Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी  निवडणुकीत एखाद्याला केवळ दोन मते मिळाली आणि त्यातही ते विजयी झाले असे कोणी तुम्हाला सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण असे घडले आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत. त्यात पती-पत्नीला केवळ दोन मते मिळाली आणि त्यातही ते विजयी झाले असा कोणालाही विश्वास न बसणारी घटना समोर आली आहे. कुठे वाचा सविस्तर. लोण गावातील शहीद जवान लीलाधर शिंदे हे शहीद झाले. त्यांचा दुखवटा म्हणून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत च्या पोटनिवडणुकीत मतदान न करण्याच्या निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे गावकऱ्यांनी मतदान केले नाही मात्र पोलिस पाटील आणि इतर दोन जण मतदानाला आल्याने या प्रभागात फक्त तीन मतदान झाले. त्यात हिलाल भटा पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या पाच वर्षांत युती सरकारने व शिंदे- फडणवीस सरकारनेही हे प्रकल्प पूर्ण होण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. एकप्रकारे खानदेशवर हा अन्यायच आहे. मंत्री गिरीश महाजन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मात्र, ते केवळ बोलतात. अगदी त्यांच्या जामनेर भागासह जिल्ह्यातील कोणतेच प्रकल्प पूर्ण करण्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करून खानदेशला सुजलाम, सुफलाम करावे, असे मत आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.शिवरामनगरमधील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी उपस्थित होते. अवैध धंदे उघडपणे सुरू आहेत. पोलिस सर्रासपणे पैसे घेत आहेत. माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात असा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील कर्नाटकात  आज सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून, तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय, अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर सुरू आहे. 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसनं 135, भाजपनं 66 आणि जेडीएसनं 19 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील कोंडी अनेक दिवस सुरूच होती. मात्र, अनेक दिवसांच्या भेटीनंतर आणि हायकमांडनं मन वळवल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलं. यावेळी जी परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियंक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते…

Read More

शहरातील एस.टी. वर्कशॉप परिसरात गावठी पिस्तूल, धारदार चाकू सोबत घेवून रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आले असून या टोळीतील दोन मुले अल्पवयीन असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुरुवारी रात्रीच्या सुमारास आपल्या हद्दीत नाईट पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी काशिनाथ चौकात बोलाविले. याठिकाणी जावून त्यांनी सांगितले की, एसटी वर्कशॉपजवळ अंधारात काही जण शस्त्रात्रे घेवून रस्ता लुट किंवा दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोहेकॉ प्रदिप पाटील, पोना हेमंत कळसकर, पोकॉ अशफाक मेहमुद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील महामार्गानजीक असलेल्या सम्राट कॉलनी परिसरात एका धार्मिक स्थळावर दगडफेक केल्याची घटना दि १९ रोजी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी घटनांसाठी तत्काळ दाखल होऊन तणाव नियंत्रणात आणले दरम्यान रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनी परिसरात बुधवारी रात्री वाढदिवसाच्या केक कापण्याच्या कारणावरून काही तरुणांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच महामार्गाजवळील आज पुन्हा सम्राट कॉलनी परिसरातील एका धार्मिक स्थळावर शुक्रवारी १९ मे रोजी रात्री ९ वाजता काही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मद्यप्राशन करून घरामध्ये येण्यास मनाई केली म्हणून रावसाहेब दामू पाटील (३८, रा. न्हावी, ता. यावल) या जावयाने सासूच्या डोक्यासह कानाजवळ विळा मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी कोठारीनगरमध्ये घडली. लता भास्कर पाटील (५२) असे जखमी सासूचे नाव असून याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोठारी नगरातील सासुरवाडीत गुरुवारी रावसाहेब पाटील हा आला. तेव्हा त्याला त्याच्या पत्नीने दारू पिऊन घरात येण्यास मनाई केली. याचा राग येऊन त्याने सासूच्या डोक्यासह मानेजवळ विळा मारून दुखापत केली. पत्नी वाद सोडविण्यासाठी आली असता पाटील याने पत्नीच्या मानेवर नखाने ओरबाडून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर सासूने रामानंदनगर…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील रहिवासी तसेच जम्मू श्रीनगर येथे कार्य रत किशोर पाटील यांचा कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला . गेल्या बारा वर्षापासून सीआरपीएफ मध्ये देशाची सेवेत कार्यरत असलेले किशोर पाटील  देशाच्या सीमेलगत सेवा करीत असताना अनेक वेळा दहशतवादांशी लढले आहेत. नुकतेच ते गावी सुट्टीमध्ये आले असता याच पार्श्वभूमीवर कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी किशोर पाटील यांनी शत्रूंच्या कारवाई हाणून पाडण्यासाठी काय करावे लागते याचे अनेक किस्से सांगितले.

Read More

जळगाव :  प्रतिनिधी  सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वर बनावट खाते अज्ञात इसमाने तयार करून त्यावर अश्लील मजकूर आणि नग्न व्हिडीओ व फोटो व्हायरल करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, भुसावळ येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून त्यावर अज्ञात इसमाने १७ मे रोजी अश्लील मजकूर आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्याने त्यांनी सायबर सेलला धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे गट सध्या भाजप व शिंदे गटाला निशाण्यावर धरत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र करीत असल्याचे गेल्या काही महिन्यापासून दिसत आहे. तर आता ठाकरे गटातील नेत्या व पदाधिकारीमध्ये वाद पेटल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. बीड‎ शिवसेना ठाकरे गटाचे‎ जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव‎ यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून‎ ‎ ‘होय, मी सुषमा‎ ‎ अंधारेंच्या दोन‎ ‎ कानशिलात‎ ‎ लगावल्या, त्या‎ ‎ कार्यकर्त्यांकडून‎ ‎ पैसे मागत‎ ‎ आहेत, माझे‎ ‎ पद विक्री‎ करायला निघाल्या आहेत,’ असा‎ आरोप केला. अंधारे यांनी मात्र‎ मारहाणीचा दावा फेटाळला आहे.‎ बीडमध्ये २० मे रोजी‎ शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची‎ ग्रामीण महाराष्ट्राची समारोप सभा‎ आहे. खा. संजय राऊत, सुषमा‎…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील दोन बालक खेळत असतांना हरविले होते. त्यांना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कामगिरीसह बालकांची माहिती देणा-या सुज्ञ नागरिकाचे देखील बालकांच्या पालकांनी आभार व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपुर कुसुंबा येथे कार्तिक जयसिंग परदेशी हा सहा वर्षाचा आणी त्याच्यासोबत प्रियांशु अजयकुमार वर्मा हा चार वर्ष वयाचा बालक दि.१८ मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन्ही सोबत खेळत असतांना दोन्ही बालक अचानक बेपत्ता झाले. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाले. दोन्हीबालकांच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला धाव घेत आपली व्यथा मांडली. यापैकी कार्तिक हा…

Read More