांच्या अंगावर फेकलेली अंडी ही काही तरुणांच्या अंगावर पडल्याने दोन समुदाय समोरासमोर येवून तणाव निर्माण झाला. एवढेच नव्हे तर एका समुदायाकडून दगडफेक सुध्दा झाली. त्यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. दोन मालवाहतूक रिक्षांसह दोन दुचाकींची तोडफोड सुध्दा करण्यात आली आहे. या घटनेनंतर गुरूवारी पहाटे ४…
पुणे : वृत्तसंस्था सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी.नड्डा आहे. राज्यामध्ये त्यांचे तब्बल 13 कार्यक्रम आहे. आज ते पुण्यामध्ये बैठकीसाठी येणार आहे. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवर केला आहे. संजय राऊत यांना निवडणुकीमध्ये कळेल की जे. पी. नड्डा कोण आणि काय आहेत?, अशा शब्दात बावनकुळे राऊतांवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मुंबईत कुणी आलं तर शिवसेना किंचित होईल अशी राऊतांना भीती वाटते. त्यांचे नेते भाजपमध्ये येतील अशी भीती त्यांना वाटते. जे. पी. नड्डा राज्यात सगळीकडे फिरत आहे. आम्ही म्हणालो मुंबई महानगरपालिका निवडणूक आम्ही जिंकू म्हणून संजय…
जळगाव : प्रतीनिधी शहरातील एका नगरात बंद घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या भोईटे गल्लीतील रहिवासी शरीफ मोहम्मद भिस्ती हे शुक्रवार ५ मे रोजी ते गुजरातमधील अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता मंगळवार, १६ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भिस्ती यांचा भाचा ईरशाद गुलाम भिस्ती याचा त्यांना फोन आला व त्याने तुमच्या घराचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे सांगितले. भिस्ती यांनी त्याला घरात जावून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार ईरशाद हा गेला असता त्याला कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीचे…
नागपूर : वृत्तसंस्था भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजपच्या सहा आमदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रीपदासाठी ‘मनी ट्रप’च्या या प्रकाराचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुजरातमधील मोरबी येथून नीरजसिंग राठोड याला ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक आमदारांनी त्यासाठी लॉबिंगही सुरू केले आहे. त्यातच मंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने नीरजसिंह राठोड या तोतयाने चक्क नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजप आमदारांना फसवले. भाजपचे नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना फोन करून या तोतयाने लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तुम्हाला…

