Author: editor desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी झाली. त्यांच्या या चौकशीनंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, अजित पवारांनी त्यांना फोन केला नाही. अजित पवारांनी जयंत पाटील यांना फोन न केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असतात. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांकडून या चर्चा नेहमी फेटाळण्यात येतात. अशात जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीनंतर अजित पवारांनी त्यांना फोन न…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या अनेक महिन्यांपासून मुक्ताईनगर शहरमार्गे मध्य प्रदेशातून गुटक्याची अवैध तस्करी होत आहे. याकडे पोलिसांची भूमिका मात्र बघायची असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आहे. इतर राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून यापूर्वी अनेक कारवाया पोलिसांनी केलेले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गुटख्याची गाडी पकडून गाडीसह लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांच्या स्वाधीन केला. आमदारांना याची माहिती मिळते मात्र पोलिसांना मिळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केला जात आहे. मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर शहराकडे येणारी गाडी क्रमांक एम एच 19 सी वाय 92 87 या गाडीत गुटखा असल्याची माहिती आमदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत दोन दिवसापासून खालावल्याने आज त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदूजा रुग्णलयात दाखल झाले आहेत.  कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने हिंदुजा रुग्णलायात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात दोन जणांची निर्घृण हत्या झाल्याने तालुक्यासह शहरात मोठी खळबळ उडाली असल्याची घटना आज मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. शहरातील बालाजी लॉन परिसरात असलेल्या शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचार्‍याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली असून खूनाचे स्पष्ट कारण समोर आले नसलेतरी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बालाजी लॉन परिसरात असलेल्या शगुन इस्टेटमध्ये रहिवासी असलेले हेमंत श्रवणकुमार भूषण हे भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न आराध्या हेमंत भूषण (23) हिच्याशी झाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सावखेडा परिसरातील गिरणा नदी पात्रात पोहताना फिट आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील राजू भूरा भिल (वय-३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजू भिल हा तरुणा आपल्या परिवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिटचा आजार होता. रविवारी दुपारी १ वाजता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्राच्या पाण्यात पोहत असतांना त्याला अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सुप्रीम कॉलनीत पानटपरीमधून सामान उधार देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पानटपरी चालकास बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश ऊर्फ भावड्या संतोष राजपूत (वय २२, सुप्रीम कॉलनी) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास टपरी बंद करून उमेश हा घरी जात होता. पानटपरीतील सामान उधारीने देत नसल्याच्या कारणावरून शारदा शाळेच्या प्रांगणाजवळ किरण चितळे (वय १९) विजय, बेंडा बाप्या, आकाश, पप्पू माचिस, रोहित (पूर्ण नाव समजू शकले नाही.) (सर्व रा. सुप्रीम…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील आठवडे बाजारातील जैन मंदिराजवळील लिंबू मार्केट येथे सेंट्रिंग प्लेटचे पैसे मागितल्यावरून प्राणघातक हल्ला चढवत जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप प्रकाश लवंगे याने आरोपी आकाश ऊर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (२१) याला बांधकामाच्या सेंट्रिंग प्लेटचे दोन हजार रुपये मागितले. याचा राग येऊन चॅम्पियनने लवंगी व त्याच्या भावाला शिवीगाळ करून त्याच्या घरातून चाकू आणून संतोष लवंगे याच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुस्लीम कॉलनीत लपल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सोपनि हरीश भोये, नीलेश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात एक महिला रात्रीच्या सुमारास महिला बहिणीच्या घरी आलेली असतांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर पायी चालत असतांना बाप – लेकानी महिलेशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला बाप लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील ३३ वर्षीय महिला नात्यातील चुलत बहिणीकडे प्रभात कॉलनीत आल्यानंतर रविवारी रात्री 12.30 वाजता त्यांचे पोट दुखू लागल्याने त्या मध्यरात्री रस्त्यावर एकट्या पायी फिरत असताना याच भागातील आरोपीने महिलेसमोरच लूघशंका केली तसेच आरोपीच्या मुलाचे महिलेकडे बघून तु काय अप्सरा आहेस का? म्हणत म्हणत तिचा उजवा हात धरुन तिला आपल्याकडे ओढून घेतले.…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  भरधाव रेल्वेगाडीचा धक्का लागल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव-आसोदा रेल्वे अपलाईन रेल्वेलाईनजवळ सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आसोदा रेल्वेच्या डाऊन लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका 55 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी तथा ट्रॅकमॅन उमेश भारंबे यांनी यासंदर्भात जळगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक यांना घटनेची माहिती दिल्यानंतर सोमवारी सकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार अनिस सपकाळे आणि हवालदार मराठे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करीत तो शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. या प्रकरणी जळगाव…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक पार पडली आहे. यात सहकार गटाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल २० वर्षापासून या शेतकरी सहकारी संघात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सत्ता होती ती त्यांनी आज देखील कायम ठेवली आहे. धरणगाव-एरंडोल कृषी उत्त्पन्न बाजार समितीत शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर लागलीच लागलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत त्यांचे सहकार गटाचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले आहे. यात संजय जाधव,गजानन पाटील, धनराज महाजन, सुमनबाई पाटील, प्रकाश महाजन, पवन सोनवणे, भगवंतराव पाटील हे विजयी झाले आहे. हि निवडणूक जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन, खा.उन्मेष पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.राजूमामा…

Read More