चोपडा : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस राहत्या घरातून पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील एका परिसरात १५ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासोबत राहायला आहे. दि १६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असतांना अनोळखी इसमाने मुलीस काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सदस्यांनी अनेक ठिकाणी या मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने त्यांनी चोपडा शहर पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि.संतोष चव्हाण हे करीत आहेत.
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २० रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास विवाहिता मजुरी करण्यासाठी जात असतांना एका डेअरी जवळील मुख्य रस्त्यावर संशयित आरोपीने महिलेचा वेळोवेळी पाठलाग करीत असे तसेच शिट्या मारून गाणे म्हणायचा मुख्य रस्त्यावरून जात असतांना अचानक संशयित आरोपी महिलेला म्हणाला कि, या महिलेने माझ्यावर केस केलेली आहे म्हणत घाणेरड्या शिवीगाळ करू लागला व अश्लील टोमणे देखील मारू लागला यामुळे विवाहितेला लज्जा उत्पन्न झाली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका गावात परराज्यातून आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाणी मागण्याच्या बहाण्याने एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात परराज्यातून मजुरी करण्यासाठी आलेल्या परिवारातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना दि १९ रोजी एकाने घरात असलेल्या मुलीला पाणी मागण्याच्या बहाणा करीत घरात घुसत अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला असता. त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसात धाव घेत एका संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहायला आहे. गेल्या ६ महिन्यापूर्वी यावल तालुक्यातील एका तरुणाने या मुलीशी मैत्री करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात टाकून वारवार लग्नाचे आश्वासन देत तीन ते चार वेळा सहा महिन्यात जबरदस्ती अत्याचार केले त्यानंतर लग्नास नकार देत समाजात तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीने रावेर पोलिसात धाव घेत एका तरूणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत…
बीड : वृत्तसंस्था मविआ सरकार सत्तेत आल्यापासून ते मविआ सरकार पडेपर्यंत संजय राऊत सातत्याने भाजपावर टीका करताना दिसले. त्यानंतर शिंदे गट वेगळ्या झाल्यावर त्यांच्यावरही राऊतांनी वेळोवेळी तोफ डागली. आम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, असे संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही म्हणताना दिसतात. तशातच आज, बीडच्या जाहीर सभेत संजय राऊतांनी तुफान आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाला एक ‘ओपन चॅलेंज’ दिलं. “आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तु्म्ही मते मागितलीत. असं अजिबात नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे हे १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत. कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली गावातील १७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. घरात एकटी असताना शिरसोलीतील पूजा सुधाकर वंडोळे (बारी) या १७ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. आई बाहेर गेली असताना पूजा घरात एकटीच होती. तिने घराचा कडीकोयंडा लावला आणि गळफास घेतला. आई घरी आल्यावर दरवाजा उघडत नाही, म्हणून आरडाओरड सुरू केली. तेव्हा शेजारच्या मंडळींनी धाव घेतली आणि दरवाजा उघडला. तेव्हा पूजा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पूजाला दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी मृत घोषित केले.…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरात वाढदिवसाच्या दिवशीच कुलरचा शॉक लागून वैष्णवीचा मृत्यू झाला. यामुळे अनेकांची मने हेलावली, डोळे पाणावले, कोवळ्या वयातच एक्झिट घेतली. पण तिचे मरणोत्तर नेत्रदान करून अंधकार असलेल्या गरजूंच्या जीवनात प्रकाश देण्याचा आदर्श तिच्या आई- वडिलांनी समाजासमोर उभा केला आहे. शुक्रवारी वाढदिवसाची तयारी सुरू असताना वैष्णवी चेतन सनान्से (९) हिला कुलरचा शॉक लागला. आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने सनान्से परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. वैष्णवीच्या वाढदिवसाच्या रुपाने आनंदोत्सवच जणू साजरा होणार होता, परंतु तेथे शोककळा पसरली. अशा कठीण समयी वडील चेतन सनान्से, काका लखन सनान्से यांनी वैष्णवीचे मरणोत्तर नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लागलीच जळगाव…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना वाचायला मिळतात. तशातच आता ग्रेटर नोएडामध्ये एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीची हत्या केल्यानंतर मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी कानपूरची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ज्या विद्यार्थ्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली, तो अमरोहा येथील आहे. ही संपूर्ण घटना ग्रेटर नोएडा येथील शिव नाडर विद्यापीठात घडली. विद्यार्थ्याने ही हत्या का केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्या मुलीला आधी मिठी मारून मग गोळी मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही दोन्ही…
पुणे : वृत्तसंस्था एका ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी करुन तिचा हात पकडून विनयभंग केला आहे. आरोपी सदस्य एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या महिलेला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे. या प्रकरणी त्या ग्रामपंचायत सदस्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हि घटना पुण्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गुलाब निकाळजे (रा. कोरेगाव) असे आरोपी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. हा सगळी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व 17 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेच्या वेळी फिर्यादी या काम करुन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका ब्युटीशियनने तिच्या विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तिच्या प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हि घटना भोपाल जिल्ह्यात घडली आहे. दुसरीकडे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पतीनेही प्रेयसीवर अॅसिड हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने तिला पाच वर्षे लिव्ह इनमध्ये ठेवल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे. प्रेयसी 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप प्रियकराने केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. ग्वाल्हेरच्या जनकगंज पोलीस स्टेशनच्या राम दवारा भागात राहणाऱ्या 32 वर्षीय श्वेता बन्सल यांच्यावर संजय नगर भागातील एका 34 वर्षीय ब्युटीशियनने हल्ला…

