Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदी दोन्ही लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. गुरुवारी म्हणजेच 18 मे रोजी सोने 60,100 रुपयांवर उघडले. यानंतर त्यात थोडीशी घसरण दिसून आली. सकाळी 11.30 वाजेपर्यंत ते 60085 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. काल ते60145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण होत आहे. मार्केट उघडल्यानंतर चांदीचा भाव 72,555 रुपये प्रति किलोवर होता. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 173 रुपये किंवा 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 72,485 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. काल वायदे…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  तालुक्यातील धोबीवराड गावांमध्ये बिबट्याने दहशत माजवली आहे. गाव आता दहशतीखाली येत आहे. बुधवार १७ मे रोजी रात्री शेतात बांधलेली गाय खाल्ल्यानंतर आज गुरुवार दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जख़मी झाला आहे. दरम्यान वन विभागाने दखल घेतली असून घटनेची माहिती घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील धोबी वराड गावातील ४० वर्षीय आशीष सुधाकर सुरळकर हे या हल्यात जखमी झाले आहे. ते नेहमीप्रमाणे शेतावर जात असतांना बिबट्याने हल्ला केला. मात्र सावध होत आशिष सुरळकर याने बिबट्याला बाजूला ढकलले. पण त्या प्रयत्नात त्याच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंज्याने…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सार्वत्रिक निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता असल्यामुळे खानदेश मध्ये राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी व संघटनात्मक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर खानदेश ची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष बळकटीवर आणखी भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विभागीय स्तरावर बुथ कमिट्या अधिक भक्कम आणि सक्षम करण्याची जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. यात खान्देशची जबाबदारी आ. एकनाथराव खडसे व आ. अनिल पाटील यांच्यावर सोपविण्यात आली असून लोकसभा व विधानसभा निवडणुकासाठी कामाला लागण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहे. प्रत्येक मतदार संघात संघटन मजबुत करण्याबरोबरच निवडणुकीची तयारी देखील सुरु होणार आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका परिसरात चोरट्यांनी बंद घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून तब्बल ४ लाखांच्या दागिन्यासह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पार्वती नगरातील अभिराम अपार्टमेंट मधील रहिवासी स्नेहल सौरभ फडके(वय ३८) हे दि.१४ रोजी आपल्या घराच्या दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता. दि १४ ते १७ रोजी दरम्यान अनोळखी चोरट्यांनी या बंद घराचे कुलूप तोडून घरातील ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ६५ हजार किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ८० हजार रुपये किमतीच्या २ सोन्याच्या चैन, ३५ हजार किमतीच्या ३ जोड सोन्याचे कानातले, १ लाख…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील २ अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालूक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना दि ११ रोजी भर दुपारच्या सुमारास घडली आहे. यात दोन्ही मुलीच्या पालकांनी थेट पारोळा पोलिसात धाव घेत दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात एका मुलीचे वय १६ वर्षीय तर दुसरीचे १५ वर्षीय मुलगी आहे. या दोन्ही मुलीना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.प्रवीण पारधी व पोहेकॉ.किशोर पाटील हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  देशात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच घटना जळगावात लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या मुलीची हिंदूत्ववादी संघटनांच्या मदतीने एका हॉटेल मधून सुखरुप सुटका केली आहे. रामानंद पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. जळगावच्या तरुणी सोबत नाशिक येथील एका तरुणाची जळगावच्या तरुणीसोबत ओळख झाली. हा तरुण दोन दिवसांपूर्वी जळगावात तरुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने शहरातील एका नामांकीत हॉटेलध्ये तरुणीला मध्यरात्रीच्या सुमारास भेटण्यासाठी बोलाविले होते. तरुणी हॉटेल मध्ये गेली होती. शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ही घटना माहिती समजाताच त्यांनी लागलीच हॉटेलमध्ये धाव घेतली. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांनी मुलीची सुटका केली. रात्रभर तरुणीसह तरुणाला पोलिसांनी रात्रभर पोलीस ठाण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अर्शद रब्बी पटेल (२१, रा. सुप्रीम कॉलनी) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी चिमुकली घराजवळ खेळत होती. अर्शद पटेल याने तिला एका घरामध्ये नेऊन विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिच्या आईने धाव घेऊन अर्शदच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर तेथून अर्शदने पळ काढला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  घरातील कचरा फेकण्यासाठी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील १० हजार रूपये किमतीची मंगलपोत ओढून चोरटा पसार झाल्याची घटना नूतन वर्षा कॉलनीमध्ये ३ मे रोजी सकाळी १०:१५ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील महाबळ परिसरातील नूतन वर्षा कॉलनीत प्रेमलता नारायण सोनवणे या बुधवार, दि. ३ मे रोजी कचरा फेकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. त्यावेळी अचानक समोरून एक अनोळखी पुरुष आला. त्याने सोनवणे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून पळ काढला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिचे कुटुंबीय घराबाहेर आले. त्यांनी चोरट्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरून…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  मॉडेल रोड व पाणी गेटजवळील व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत जळगाव येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील यावल रोड पाणी गेटजवळ असलेल्या न्यू गुजराती स्वीटच्या कपिल मेहता यांना वीस ते पंचवीस वयोगटातील दोन तरुणांनी १० हजारांची खंडणी मागितली होती. एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटील यांना, आरोपी जळगावला लपून राहत असल्याची माहिती मिळाली. यावरून कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाला माहिती देऊन खंडणी प्रकरणातील संशयित सोनू मोघे हा खोटेनगर येथे येत असल्याची माहिती मिळाली. तेथे सापळा लावत त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्याची माहिती विचारली असता, योगेश्वर उर्फ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पाचोरा तलुक्यातील सातबारा उतार्‍यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने दि १७  रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास अटक केली. पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील भगवान दशरथ कुंभार (वय ४४) असे अटकेतील संशयिताचे नाव असून ही कारवाई बांबरूड येथे संशयिताच्या घरी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, लासगाव येथील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेती असून त्यांनी एक लाख 30 हजारांचे पीक कर्ज घेतले आहे. शेतीच्या सातबारा उतार्‍यावर कर्जाचा बोजा लावण्यासाठीचे काम पाचोरा येथील कार्यालयातून करून देतो म्हणून भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) यांनी तक्रारदाराकडे एक हजार…

Read More