धरणगाव : प्रतिनिधी गावकऱ्यांनी काम करणाऱ्यांच्या पाठीशी एकजुटीने राहून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून घ्यावा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत गावाच्या सुमारे 65 लाखाची मंजूर पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून त्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, नागरिकांनी वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार हे होते. यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धार येथे 65 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून या पा. पु. योजनेचा शुभारंभ आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…
Author: editor desk
शेगाव : वृत्तसंस्था पंढरपुर येथे देवदर्शन करण्यासाठी शेगावातील काही भाविक गेले होते. तेथून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे शेगावत देशमुख पेट्रोल पंपाजवळ वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पिल्लरवर धडकले. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू तर ७ गंभीर भाविक जखमी झाले आहेत. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याअसल्याने त्यांना अकोल्यात हलविण्यात आले. पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी शेगावातील काही गेले होते. परतत असताना भाविकांच्या वाहनाला शेगावात मोठा अपघात घडला. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर ७ भावीक…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरात सध्या यात्रा सुरु आहे. यात्रा बघण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाविक येत असून याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून एकाची दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे येथील रहिवासी गोविंदराज बोरसे (वय २७) हे दि २० रोजी संध्या.७ वाजेच्या सुमारास श्री संत सखाराम महाराज यात्रा नदी पत्रातील पार्किंगमध्ये दुचाकी एम.एच.१८.ए.क्यू.३४८८ हि लावून गेले होते पण यात्रा पाहून आल्यावर त्यांना कुठेही दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी त्यांनी अमळनेर पोलिसात धाव घेत एका इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रमोद पाटील…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एकाने अंगलट केल्याने त्याच्या विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह १० वर्षीय मुलगी रहायला आहे. दि २० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावात पाणी आले असतांना एकाने दहा वर्षीय मुलीला आपल्या घरी पाणी भरण्याच्या बहाण्याने बोलवून आतील रूममध्ये घेवून जात तिच्याकडे २० रुपये देवून तिच्या सोबत अंगलट केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने तेथून काढता पाय घेत घरी येत घडलेला प्रकार आपल्या परिवारातील सदस्यांना सांगितला असता त्यांनी लागलीच धरणगाव पोलिसात धाव घेत एका विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी…
भुसावळ : प्रतिनिधी तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. दानिश शेख जाबीर शेख (१७) आणि अंकुश दौलतसिंग ठाकूर (१७, रा. ३२ खोली, खडका रोड, भुसावळ) अशी मयत बालकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड भागातील हे दोन मुलेदेखील दुपारी साडेतीन वाजता नदीत पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाली. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. दोघांना बाहेर काढण्यासाठी राहुलनगरातील मासेमारी करणाऱ्या युवकांची मदत घेण्यात आली. तब्बल तीन तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती दोन्ही…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील बापाने आपल्या १३ वर्षीय मुलीसोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसात बापाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह राहायला असलेल्या १३ वर्षीय मुलगी दि २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरात भांडी घासत असतांना घरात असलेल्या बापाने मुलीस बळजबरीने ओढून तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सावदा पोलिसात सांगितल्याने आरोपी बापाविरोधात अत्यचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा एका इसमाने घरात घुसून अत्याचार केल्याची घटना दि २१ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २० रोजी रात्रीच्या सुमारास गावातील एक इसम महिलेच्या घरात प्रवेश करीत घराचे दार आतून बंद करीत महिलेशी जबरदस्ती करू लागला यावेळी महिलेने आरडा ओरड करण्यास सुरुवात केल्याने महिलेचे तोंड दाबून महिलेच्या मनाविरुद्ध तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले व सदर प्रकार जर कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी…
मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटसृष्टीतील अफलातून अभिनेता म्हणून भरत जाधव यांची ओळख आहे. विनोदी भूमिकांपासून ते अनेक गंभीर धाटणीच्या भूमिका साकारत भरतने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केलं आहे. मालिका असो, चित्रपट असो किंवा नाटक तिन्ही क्षेत्रात भरत नेहमीच सर्रस ठरला आहे. भरत जाधव सध्या चित्रपटांमध्ये झळकत नसला तरी तो नियमितपणे आपल्या नाटकांचे प्रयोग करतच असतो. अशातच काल भरत जाधव आपल्या ‘तू तू मी मी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी रत्नागिरीला पोहोचला होता. यादरम्यान नाट्यगृहात असं काही घडलं की, अभिनेत्याने नाराजी व्यक्त करत आपण परत इथे कधीही येणार नसल्याचं प्रेक्षकांना सांगून टाकलं. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सिनेसृष्टीत आपलं स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण…
प्रेमात आजवर सर्वच वेडे झाले आहे. त्यांनी प्रेमात काय केले याचा विचार हि कुणी करू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. एका प्रेमी युगुलाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. खरगोनमधून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विष पिऊन हे प्रेमी जोडपे स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांना हकीकत समजताच त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील या प्रेमी युगुलाने एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती.…
मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराची नोट कालबाह्य केल्यानंतर देशातील अनेक नागरिकांना मोठा धक्का बसला होता. पण यात चार महिन्याची मुदत दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर आज पुन्हा एकदा स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने रविवारी 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हटले आहे की, 2000 च्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. एका वेळी 10 नोटा बदलता येतील. नोटा बदलण्यासंबंधी सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने ही अधिसूचना जारी केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आधारसारखा आयडी…

